जानेवारी २०२३

Josh सेवेच्या अटी

Josh मध्ये तुमचे स्वागत आहे, जे VerSe Innovation Private Limited द्वारे प्रदान केले असून तिचे नोंदणीकृत कार्यालय हेलिओस बिझनेस पार्क, 11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क, आउटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी, बेंगळुरू-560103, कर्नाटक, भारत या पत्त्यावर आहे. (“VerSe”, “आम्ही”, “आमचे” किंवा “आपण” किंवा “Josh”). सेवा प्रदान करण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी Josh हा आमचा ब्रँड आहे. मोबाईल प्लिकेशन किंवा डेस्कटॉप आवृत्ती किंवा भविष्यात कोणत्याही मोड किंवा माध्यमावर (“सेवा” किंवा “प्लॅटफॉर्म” यांसह) उपलब्ध असलेली कोणतीही आवृत्ती डाउनलोड, इन्स्टॉल करण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी तुम्ही या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत. या नियम आणि अटींच्या उद्देशाने, VerSe च्या कोणत्याही संदर्भामध्ये तिच्या उपकंपन्या, संलग्न कंपन्या, मूळ कंपनी आणि भगिनी कंपन्यांचा समावेश असेल. या सेवेच्या अटी, गोपनीयता धोरण तसेच समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर सर्व लागू कायदे आणि नियम, (एकत्रितपणे "कायदेशीर अटी" किंवा "अटी") तुमचा प्लॅटफॉर्मचा क्सेस आणि वापर नियंत्रित करतात, मग तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता आहात की व्हिजिटर (ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही मर्यादेशिवाय मोबाईल किंवा कॉम्प्युटरसारखी इतर डिव्हायसेस वापरून प्लॅटफॉर्म ब्राउझ करता किंवा अन्यथाही रजिस्टर न करता प्लॅटफॉर्म वापरता) आहात याची पर्वा न करता.

तुम्ही या कराराच्या अटी (“अटी”) वाचत आहात ज्या 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार प्रकाशित केल्या असून या तरतुदी माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती आणि प्रक्रिया आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती) नियम, 2011 आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 यांच्यासह त्याच्या संबंधित नियमांसह, आणि काही दुरुस्त्या असल्यास त्यांच्यासह वाचल्या असून त्या याद्वारे तुमच्या व आमच्या दरम्यानचे संबंध नियंत्रित करतात आणि तुमच्या व आमच्या दरम्यान एक करार म्हणून काम करतात आणि त्या अटींमध्ये नमूद केल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही हा प्लॅटफॉर्म आणि आमच्या संबंधित वेबसाईट्स, सेवा, प्लिकेशन्स, उत्पादने आणि कन्टेन्ट (एकत्रितपणे, “सेवा”) क्सेस करू शकता आणि वापरू शकता.

कन्टेन्ट पाहण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म वापरून किंवा क्सेस करून किंवा डाउनलोड करून, तुम्ही या अटींना बांधील असल्याची सहमती देता.

1. सामान्य

 1. Josh हे एक युनिक मोबाइल आणि डेस्कटॉप प्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे तुम्ही कन्टेन्ट (“कन्टेन्ट”) पाहू शकता तयार करू शकता आणि शेअर करू शकता.
 2. या कराराच्‍या उद्देशासाठी VerSe च्‍या कोणत्‍याही संदर्भामध्‍ये तिच्या संलग्न कंपन्या, उपकंपन्या, मूळ कंपनी आणि भगिनी कंपन्यांचा समावेश असेल.
 3. "तुम्ही", "तुमचे", "वापरकर्ता" आणि "वापरकर्ते" या संज्ञा संदर्भानुसार वाचल्या जातील आणि त्यांचा अर्थ तुम्ही असा असेल.
 4. या सेवेच्या अटी तसेच गोपनीयता धोरण, समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर सर्व लागू कायदे आणि नियम तुमचा प्लॅटफॉर्मचा क्सेस आणि वापर नियंत्रित करतात, मग तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता आहात की व्हिजिटर (ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही मर्यादेशिवाय मोबाईल किंवा कॉम्प्युटरसारखी इतर डिव्हायसेस वापरून प्लॅटफॉर्म ब्राउझ करता किंवा अन्यथाही रजिस्टर न करता प्लॅटफॉर्म वापरता) आहात याचा विचार न करता.
 5. VerSe याद्वारे तुम्हाला कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टॅब्लेट, पोर्टेबल इंटरनेट उपकरणे किंवा भविष्यात विकसित होऊ शकेल असे इतर तंत्रज्ञान/मोड/मीडिया यांवर प्लॅटफॉर्म क्सेस करण्यासाठी आणि वापरण्यासाठी एक अनन्य, अहस्तांतरणीय आणि मर्यादित परवाना मंजूर करते.
 6. प्लॅटफॉर्म क्सेस करून आणि/किंवा वापरून आणि/किंवा प्लॅटफॉर्मवर एक वापरकर्ता प्रोफाइल खाते ("खाते") तयार करून, तुम्ही या कायदेशीर अटींच्या या अटी वाचल्या, स्वीकारल्या, अंमलात आणल्या आणि त्यांना बांधील असल्याचे मानले जाते.

2. व्याख्या

 1. “गोपनीय माहिती” म्हणजे अशी कोणतीही माहिती, ज्यामध्ये प्रक्रिया, पद्धती, प्रणाली, व्यवसायाची माहिती, तांत्रिक माहिती आणि विक्रीबद्दलची माहिती, क्लायंट माहिती, या VerSe द्वारे गोपनीय मानल्या गेलेल्या परंतु यापुरतेच मर्यादित नसलेल्या माहितीचा समावेश आहे आणि वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारे उघड केली जाते.
 2. “बौद्धिक संपदा” म्हणजे कोणताही शोध, निर्मिती, कार्य, अल्गोरिदम, सोर्स कोड, ऑब्जेक्ट कोड किंवा इतर कोड, डिझाइन, गोपनीय माहिती, उत्पादन आणि अशा इतर गोष्टी ज्या संपादित केल्या गेल्या आहेत किंवा संपादित केल्या जाण्याच्या प्रक्रियेत आहेत किंवा पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, व्यापार गुपित किंवा इतर कोणत्याही प्रकारची बौद्धिक संपदा म्हणून संपादित केली जाण्यास सक्षम आहे.
 3. "कन्टेन्ट" म्हणजे व्हिडीओ, इमेजेस, टिप्पण्या आणि जाहिराती यांसह परंतु त्यापुरते मर्यादित नसलेले, प्रदर्शित केलेले कोणतेही आणि सर्व साहित्य/काम.

3.        अटींची स्वीकृती आणि पात्रता 

3.1 अटींची स्वीकृती

 1. प्लॅटफॉर्म डाउनलोड करणे, इन्स्टॉल करणे, भेट देणे किंवा ब्राउझ करणे यासह परंतु त्यापुरते मर्यादित नसलेल्या कोणत्याही प्रकारे सेवेसाठी नोंदणी करून आणि/किंवा वापरून, तुम्ही येथे नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती आणि इतर सर्व ऑपरेटिंग नियम, धोरणे आणि प्रक्रियांना सहमती देता ज्या VerSe द्वारे प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी प्रकाशित केल्या जाऊ शकतात, त्यातील प्रत्येक बाब संदर्भासह समाविष्ट केली जाते आणि कलम 22 "अटींमध्ये बदल" अंतर्गत खाली नमूद केलेल्या अटींनुसार त्यातील प्रत्येक बाब VerSe द्वारे वेळोवेळी तुम्हाला सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.
 2. एखादी संस्था, कंपनी किंवा शासनाच्या शाखेच्या बाबतीत, तुम्ही स्पष्ट करता आणि हमी देता की तुम्हाला तुमची कंपनी किंवा संस्था कायदेशीररीत्या बंधनकारक करण्याचा अधिकार आहे आणि तुमची कंपनी किंवा संस्था या अटींच्या दायित्वे आणि निर्बंधांना बांधील असेल. येथे 'तुम्ही' किंवा 'तुमचे' याच्या कोणत्याही आणि सर्व संदर्भांमध्ये तुमची कंपनी किंवा संस्था समाविष्ट असेल.
 3. हा करार प्लॅटफॉर्मच्या सर्व वापरकर्त्यांना लागू होतो, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट, माहिती आणि इतर साहित्य किंवा सेवांचे योगदान देणारे वापरकर्ते, प्लॅटफॉर्मचे वैयक्तिक वापरकर्ते, प्लॅटफॉर्म क्सेस करणारी ठिकाणे आणि प्लॅटफॉर्मवर पेज असणारे वापरकर्ते यांचा समावेश होतो परंतु त्या पुरतेच मर्यादित नाही.
 4. याव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या काही सेवा वेळोवेळी VerSe द्वारे निर्दिष्ट केलेल्या अतिरिक्त अटी आणि शर्तींच्या अधीन असू शकतात; तुमचा अशा सेवांचा वापर त्या अतिरिक्त अटी आणि शर्तींच्या अधीन आहे, ज्या या संदर्भाद्वारे या करारामध्ये समाविष्ट केल्या आहेत.

     3.2 पात्रता

 1. प्लॅटफॉर्मचा वापर आणि क्सेस अशा सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहे जे कराराद्वारे कायदेशीररित्या बांधील असू शकतात आणि जे भारतीय करार कायदा, 1872 अंतर्गत अपात्र किंवा अक्षम घोषित केलेले नाहीत. तुम्ही अल्पवयीन म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापरकर्ता म्हणून नोंदणी करणार नाही आणि प्लॅटफॉर्म क्सेस करणार नाही किंवा वापरणार नाही. अल्पवयीन म्हणून जर तुम्हाला प्लॅटफॉर्म क्सेस करायचा असेल किंवा त्याचा वापर करायचा असेल, तर असा क्सेस किंवा वापर तुमचे कायदेशीर आईवडील किंवा पालक करू शकतात.
 2. तुमचे वय 18 वर्षांखालील असल्याचे VerSe च्या निदर्शनास आणून दिले गेल्यास किंवा समजल्यास, VerSe ला असा वापर संपुष्टात आणण्याचा आणि/किंवा तुम्हाला प्लॅटफॉर्मचा क्सेस देण्यास नकार देण्याचा अधिकार आहे.
 3. आमच्या अटी किंवा धोरणे किंवा मानकांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे खाते यापूर्वी अक्षम केले गेले नाही; आणि
 4. तुम्ही या अटी आणि सर्व लागू देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन कराल.

4. तुमचे खाते, वापरकर्ता माहिती आणि सशुल्क सबस्क्रिप्शन वापरकर्ता शुल्क

4.1 तुमचे खाते आणि वापरकर्ता माहिती: तुम्हाला हे समजले आहे की आवश्यक लॉगिन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्ही प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट तयार करू शकाल आणि फक्त प्लॅटफॉर्म डाउनलोड करून तुम्हाला संपादन टूल्स क्सेस करता येणार नाहीत. तुम्ही सहमत आहात की प्लॅटफॉर्मवर खाते तयार करण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती कायदेशीर, वैध, अचूक, अद्ययावत आहे आणि ती पूर्णपणे तुमच्या मालकीची आहे आणि VerSe द्वारे ती पडताळली जाऊ शकते. अशी माहिती अद्ययावत आणि पूर्ण ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे तपशील आणि तुम्ही आम्हाला प्रदान केलेली इतर कोणतीही माहिती राखून ठेवणे आणि वेळच्या वेळी अपडेट करणे महत्वाचे आहे.

तुम्ही सहमत आहात की तुमच्या खात्यांतर्गत होणाऱ्या कृत्यांसाठी संपूर्णपणे तुम्हीच जबाबदार आहात. कृपया तुमच्या खात्याचा पासवर्ड गोपनीय ठेवा आणि असे खाते काटेकोरपणे वैयक्तिक कारणांसाठी वापरा.

तुम्ही या अटींच्या कोणत्याही तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, किंवा तुमच्या खात्यावर अशा कृती होत असल्यास, ज्या आमच्या विवेकबुद्धीनुसार, सेवांना हानी पोहोचवू शकतात किंवा बिघडवू शकतात किंवा कोणत्याही तृतीय पक्ष अधिकारांचा भंग किंवा उल्लंघन करू शकतात किंवा त्या कोणत्याही लागू कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करत असल्यास, आम्ही तुमचे वापरकर्ता खाते अक्षम करण्याचा, आणि तुम्ही अपलोड किंवा शेअर केलेला कोणताही कन्टेन्ट काढून टाकण्याचा किंवा अक्षम करण्याचा अधिकार राखून ठेवतो. अशा प्रकारच्या अपीलसाठी तुमच्या खऱ्या, स्पष्ट आणि वैध कारणासह grievance.officer@myjosh.in वर आमच्याशी संपर्क साधा.

4.2 सशुल्क सबस्क्रिप्शन: आम्ही वापरकर्त्याद्वारे या आणि इतर योग्य अटी व शर्तींच्या स्वीकृतीच्या आधारे काही पर्यायी सबस्क्रिप्शन सेवा देऊ शकतो. वापरकर्त्याच्या स्वीकृतीनंतर, आम्ही वापरकर्त्याने निवडलेल्या विशिष्ट पर्यायी सेवेवर आधारित सबस्क्रिप्शन आणि/किंवा मेंबरशिप शुल्क आकारण्याचा अधिकार राखून ठेवतो. तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करता तेव्हा, तुम्ही आम्हाला पेमेंट गेटवे प्रदाता/पेमेंट सिस्टम प्रोसेसरद्वारे आवश्यक असलेली पेमेंटची आणि इतर माहिती संपूर्ण आणि अचूक प्रदान करणे आवश्यक आहे. पेमेंट तपशील सबमिट करून, तुम्ही वचन देता की तुम्हाला ते पेमेंट तपशील वापरून सबस्क्रिप्शन खरेदी करण्याचा अधिकार आहे. जर आम्हाला पेमेंटची अधिकृतता प्राप्त झाली नाही किंवा कोणतीही अधिकृतता नंतर रद्द केली गेली, तर आम्ही प्लॅटफॉर्मवरील तुमच्या सबस्क्रिप्शन-आधारित सेवेवरील तुमचा क्सेस ताबडतोब संपुष्टात आणू किंवा निलंबित करू. सबस्क्रिप्शन-आधारित सेवांसाठी आणि Josh जेम्स रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी वापरकर्त्यांकडून पेमेंट प्राप्त करण्यासाठी आम्ही तृतीय पक्षाचे पेमेंट गेटवे आणि पेमेंट सिस्टम प्रदाता सेवा वापरतो.

5. Josh जेम्स आणि रिवॉर्ड्स

Josh रिवॉर्ड प्रोग्रॅम (“प्रोग्रॅम”) हा Josh (“प्लॅटफॉर्म”) द्वारे वापरकर्त्यांना प्रोग्रॅमचा लाभ घेण्यासाठी प्रदान केला जातो. नोंदणीकृत असलेल्या आणि या अटींच्या कलम 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म अटींनुसार पात्र असलेल्या सेवांच्या वापरकर्त्यांसाठी हा खुला आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना प्रोग्रॅमचा लाभ घेण्यासाठी आई-वडीलांची किंवा कायदेशीर पालकांची परवानगी असणे आवश्यक आहे.

Josh आपल्या वापरकर्त्यांना त्यांनी Josh प्लॅटफॉर्म नियमित आणि सतत वापरल्याबद्दल विविध स्वरूपात लॉयल्टी पॉइंट्स ऑफर करते. हे लॉयल्टी पॉइंट्स Josh प्लॅटफॉर्मवर विविध कृती / क्रिया करण्यासाठी प्रदान केले जातात. प्रत्येक वापरकर्ता जो स्वतःचे प्रोफाइल पूर्ण करतो, कन्टेन्ट लाईक करतो, मित्राला रेफर करतो आणि प्लॅटफॉर्मवर Josh ने निर्दिष्ट केल्यानुसार वेळ घालवतो, त्याला लॉयल्टी पॉइंट्स (“Josh जेम्स”) मिळतात. वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर केलेल्या प्रत्येक कृत्यासाठी Josh जेम्स जारी केले जातात. Josh जेम्सचे मूल्य प्रोग्रॅमच्या धोरणांनुसार कॉन्फिगर करण्यायोग्य आणि बदलत्या (डायनॅमिक) घटकांवर अवलंबून असते. Josh जेम्स हे रिवॉर्ड म्हणून केवळ प्लॅटफॉर्मच्या नियमित वापरासाठीच दिले जातात आणि Josh जेम्स फक्त Josh प्लॅटफॉर्मवर खरेदी केले जाऊ शकतात आणि सर्व पेमेंट्सवर प्रक्रिया लागू कायद्यांनुसार तृतीय पक्ष पेमेंट ग्रीगेटरद्वारे केली जाईल.

Josh तिच्या विवेकबुद्धीनुसार, वापरकर्त्याच्या क्रियांच्या प्रमाणात प्राप्त झालेल्या अशा पॉइंट्सच्या संख्येसह, यापैकी एका किंवा कोणत्याही प्रकारचे Josh जेम्स जमा करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते. शिवाय, ऑफरची आवश्यकता पूर्ण न करणाऱ्या किंवा ऑफरचा कोणताही गैरवापर किंवा फसवणूक किंवा संशयास्पद व्यवहार/क्टिव्हिटी किंवा कोणत्याही कायदेशीर आवश्यकता किंवा लागू नियम आणि अटींनुसार यासह परंतु यापुरते मर्यादित नसलेल्या कोणत्याही कारणास्तव एखाद्या वापरकर्त्याला कोणतेही पॉइंट्स मिळवण्यापासून अपात्र ठरवण्याचा अधिकार Josh राखून ठेवते. Josh तिच्या विवेकबुद्धीनुसार, ऑफर केलेले पॉइंट्स कधीही ऑफर बंद करण्याचा किंवा बदलण्याचा किंवा नवीन स्वरूपात जारी करण्याचा अधिकार राखून ठेवते. Josh तिच्या विवेकबुद्धीनुसार Josh जेम्ससाठी कालबाह्यता कालावधी देखील निर्दिष्ट करू शकते.

Josh जेम्स

Josh जेम्स कोण मिळवू शकतो आणि खरेदी करू शकते?

18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आमच्या सेवांचे वापरकर्ते अधिकृत पेमेंट पद्धती वापरून आणि आम्ही उपलब्ध केलेल्या आणि आमच्याकडून अधिकृतता देण्यात आलेल्या पेमेंट पुरवठादारांद्वारे आमच्याकडून व्हर्च्युअल “Josh जेम्स” (“जेम्स”) खरेदी करू शकतात.  

प्रोग्रॅमचा लाभ कोण घेऊ शकते?

18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे वापरकर्ते प्रोग्रॅमच्या वापराचा लाभ घेऊ शकतात.

वापरकर्ते 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील तरच Josh जेम्स मिळवू शकतात आणि इतर वापरकर्त्यांना जेम्स भेट देऊ शकतात, आर्थिक मूल्य असलेले जेम्स भेट म्हणून प्राप्त करू शकतात आणि जेम्स काढून घेऊ शकतात.  

आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी खालील उत्पादने आणि इन्सेन्टीव्ह्ज तुमच्यासाठी उपलब्ध करू शकतो.    

जेम्स मिळवणे आणि खरेदी करणे

 • Josh जेम्सची किंमत खरेदी करण्याच्या ठिकाणी प्रदर्शित केली जाईल. Josh जेम्ससाठीची सर्व शुल्के आणि पेमेंट्स खरेदी करण्याच्या ठिकाणी नमूद केलेल्या भारतीय रुपयांमध्ये, पेमेंट एकत्रीकरण सेवेकडे उपलब्ध असलेल्या सुसंगत पेमेंट पद्धती आणि पर्यायांद्वारे केली जातील.
 • तुम्ही खरेदी केलेल्या कोणत्याही Josh जेम्सच्या पेमेंटसाठी तुम्ही जबाबदार असाल. एकदा खरेदी पूर्ण झाल्यावर तुमच्या वापरकर्ता खात्यात Josh जेम्स क्रेडीट केले जातील आणि परताव्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.  

तुमच्या खरेदीमध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर कृपया खाली नमूद केलेल्या ईमेल पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा. असा बदल शक्य आहे का, हे आम्ही तुम्हाला सांगू. कृपया याची नोंद घ्या की बदल केल्यास त्याचा किमतीवर तसेच तुमच्या खरेदीच्या इतर घटकांवर परिणाम होईल. मात्र, जर तुम्ही Josh जेम्स खरेदी केलेत तर तुम्ही याची पोच देता आणि हे मान्य करता की खरेदी पूर्ण झाल्यावर ताबडतोब आम्ही तुम्हाला जेम्सचा पुरवठा सुरू करू आणि त्यामुळेच, त्यावेळी तुम्ही रद्द करण्याचा किंवा खरेदी करारातून माघार घेण्याचा अधिकार गमवाल.  

तुम्ही जेम्सचा वापर कसा करू शकता?

जेम्सचा वापर व्हाऊचर्स / डिस्काउंट कुपन्स खरेदी करण्यासाठी करता येईल. जेम्सची रोख रक्कम किंवा पैसे किंवा चलन, प्रदेश किंवा इतर राजकीय संस्तेसाठी किंवा कोणत्याही स्वरूपात क्रेडीटसाठी अदलाबदल करण्यात येणार नाही.  

जेम्स फक्त आमच्या प्लॅटफॉर्मवर वापरता येतील आणि आम्ही निश्चित केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त आमच्या सेवांचा भाग म्हणून आणि इतर प्रमोशन्स, कुपन्स,डिस्काउंट्स किंवा स्पेशल ऑफर्ससह एकत्र करता येणार नाहीत किंवा त्यासह वापरता येणार नाहीत.          

सेवांच्या इतर कोणत्याही वापरकर्त्याला किंवा तृतीय पक्षाला आमच्याकडून स्पष्ट लेखी परवानगी दिलेली नसताना कोणतेही जेम्स असाईन करता येणार नाहीत किंवा हस्तांतरीत करता येणार नाहीत. आमच्याकडून स्पष्ट लेखी परवानगी दिलेली नसताना कोणत्याही जेम्सची विक्री, अदलाबदल, असाईनमेंट किंवा इतर विल्हेवाट लावण्याला स्पष्टपणे प्रतिबंधित करण्यात येत आहे.  

संकलित केलेले जेम्स मालमत्तेचा भाग नाहीत आणि ते हस्तांतरणीय नाहीत: (a) मृत्यू झाल्यावर; (b) घरगुती नात्यांच्या संदर्भात; किंवा (c) अन्यथा कायद्यानुसार.  

आमच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय असाईन केलेले, विकलेले किंवा अन्यथा हस्तांतरीत केलेले कोणतेही जेम्स शून्य होतील. सेवांच्या कोणत्याही वापरकर्त्याने या प्रतिबंधाचे उल्लंघन केल्यास, त्याचे किंवा तिचे खाते आमच्याकडून बंद करण्यात येईल, त्याच्या किंवा तिच्या खात्यातून जेम्स जप्त केले जातील, आणि/किंवा ते नुकसान आणि कायदेशीर खटला आणि व्यवहाराच्या खर्चाच्या अधीन असतील.  

वापरकर्त्याने कोणत्याही कारणासाठी त्याचे खाते बंद केल्यास त्याचे सर्व जेम्स आपोआप कालबाह्य होतील.

 • तुम्ही हे मान्य करता की जेव्हा आम्हाला असे सकारण वाटेल की तुम्ही या धोरणाचे उल्लंघन केले आहे, तुम्ही एखाद्या लागू असलेल्या कायद्याचे किंवा नियमनाचे उल्लंघन केले किंवा कायदेशीर, सुरक्षेच्या किंवा तांत्रिक कारणासाठी आम्हाला असे जेम्स व्यवस्थापित करण्याचा, नियमन करण्याचा, नियंत्रित करण्याचा, बदलण्याचा आणि/किंवा काढून टाकण्याचा अधिकार असेल आणि अशा अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या आधारे आमचे तुमच्याप्रति कोणतेही दायित्व असणार नाही.
 • उपलब्ध असलेल्या कन्टेन्टच्या संबंधात, तुम्ही वापरकर्ता कन्टेन्टच्या एखाद्या आयटमबद्दल इतर वापरकर्त्याने अपलोड केलेल्या किंवा स्ट्रीम केलेल्या आयटमबद्दल (“कन्टेन्ट पुरवठादार”) तुमचे रेटिंग देण्यासाठी किंवा तुमची प्रशंसा दर्शवण्यासाठी तुम्ही जेम्स वापरू शकता.    
 • सेवेमध्ये जेव्हा ही फंक्शनॅलिटी उपलब्ध असेल तेव्हा तुम्ही संबंधित वापरकर्ता कन्टेन्टच्या खाली दिलेले “जेम्स द्या” बटण वापरून वापरकर्ता कन्टेन्टला जेम्सचे योगदान देऊ शकता.
 • जेव्हा तुम्ही वापरकर्ता कन्टेन्टच्या एखाद्या आयटमला जेम्सचे योगदान देता तेव्हा हा जेम्स तुमच्या खात्यातून काढून टाकला जाईल आणि कन्टेन्ट पुरवठादाराच्या खात्यात कन्टेन्ट पुरवठादार जेम्समध्ये रूपांतरित केले जातील.
 • कृपया याची नोंद घ्या की जेव्हा तुम्ही दुसऱ्या वापरकर्त्याला जेम्स देता तेव्हा तुम्ही ते सार्वजनिकपणे करता म्हणजे सेवेचे इतर वापरकर्ते (जेम्स प्राप्त करणाऱ्या व्यक्तीसह) तुमचे नाव, वापरकर्ता आयडी आणि तुम्ही दिलेल्या जेम्सचे इतर तपशील पाहू शकता.
 • इतर वापरकर्त्याने खरेदी केलेल्या Josh जेम्सचा कोणताही परतावा किंवा शुल्क परत देण्याची परवानगी नाही.

कुपन्स

कुपन्स कोण खरेदी करू शकते?

 • 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आमच्या सेवांचे वापरकर्ते आमच्याकडून अधिकृतता देण्यात आलेल्या विक्रेत्यांकडून जेम्सची अदलाबदल करून डिस्काउंट कुपन्स  (“कुपन्स”) खरेदी करू शकतात.  

कुपन्स खरेदी करणे

 • प्रकाशित केलेल्या किमतींमध्ये जिथे आवश्यक असले तिथे तुमच्या देशात लागू असलेल्या कायद्यांनुसार कर समाविष्ट आहेत. जर कोणतीही कुपन्स वस्तू आणि सेवा कराच्या (“GST”) अधीन असतील आणि तुम्ही विक्रेत्याला लागू असलेला GST भरलेला नसेल तर तुम्ही अशा GST चे पेमेंट करण्यासाठी आणि संबंधित कोणतेही दंड किंवा व्याज संबंधित कर प्राधिकरणाला भरण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल.
 • तुम्ही हे मान्य करता की कोणत्याही सामान्य किंवा विशिष्ट घटनेत, आम्हाला आमच्या विवेकबुद्धीनुसार योग्य वाटेल त्यानुसार विनिमय दर व्यवस्थापित करण्याचा, त्याचे नियमन करण्याचा, नियंत्रित करण्याचा, बदलण्याचा आणि/किंवा काढून टाकण्याचा अधिकार आहे आणि अशा अधिकाराची आम्ही अंमलबजावणी केल्याच्या आधारे आमचे तुमच्याप्रति कोणतेही दायित्व असणार नाही.  
 • जर तुम्ही कुपन्सच्या खरेदीमध्ये बदल करू इच्छित असाल तर कंपनीचे कुपन कोड्स शेअर करण्याचे धोरण लागू असेल.
 • या अटींमध्ये उल्लेख असण्याच्या व्यतिरिक्त, कुपन्सची सर्व विक्री अंतिम असेल आणि खरेदी केलेल्या कोणत्याही कुपन्ससाठी आम्ही परतावा देऊ करत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे जेम्स देऊन कुपन्स घेता तेव्हा असे जेम्स तुमच्या वापरकर्ता खात्यातून कापले जातील आणि कुपन्समध्ये जमा केले जातील.
 • कुपन्सचे जेम्समध्ये किंवा रोख रकमेत रूपांतर केले जाऊ शकत नाही किंवा आम्ही कोणत्याही कारणासाठी त्याचा परतावा किंवा मोबदला देत नाही.
 • अदलाबदली केलेली कुपन्स किंवा कोणत्याही वापरकर्त्याने प्राप्त केलेली कुपन्स मालमत्तेचा भाग नाहीत आणि ते हस्तांतरणीय नाहीत: (a) मृत्यू झाल्यावर; (b) घरगुती नात्यांच्या संदर्भात; किंवा (c) अन्यथा कायद्यानुसार.  
 • आम्ही आमच्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार असे निश्चित केले की वापरकर्त्याने अदलाबदल केलेली किंवा प्राप्त केलेली कुपन्स करप्ट झाली आहेत किंवा त्यांची अशा प्रकारे हानी झाली आहे, तर आधी अदलाबदल केलेल्या कुपन्सच्या प्रती आम्ही बदलून देऊ शकतो.
 • कोणताही वापरकर्ता या प्रोग्रॅमचा गैरफायदा घेत आहे किंवा या अटींचे उल्लंघन करत आहे, असे आढळले तर त्याचे खाते बंद करण्याचा किंवा त्याच्या खात्याविरुद्ध इतर योग्य कृती करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.  

जेम्स काढून घेणे

 • कोणत्याही वेळी, कन्टेन्ट पुरवठादार/वापरकर्ता प्रत्यक्ष त्या वेळी त्याच्याकडे/तिच्याकडे किती जेम्स गोळा झालेले आहेत, हे त्याच्या/तिच्या खात्यात तपासू शकतो.
 • कन्टेन्ट पुरवठादार/वापरकर्ता, आपल्या वापरकर्ता खात्यात संबंधित पर्याय निवडून पैशाच्या मोबदल्याच्या बदल्यात (भारतीय राष्ट्रीय रुपयांच्या स्वरूपात) जेम्स काढून घेऊ शकतो. वापरकर्त्याने गोळा केलेल्या जेम्सच्या संख्येसह विविध घटकांच्या आधारे लागू असलेल्या आर्थिक मोबदल्याची गणना आमच्याकडून केली जाईल.
 • जेम्स काढून घेणे खालील अटींच्या आणि अशा काढून घेण्याच्या वेळी तुम्हाला दिलेल्या सूचनांमध्ये पुरवण्यात आलेल्या कोणत्याही अतिरिक्त अटींच्या अधीन असेल. यात काढून घेण्यावर लागू असलेल्या दैनंदिन मर्यादेचा समावेश असेल: काढून घेण्याचा दर काढून घेण्याच्या वेळी प्रदर्शित केला जाईल.
 • तुम्ही हे मान्य करता की जेव्हा आम्हाला असे सकारण वाटेल की तुम्ही या अटींचे उल्लंघन केले आहे, तुम्ही एखाद्या लागू असलेल्या कायद्याचे किंवा नियमनाचे उल्लंघन केले आहे किंवा कायदेशीर, सुरक्षेच्या किंवा तांत्रिक कारणासाठी आम्हाला असे असे काढून घेण्याचे वैशिष्ट्य व्यवस्थापित करण्याचा, त्याचे नियमन करण्याचा, नियंत्रित करण्याचा, बदलण्याचा आणि/किंवा काढून टाकण्याचा अधिकार असेल आणि अशा अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या आधारे आमचे तुमच्याप्रति कोणतेही दायित्व असणार नाही.
 • लागू असलेले कॅश पेमेंट थेट तुमच्या नामनिर्देशित बँक खात्यात/युपीआय आयडीमध्ये किंवा इतर तृतीय पक्षी पेमेंट चॅनेल खात्यात थेट पाठवले जाईल (लागू असल्यास).
 • तुमचे नाव आणि आडनाव तुमच्या बँक खात्याशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे आणि त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही खात्याची माहिती योग्यप्रकारे द्याल, हे सुनिश्चित करणे, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही दिलेल्या तुमच्या बँक खात्याच्या/ युपीआय आयडी माहितीच्या चुकीच्या तपशिलामुळे कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. तुमच्या खात्यात असलेला ईमेल पत्ता, नाव आणि आडनाव यापेक्षा वेगळा तपशील असलेल्या आणि पडताळणी न केलेल्या बँक खात्यावर/ युपीआय आयडीवर पेमेंट केले जाणार नाही; आम्ही आमच्या संपूर्ण विवेकाधीकारात तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला माहिती देण्याची (तुमचे नाव, आडनाव आणि तुमचा राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांक यासह) विनंती करू शकतो.  
 • कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी ‘नो युवर कस्टमरचा’ भाग म्हणून आमचे समाधान होईपर्यंत तुमची ओळख, वय आणि पात्रता निकष यांची पडताळणी करण्याचा अधिकार (आम्हाला आवश्यक असेल त्यानुसार तुमच्या राष्ट्रीय ओळखपत्र कार्डाच्या फोटोकॉपीची किंवा इतर पुराव्याची विनंती करून) आम्ही राखून ठेवतो.
 • काढून घेण्याच्या सर्व विनंत्या वेळेवर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असले तरीही, कोणत्याही विशिष्ट कालावधीत (काढण्याच्या वेळी नमूद केलेल्या कोणत्याही अंदाजे कालावधीसह) त्या पूर्ण होण्याची हमी आम्ही देत नाही आणि अशा कालावधीच्या आत काढून घेण्याची विनंती पूर्ण करण्यात अपयश असल्यास आम्ही तुम्हाला किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाला उत्तरदायी नाही.
 • या पेमेंट्सवर लागू असलेल्या कायद्यांनुसार लागणाऱ्या कोणत्याही करांच्या तुम्ही अधीन असलात तर अशा करांच्या पेमेंटसाठी तुम्ही जबाबदार असाल (संबंधित कोणतेही दंड किंवा व्याज संबंधित कर प्राधिकरणाला भरण्यासह) तुम्ही जबाबदार असाल. लागू असलेल्या कायद्यानुसार अशी पेमेंट्स करण्यापूर्वी आम्ही कर कपात करणे आवश्यक आहे, असे आम्ही निश्चित केल्यास, पेमेंट्सपूर्वी लागू असलेली कर कपात करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. करसंबंधी प्रमाणपत्रांसाठी तुम्हाला विनंती करण्याचा आणि तुम्हाला देण्यात आलेली रक्कम आणि/किंवा तुम्हाला देण्यात येणाऱ्या पेमेंट्सपैकी राखून ठेवलेली रक्कम कर प्राधिकरणाला कळवण्याचा अधिकारसुद्धा आम्ही राखून ठेवतो.      
 • जर तुम्ही या अटींचे उल्लंघन केलेत तर तुमच्या खात्यातून जेम्सची कपात करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
 • आम्ही कोणत्याही वेळी जेम्स इनिशिएटीव्ह रद्द करू शकतो. आम्ही जेम्स इनिशिएटीव्ह रद्द केल्यास, तुम्हाला जेम्सचे मूल्य तुमच्या बँक खात्यात/युपी आय आयडीमध्ये हस्तांतरीत करता येण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्वसूचना देण्याकरता व्यवहार्य प्रयत्न करू. जेव्हा आमच्याकडे वैध कारण असेल ( उदा. आम्हाला असे सकारण वाटेल की तुम्ही या धोरणाचे उल्लंघन केले आहे, तुम्ही एखाद्या लागू असलेल्या कायद्याचे किंवा नियमनाचे उल्लंघन केले किंवा कायदेशीर, सुरक्षेच्या किंवा तांत्रिक कारणासाठी), आम्ही कोणत्याही सूचनेशिवाय जेम्स ऑपरेशन इन्सेन्टीव्ह रद्द करू. यातील कोणत्याही घटनेत, तुम्हाला इन्सेन्टीव्ह रद्द करण्याच्या तारखेच्या आधी संकलित केलेल्या आणि या अटींमध्ये नमूद केल्यानुसार रोख रकमेत परावर्तित न केलेल्या कोणत्याही जेम्सच्या संदर्भात कोणत्याही आर्थिक मोबदल्याचा हक्क किंवा अधिकार असणार नाही.    

6. Josh वरील क्रिएटरला टिप द्या  

जर तुम्ही Josh वरील एखाद्या क्रिएटरच्या कन्टेन्टचा आनंद घेत असाल तर तुम्ही त्यांच्या प्रोफाईलवर पैशाच्या स्वरूपात टिप पाठवू शकता. टिपची 100% रक्कम क्रिएटरला मिळेल. (आमच्या पेमेंट पुरवठादाराचे शुल्क लागू असू शकते). Josh ला तुमच्या टिपच्या रकमेपैकी काहीही मिळणार नाही.    

6.1 Josh वर कोण टिप देऊ शकते?

Josh वर टिप देण्यासाठी:

 • तुम्ही 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असणे आवश्यक आहे.
 • टिप्स तुमच्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे (हे वैशिष्ट्य सध्या सर्वत्र उपलब्ध नाही).
 • व्यावसायिक खाती सहभागी होण्यास पात्र नाहीत.

टिप्सवरील बंधने  

तुम्ही किती आणि किती वेळा टिप देऊ शकता यावर काही मर्यादा आहेत.

 • तुम्ही दररोज फक्त विशिष्ट रकमेची टिप देऊ शकता, आणि तुम्ही कमाल टिप किती देऊ शकता, यावरसुद्धा मर्यादा आहे. हे लागू असलेल्या कायद्यांनुसार लागू होईल.

आमच्या ‘टिप्स सेवेच्या अटी विभागात’ बंधनांबद्दल अधिक जाणून घ्या.

Josh वर कोण टिप देऊ शकते?

1. तुमच्या Josh ॲपमध्ये, ज्या क्रिएटरला तुम्हाला टिप द्यायची आहे त्याच्या प्रोफाईलवर जा.    

2. त्यांच्या प्रोफाईलमध्ये, टिप्सवर टॅप करा. जर तुम्हाला त्यांच्या प्रोफाईलमध्ये टिप्स दिसले नाही, तर ते यावेळी टिप्स प्राप्त करू शकणार नाहीत.

3. टिप पाठवण्यासाठी टॅप करा. तुम्ही टिपची विशिष्ट रक्कम निवडू शकता किंवा एक टिपची कस्टम रक्कम जोडा, मग ‘पुढे’ वर टॅप करा. (लक्षात ठेवा, पेमेंट पार्टनरचे शुल्क लागू असू शकते.)

4. तुमची पेमेंटची पद्धत निवडा आणि ‘पेमेंट कन्फर्म करा’ वर टॅप करा.

जर तुम्ही यापूर्वी पेमेंट पद्धत जोडली नसेल तर तुम्हाला तुमच्या Josh खात्यात एक पेमेंट कार्ड जोडायला सांगितले जाईल.

6.2 Josh वर टिप मिळवणे

Josh वरील एक क्रिएटर म्हणून तुमचे प्रेक्षक तुमच्या Josh प्रोफाईलवरून तुम्हाला थेट टिप्स पाठवू शकतात. तुम्हाला पेमेंट्स देण्यासाठी आम्ही एका तृतीय पक्षी पेमेंट पुरवठादाराशी भागीदारी केली आहे.  

नोट: टिपची 100% रक्कम तुम्हाला मिळेल (भागीदाराचे प्रक्रिया शुल्क वजा करून).  

6.2.1 Josh वर कोण टिप प्राप्त करू शकते?

Josh वर टिप्स मिळवण्यासाठी पात्र होण्याकरता, तुम्ही खालील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही अर्ज करू शकता:

तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

तुमचे खाते चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे आणि तुम्ही आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सेवेच्या अटींचे अनुपालन करणे आवश्यक आहे.

तुमचे एक वैयक्तिक खाते असणे आवश्यक आहे. व्यावसायिक खाती सहभागी होण्यास अपात्र आहेत. नोट: जर तुम्ही अर्ज करताना पात्र नसाल तर तुम्ही पुन्हा तीस (30) दिवसांनंतर अर्ज करू शकता. तसेच, जर तुमच्या खात्याने कोणत्याही पात्रता निकषाचे उल्लंघन केले तर तुम्हाला टिप्स प्राप्त करण्यापासून कायमचे किंवा तात्पुरते काढून टाकले जाऊ शकते.

6.2. 2 Josh वर टिप्स प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करावा?

टिप्स प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याकरता:

1. Josh ॲपमध्ये, तळाशी असलेल्या प्रोफाईलवर टॅप करा.

2. तळाशी असलेल्या मेनू बटणावर टॅप करा.

3. क्रिएटर टूल्सवर टॅप करा, मग टिप्सवर टॅप करा.    

4. ‘अर्ज करा’ वर टॅप करा.

5. स्क्रीन-वरील सूचनांचे पालन करा. जर तुम्ही खाते सेटअप केले नसेल तर तर तुम्हाला त्यांच्या पेमेंट भागीदाराच्या चेकआऊट पेजवर नेले जाईल. या काही गोष्टी लक्षात ठेवा     :

 • तुम्हाला टिप्स प्राप्त झाल्यावर ताबडतोब त्या तुमच्या डॅशबोर्डवर दिसतील पण त्या तुमच्या डॅशबोर्डवर दिसण्यासाठी चोवीस (24) तासांपर्यंत वेळ लागू शकतो.    
 • पेमेंट भागीदाराने तुमच्या टिप्सवर प्रक्रिया केल्यावर, त्या तुमच्या बँक खात्यात दर आठवड्याला आपोआप जमा केल्या जातील. तुम्ही पेमेंट भागीदाराद्वारे तुमच्या बँक खात्याची माहिती अपडेट करू शकता.

7. तुमची मालकी आणि अधिकार 

7.1 याद्वारे तुम्ही हे मान्य करता, वचन देता आणि पुष्टी करता की प्लॅटफॉर्मवरील सर्व अधिकार, हक्क आणि स्वारस्य VerSe ने राखून ठेवले आहेत आणि हा करार, केवळ या कराराच्या अटींच्या आणि शर्तींच्या अधीन तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या वापराचा परवाना देतो. तुम्ही याद्वारे पुष्टी करता की हा करार म्हणजे VerSe ने तुम्हाला त्याच्या मालकीची कोणतीही मालमत्ता हस्तांतरीत केल्याचे दर्शवत  नाही. आणि मालमत्तेमधील सर्व अधिकार, मालकी आणि स्वारस्य VerSe कडेच राहतात.    

7.2 VerSe तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी, स्वत:चे आविष्कार प्रदर्शित करण्यासाठी आणि सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याच्या शक्यतेसाठी प्लॅटफॉर्म परवाना मोफत देते. तुम्हाला याद्वारे देत असलेल्या परवान्याच्या बदल्यात, तुम्ही याची पोच देता आणि हे मान्य करता की प्लॅटफॉर्मच्या तुमच्या वापरातून आणि तुम्ही त्यावर अपलोड केलेल्या कोणत्याही वापरकर्ता कन्टेन्टमधून, उदाहरणासह, पण त्यापुरतेच मर्यादित नाही, जाहिरात, प्रायोजकत्व, प्रमोशन्स, कन्टेन्ट मार्केटिंगसह मार्केटिंग आणि प्लॅटफॉर्मच्या बाहेरील इतर कोणत्याही मिडिया आणि वापराचा डेटा यावरील प्रमोशनल भागीदाऱ्यांद्वारे VerSemay महसूल निर्माण करू शकते, गुडविल वाढवू शकते, किंवा इतर प्रकारे त्याचे मूल्य वाढवू शकते आणि अशा महसुलात, गुडविलमध्ये किंवा कोणत्याही मूल्यामध्ये तुमचा कोणताही वाटा असणार नाही. तुम्ही पुढे याचीही पोच देता की तुम्ही प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असलेल्या कोणत्याही वापरकर्ता कन्टेन्टमधून, किंवा यात नमूद केल्यानुसार त्याच्या VerSe ने आणि/किंवा इतर वापरकर्त्यांनी केलेल्या वापरातून  कोणतेही उत्पन्न किंवा इतर मोबदला मिळवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नसेल आणि तुम्हाला (i) तुम्ही किंवा इतर कोणत्याही वापरकर्त्याने या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले कोणतेही वापरकर्ता कन्टेन्ट (ii) तुम्ही प्लॅटफॉर्मद्वारे तृतीय-पक्षी सेवेवर अपलोड केलेले कोणतेही वापरकर्ता कन्टेन्ट, याद्वारे  पैसे मिळवण्याच्या किंवा कोणताही मोबदला मिळवण्याच्या अधिकारापासून तुम्हाला प्रतिबंधित करण्यात येत आहे. (उदा. या प्लॅटफॉर्मद्वारे इतर शॉर्ट व्हिडीओ ॲप्लिकेशन्सवर अपलोड केलेल्या कोणत्याही UGC साठी पैसे मिळवण्यासाठी तुम्ही दावा करू शकत नाही.)

8. तुमचा परवाना आणि प्लॅटफॉर्म/सेवांचा वापर

8.1. याद्वारे VerSe तुम्हाला प्लॅटफॉर्मचा वैयक्तिक आणि अ-व्यावसायिक वापर करण्यासाठी अटींच्या अधीन केवळ मर्यादित, अ-हस्तांतरणीय, अन्योन्य नसलेला, परत घेता येणारा परवाना देते.  

8.2.  VerSe ने प्लॅटफॉर्मद्वारे देऊ केलेल्या सेवांसाठी वापरकर्त्याने पूर्व-नोंदणी करणे आवश्यक असू शकते. सेवांना  प्रवेश मिळवण्यासाठी, तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून खाते तयार करणे आवश्यक असेल. अशा नोंदणी प्रक्रिएच भाग म्हणून, तुम्ही आम्हाला लागू असलेल्या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेल्या तपशिलांची सध्याची, पूर्ण आणि अचूक माहिती देणे आवश्यक असेल. तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्णपासवर्ड आणि वापरकर्ता नाव निवडणेसुद्धा आवश्यक असेल, जे तुम्ही सदरच्या सेवांमध्ये प्रवेश मिळवताना दरवेळी एन्टर कराल. तुम्हाला एकाच नेटवर्कवर अनेक वापरकर्त्यांद्वारे एकच खाते आणि पासवर्ड वापरून प्रवेश मिळवण्याचा किंवा प्रवेशाची सुविधा देण्याचा हक्क नसेल. तुम्ही हे मान्य करत आणि तुम्हाला हे समजते की आम्ही प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग सर्व्हरमध्ये कॅशे करण्याची परवानगी देत नाही. तुमच्या पासवर्डची आणि खात्याची गोपनीयता कायम ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल. तुम्ही हे मान्य करता की तुमच्या खात्याच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व कृतींसाठी (आम्हाला आणि इतरांना) केवळ तुम्हीच जबाबदार आहात. खाते तयार करताना, तुम्ही तुमच्याबद्दल अचूक माहिती पुरवणे आणि केवळ वैयक्तिक वापरासाठी एकच खाते तयार करणे आवश्यक आहे.            

8.3 तुम्ही तुमच्या खात्याची माहिती आणि पासवर्ड इतर कोणाहीबरोबर शेअर करणार नाही किंवा इतर कोणाचेही खाते वापरणार नाही. तुमच्या खात्याच्या अंतर्गत घडणाऱ्या सर्व कृतींसाठी तुम्हीच पूर्णपणे जबाबदार आहेत. तुमच्या खात्याचा कोणताही अनधिकृत वापर झाल्यास किंवा सुरक्षेचे इतर कोणतेही उल्लंघन झाल्यास तुम्ही आम्हाला ताबडतोड सूचित करण्याचे मान्य करता. अशावेळी, आम्ही तुमचे खाते रिकव्हर करण्यासाठी मदत करण्याकरता आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू; मात्र, तुमचे खाते रीस्टोअर केले जाईल किंवा त्यातील कन्टेन्ट रिकव्हर केले जाईल, याची आम्ही हमी देऊ शकत नाही. तुमचा पासवर्ड किंवा खात्याच्या अनधिकृत वापराचा परिणाम म्हणून तुमच्या होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी आमचे कोणतेही दायित्व असणार नाही. मात्र, इतर कोणी तुमचे खाते किंवा पासवर्ड वापरल्यामुळे कंपनीला किंवा इतर पक्षाला होणाऱ्या नुकसानासाठी मात्र तुम्हाला उत्तरदायी धरले जाऊ शकते.    

8.4 फेसबुकद्वारे नोंदणी: तुम्ही तुमचे फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड वापरूनसुद्धा नोंदणी करू शकता (“फेसबुक कनेक्ट”). मात्र, जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्ही फेसबुक कनेक्ट वापरून सेवांमध्ये लॉग इन करू शकता आणि फक्त तुमचे आईवडील किंवा पालकांच्या पर्यवेक्षणाखाली सेवांचा वापर करू शकता. फेसबुक कनेक्ट वापरल्यामुळे आम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, प्रोफाईल, लाईक्स आणि इतर संबंधित माहितीच्या आधारे सेवा वापरतानाचा तुमचा अनुभव वैयक्तिकृत करता येतो आणि सुधारता येतो. जेव्हा तुम्ही हे वैशिष्ट्य वापरता तेव्हा तुम्ही या सेवेवरील तुमच्या कृतींच्या माहितीबद्दलची संमती स्पष्टपणे देता. तुम्ही तुमचे खाते बदलून/ गोपनीयता सेटिंग्ज बदलून फेसबुक कनेक्टद्वारे शेअर करण्यात येत असलेली माहिती नियंत्रित करू शकता. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी आणि तुमच्या फेसबुक खात्याच्या कोणत्याही संबंधित अनुपालनासाठी तुम्हीच पूर्णपणे जबाबदार आहात. फेसबुकद्वारे नोंदणी करून तुम्ही प्लॅटफॉर्मवर योग्य ठिकाणी पोस्ट केल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही अटींसह यात दिलेल्या अटी मान्य करता. प्रत्येक नोंदणी ही केवळ एका वैयक्तिक वापरकर्त्यासाठीच आहे.    

8.5 तुम्हाला या सेवांसाठी मिळालेला प्रवेश आणि वापर या अटी आणि लागू असलेले सर्व कायदे आणि नियमनांच्या अधीन आहे. तुम्ही हे करू शकणार नाही:

 • जर तुम्ही या अटी मान्य करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसाल तर तुम्ही या सेवांमध्ये प्रवेश किंवा सेवांचा वापर.
 • सेवांमध्ये प्रवेश करताना किंवा सेवांचा वापर करताना कोणतीही बेकायदेशीर, दिशाभूल करणारी, द्वेषपूर्ण किंवा कोणत्याही प्रकारे फसवणूक करणारी कृती करणे.
 • या सेवांचे किंवा कोणत्याही फाईल्स, टेबल्स किंवा डॉक्युमेंटेशनसह (किवा त्याच्या कोणत्याही भागासह)   त्यातील कोणत्याही कन्टेन्टच्या अनधिकृत प्रति बनवणे, बदल करणे, फेरफार करणे, भाषांतर करणे, रिव्हर्स इंजिनीअर करणे, डीसअसेम्बल करणे, डीकम्पाईल करणे किंवा त्यावरून कोणतेही उत्पादन तयार करणे किंवा सेवांमधील किंवा त्यावरून बनवलेल्या उत्पादनांमधील कोणताही सोर्स कोड, अल्गोरीदम्स, पद्धती किंवा तंत्रे निश्चित करणे किंवा निश्चित करण्याचा प्रयत्न करणे;          
 • कोणत्याही सेवा किंवा त्यावरून बनवलेली उत्पादने पूर्णपणे किंवा अंशत: वितरीत करणे, परवाना देणे, हस्तांतरीत करणे किंवा विकणे;
 • सेवा शुल्क घेऊन किंवा मोफत देणे, भाड्याने देणे, भाडेपट्टीने किंवा जाहिरात करण्यासाठी अथवा कोणत्याही व्यावसायिक विनंतीसाठी सेवांचा वापर करणे;
 • आमच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय कोणत्याही व्यावसायिक किंवा अनधिकृत कारणासाठी सेवांचा वापर करणे, यात कोणतीही व्यावसायिक जाहिरात किंवा विनंती किंवा स्पॅमिंग यांचे प्रसारण करणे  किंवा त्यासाठी सुविधा देण्याचा समावेश आहे;
 • सेवा योग्यप्रकारे काम करण्यामध्ये ढवळाढवळ करणे किंवा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणे, आमच्या वेबसाईटमध्ये किंवा कोणत्याही नेटवर्क्समध्ये  अडथळा आणणे किंवा आम्ही या सेवांना प्रवेश टाळण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी आम्ही वापरत असलेल्या कोणत्याही उपाययोजना वगळणे.    
 • सेवा किंवा त्यांचा कोणताही भाग कोणत्याही इतर प्रोग्रॅममध्ये किंवा उत्पादनात समाविष्ट करणे. अशावेळी, आमच्या संपूर्ण विवेकबुद्धीनुसार, आम्ही सेवा नाकारण्याचा, खाती बंद करण्याचा किंवा सेवांना प्रवेश मर्यादित करण्याचा आमचा अधिकार राखून ठेवतो;
 • सेवांकडून माहिती संकलित करण्यासाठी ऑटोमेटेड स्क्रिप्ट्स वापरणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे सेवांशी संवाद साधणे;  
 • दुसरी कोणतीही व्यक्ती किंवा एंटीटी असल्याची बतावणी करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे तुमचे कोणत्याही व्यक्तीशी किंवा एंटीटीशी असलेले नाते चुकीच्या पद्धतीने दर्शवणे, यामध्ये तुम्ही अपलोड केलेला, पोस्ट केलेला, ट्रान्समिट केलेला, वितरीत केलेला किंवा सेवेतून उत्पन्न झालेला कोणताही कन्टेन्ट इतर कोणत्याहीप्रकारे उपलब्ध करणे याचा यात समावेश आहे;        
 • इतरांना घाबरवणे किंवा छळणे, किंवा लैंगिकदृष्ट्या भडक सामग्री, हिंसा किंवा वंश, लिंग, धर्म, राष्ट्रीयत्व, अपंगत्व, लैंगिक अभिमुखता किंवा वय यावर आधारित भेदभावाचा प्रचार करणे;    
 • सेवांचा अशाप्रकारे वापर करणे ज्यातून हितसंघर्ष   निर्माण होईल किंवा सेवेचा हेतू धोक्यात येईल, उदा. इतर वापरकर्त्यांसह रिव्ह्यूजची देवाणघेवाण करणे किंवा बनावट रिव्ह्यूज लिहिणे किंवा त्यासाठी विनंती करणे;
 • खालील गोष्टी अपलोड करण्यासाठी, ट्रान्समिट करण्यासाठी, वितरीत करण्यासाठी, साठवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारे उपलब्ध करण्यासाठी सेवांचा वापर करणे:  
 • व्हायरसेस, ट्रोजन्स, वर्म्स, लॉजिक बॉम्ब्स किंवा इतर दुर्भावनापूर्ण किंवा तंत्रज्ञानदृष्ट्या हानिकारक मटेरियल समाविष्ट असलेल्या फाईल्स;        
 • कोणत्याही नको असलेल्या जाहिराती, विनंत्या, प्रमोशनल सामग्री, “जंक मेल”, “स्पॅम”, “चेन लेटर्स”, “पिरॅमिड योजना” किंवा प्रतिबंध असलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या विनंत्या.  
 • कोणत्याही तृतीय पक्षाची पत्ते, फोन नंबर्स,ईमेल पत्ते, वैयक्तिक ओळख डॉक्युमेंटमधील क्रमांक आणि वैशिष्ट्य (उदा. राष्ट्रीय विमा क्रमांक, पासपोर्ट नंबर्स) किंवा क्रेडीट कार्ड क्रमांक यासह कोणतीही खाजगी माहिती;
 • कोणतीही सामग्री जी कोणताही कॉपीराईट, ट्रेडमार्क किंवा इतर बौद्धिक संपदा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी अधिकारांचे उल्लंघन करते किंवा उल्लंघन करू शकेल;
 • कोणतीही सामग्री जी कोणत्याही व्यक्तीची बदनामी करते, अश्लील, आक्षेपार्ह, पोर्नोग्राफिक, द्वेषपूर्ण किंवा भडकवणारी आहे;  
 • अशी कोणतीही सामग्री जिच्यामध्ये गुन्हयासाठी, धोकादायक कृत्यांसाठी किंवा स्वत:ला-इजा करण्यासाठी सूचना आहेत, प्रोत्साहन देते किंवा सूचना देते;
 • अशी कोणतीही सामग्री जी हेतूपूर्वक लोकांना चिथावणी देणे किंवा वितुष्ट आणणे, विशेषत: ट्रोलिंग करणे आणि बुलिंग करणे यासाठी तयार केली आहे किंवा जिचा हेतू लोकांचा छळ करणे, त्रास देणे, भावना दुखावणे, घाबरवणे, धोका निर्माण करणे, लाजवणे किंवा नाराज करणे असा आहे.  
 • अशी कोणतीही सामग्री जिच्यामध्ये शारीरिक हिंसेच्या धमक्यांसह कोणत्याही प्रकारची धमकी आहे;
 • अशी कोणतीही सामग्री जी वंशद्वेषी किंवा भेदभावपूर्ण आहे, ज्यामध्ये एखाद्याचा वंश, धर्म, वय, लिंग, अपंगत्व किंवा लैंगिकता याच्या आधारावर असलेला भेदभाव समाविष्ट आहे;    
 • कोणतीही उत्तरे, प्रतिसाद, टिप्पण्या, मते, विश्लेषण किंवा शिफारसी ज्या देण्यासाठी तुमच्याकडे योग्य परवाना नाही किंवा अन्यथा तुम्ही अपात्र आहेत; किंवा

8.6 Josh द्वारे कन्टेन्ट काढून टाकला जाणे / वापरकर्ता प्रोफाईलवर बंदी घालणे:

वर नमूद केलेल्या बाबींशिवाय, तुम्हाला सेवेला असलेला प्रवेश आणि सेवांचा वापर, सर्व काळ आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करणारा असला पाहिजे.

आमच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाशिवाय कोणत्याही वेळी आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, कन्टेन्टला असलेला प्रवेश काढून टाकण्याचा किंवा अक्षम करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे. आम्ही कन्टेन्टला असलेला प्रवेश काढून टाकण्याच्या किंवा अक्षम करण्याच्या कारणांमध्ये कन्टेन्ट आक्षेपार्ह असणे, या अटींचा भंग करणारा असणे किंवा सेवेसाठी किंवा आमच्या वापरकर्त्यांसाठी अन्यप्रकारे हानिकारक असणे यांचा समावेश आहे. वैयक्तिकरित्या सुसंगत असलेले कस्टमाईझ्ड सर्च रिझल्ट्स, टेलर्ड जाहिराती आणि स्पॅम तसेच मालवेअर डीटेक्शन यासारखी उत्पादनाची वैशिष्ट्ये तुम्हाला पुरवण्यासाठी आमच्या ऑटोमेटेड सिस्टीम्स तुमच्या कन्टेन्टचे विश्लेषण करतील.

आमच्या प्लॅटफॉर्मचा तुमचा वापर अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांद्वारे शासित आहे. जर आमच्या कोणत्याही वापरकर्त्याने अशी तक्रार केली की तुमचा कन्टेन्ट अटींचा आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करतो तर आम्ही असा कन्टेन्ट आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकू शकतो. अटींच्या आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या भंगाबद्दल एकापेक्षा जास्त तक्रारी आल्यास, आम्हाला तुमचे आमच्याकडे असलेले खाते बंद करणे भाग पडेल आणि तुम्हाला आमच्याकडे नोंदणी करण्यास प्रतिबंध करावा लागेल. अशा काढून टाकण्याविरुद्ध तुम्हाला अपील करायचे असल्यास, तुम्ही आम्हाला grievance.officer@myjosh.in येथे इमेल पाठवू शकता.      

8.7 तुमच्या डिव्हायसेसवर इन्स्टॉलेशन केल्यावरसुद्धा या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला परवाना देण्यात येतो, विक्री केली जात नाही. VerSe हा परवाना करार किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही बंधनांशिवाय असाईन करू शकते. तुम्हाला या परवान्याच्या अंतर्गत असलेले तुमचे अधिकार कोणत्याही तृतीय पक्षाला असाईन, हस्तांतरीत करण्याची किंवा उप-परवाना देण्याची परवानगी नाही.  

9. कन्टेन्ट: आमचे कन्टेन्ट आणि वापरकर्ता-निर्मित कन्टेन्ट

9.1 सेवांच्या वापरकर्त्यांना सेवांद्वारे कन्टेन्ट अपलोड, पोस्ट किंवा ट्रान्समिट (उदा. एखाद्या स्ट्रीमच्या माध्यमातून) करण्याची किंवा इतर प्रकारे उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळू शकते, ज्यामध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय त्यात अंतर्भूत असलेले टेक्स्ट, छायाचित्रे, वापरकर्त्याचे व्हिडिओज, ध्वनिमुद्रणे आणि संगीतमय रचना यांचा, तसेच तुमचा वैयक्तिक संगीत संग्रह आणि सभोवतालचे आवाज यांचा वापर करून स्थानिक रूपात जतन केलेली ध्वनिमुद्रणे अंतर्भूत असलेले व्हिडिओज यांचा, समावेश आहे (एकत्रितपणे “वापरकर्ता कन्टेन्ट”).सेवांचे वापरकर्ते दुसर्‍या वापरकर्त्याने तयार केलेल्या वापरकर्ता कन्टेन्टमधून सर्व किंवा काही भाग घेऊन अतिरिक्त वापरकर्ता कन्टेन्टची निर्मिती करू शकतात ज्यामध्ये, एकाहून जास्त वापरकर्त्यांनी निर्माण केलेले वापरकर्ता कन्टेन्ट एकत्रित करून आणिमिसळून, इतर वापरकर्त्यांच्या सहयोगाने तयार केलेल्या वापरकर्ता कन्टेन्टचा समावेश आहे.सेवांचे वापरकर्ते या वापरकर्ता कन्टेन्टवर सेवेने पुरवलेले संगीत, ग्राफिल्स, स्टिकर्स आणि इतर घटक ओव्हरले करून हे वापरकर्ता कन्टेन्ट सेवेद्वारे ट्रान्समिट करू शकतात. इतर वापरकर्त्यांनी सेवेविषयी व्यक्त केलेली मते आमच्या मतांचे किंवा मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

9.2 तुम्हाला समजते की तुम्ही सेवेवर, सेवेद्वारे किंवा सेवेशी संबंधित पोस्ट, अपलोड, ट्रान्समिट, शेअर करत असलेल्या, किंवा इतर प्रकारे उपलब्ध करून देत असलेल्या, वापरकर्ता कन्टेन्टची मालकी आणि जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही सेवेचा वापर करून आम्हाला किंवा इतर कुणाला हानी पोचेल, सेवेमध्ये व्यत्यय येईल अशी कृती न करण्यास किंवा कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारे सेवेचा वापर न करण्यास सहमती देता. तुम्ही हमी देता की तुम्ही आमच्याकडे सबमिट केलेले वापरकर्ता कन्टेन्ट कोणत्याही पेटंटचे, ट्रेडमार्कचे, ट्रेड सिक्रेटचे, कॉपीराईटचे, किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या बौद्धिक किंवा मालकी किंवा खाजगी हक्काचे उल्लंघन करत नाही आणि त्यात कोणत्याही अश्लील किंवा आक्षेपार्ह साहित्याचा समावेश नाही. सेवांचा क्सेस मिळवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची अट म्हणून तुम्ही कोणत्याही बौद्धिक मालमत्ता हक्कांचे उल्लंघन न करण्यास सहमती देता.कुठल्याही वापरकर्त्याने कोणत्याही कॉपीराईटचे किंवा इतर बौद्धिक मालमत्ता हक्कांचे उल्लंघन केल्यास किंवा तसा त्याच्यावर आरोप झाल्यास, आम्ही कधीही, सूचना देऊन अथवा न देता आणि आमच्या विवेकबुध्दीनुसार, त्याचा क्सेस ब्लॉक करण्याचा किंवा खाते रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवतो. कोणत्याही तृतीय पक्षाच्या बौद्धिक मालमत्तेचा वापर करण्यासाठी तुम्हाला बौद्धिक मालमत्तेच्या मालकाची थेट परवानगी घ्यावी लागू शकते.

9.3 सर्व वापरकर्ता कन्टेन्ट गोपनीय नसलेले आणि मालकी हक्क नसलेले समजले जाईल. तुम्हाला जर एखादे वापरकर्ता कन्टेन्ट खाजगी किंवा मालकी हक्क असलेले वाटत असल्यास ते सेवांवर किंवा सेवांद्वारे पोस्ट करू नये किंवा आमच्याकडे ट्रान्समिट करू नये. जेव्हा तुम्ही सेवांद्वारे वापरकर्ता कन्टेन्ट समबिट करता, तेव्हा त्या वापरकर्ता कन्टेन्टची मालकी तुमच्याकडे असल्याचे, किंवा कन्टेन्टचा कोणताही भाग सेवांकडे सबमिट करण्यासाठी, तो भाग सेवांवरून तृतीय पक्षीय प्लॅटफॉर्म्सवर ट्रान्समिट करण्यासाठी, आणि/किंवा कोणतेही तृतीय पक्षीय कन्टेन्ट वापरण्यासाठी लागणारी आवश्यक परवानगी, मंजुरी मालकाकडून तुम्हाला मिळाल्याचे किंवा तुम्हाला त्याचा अधिकार दिला असल्याचे, मान्य करता आणि दर्शवता.

9.4 तुमच्याकडे एखाद्या ध्वनिमुद्रणाचे केवळ हक्क आहेत पण अशा ध्वनिमुद्रणामध्ये अंतर्भूत असलेल्या मूलभूत संगीत निर्मितीचे हक्क नाहीत, अशा परिस्थितीमध्ये या कन्टेन्टच्या कुठल्याही भागाच्या मालकाने सेवांमध्ये ते सबमिट करण्याच्या सर्व परवानगी, मंजुरी तुम्हाला दिल्या असल्याचा किंवा तुम्हाला त्यासाठी अधिकृत केले असल्याचा अपवाद वगळता, तुम्ही अशा प्रकारची ध्वनिमुद्रणे सेवांवर पोस्ट करू नये.

सेवांवरून किंवा सेवांद्वारे उपलब्ध करून दिलेली ध्वनिमुद्रणे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या संगीत निर्मितीच्या बाबत हक्क परवाना दिला जात नाही.

9.5 आम्ही कोणत्याही वापरकर्ता कन्टेन्टचे समर्थन करत नाही, त्याला पाठिंबा देत नाही, तसे विधान करत नाही किंवा त्याच्या पूर्णतेची, खरेपणाची, अचूकतेची किंवा विश्वसनीयतेची हमी देत नाही किंवा त्यात व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. तुम्हाला हे समजते की सेवांचा वापर करून तुम्ही आक्षेपार्ह, हानिकारक, चुकीच्या किंवा अन्यथा अयोग्य अशा कन्टेन्टच्या किंवा काही प्रकरणांमध्ये चुकीचे वर्णन असलेल्या किंवा अन्यथा फसव्या पोस्ट्सच्या संपर्कात येऊ शकता. सर्व कन्टेन्टची संपूर्ण जबाबदारी मूलत: अशा कन्टेन्टची निर्मिती करणार्‍या व्यक्तीची आहे.

9.6 तुम्ही असे कोणतेही कृत्य करणार नाही किंवा अशा कृत्यात गुंतणार नाही, किंवा अशा कृत्याला प्रोत्साहन देणार नाही, प्रवृत्त करणार नाही, अशा कृत्याची मागणी करणार नाही किंवा पाठिंबा देणार नाही, जे कृत्य फौजदारी गुन्हा समजले जाईल, ज्यामुळे दाव्याचा खटला दाखल होऊ शकेल किंवा अन्यथा त्यामुळे कोणत्याही कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन होईल किंवा तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनधिकृत हेतूसाठी प्लॅटफॉर्मचा वापर करणार नाही.

9.7 तसेच, तुमच्या वापरकर्ता कन्टेन्टचे स्रोत तुम्ही आहात हे प्रस्थापित करण्यासाठी, तुम्ही आम्हाला तुमचे वापरकर्ता नाव, इमेज, आवाज आणि साधर्म्य वापरण्याचा रॉयल्टी-मुक्त परवाना देता.

9.8 तुम्ही अटी आणि शर्ती स्वीकार करून हे मान्य करता की, तुम्ही आम्हाला कन्टेन्ट पुरवता किंवा इतरांनी पुरवलेले कन्टेन्ट पाहता, या कन्टेन्टच्या अचूकतेसह आणि पूर्णतेसह तुम्ही हे तुमच्या विवेकानुसार आणि स्वत:च्या जोखमीवर करत आहात. आमच्या अटींचे उल्लंघन करणारे कन्टेन्ट काढून टाकण्याचे किंवा ते काढून टाकण्याचे  सर्व अधिकार VerSe कडे आहेत.

9.9 आमच्या विवेकबुद्धीनुसार, सूचना देऊन किंवा न देता, कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाविना, कधीही कन्टेन्ट काढण्याचे किंवा त्याचा क्सेस निष्क्रिय करण्याचे अधिकार आमच्याकडे राहतील. कन्टेन्ट काढण्याच्या किंवा त्याचा क्सेस निष्क्रिय करण्याच्या काही कारणांमध्ये, कन्टेन्ट आक्षेपार्ह वाटणे, कन्टेन्टमुळे या अटी किंवा समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होणे, किंवा सेवेकरता किंवा आमच्या वापरकर्त्यांकरता कन्टेन्ट अन्यथा हानिकारक असणे, या कारणांचा समावेश होऊ शकतो.  कस्टमाइज्ड शोध निकाल, अनुरूप जाहिरात आणि स्पॅम आणि मालवेअरचा तपास यासारखी तुमच्याकरता वैयक्तिकदृष्ट्या योग्य अशी उत्पादन वैशिष्ट्ये देण्याकरता, आमची स्वयंचलित यंत्रणा तुमच्या कन्टेन्टचे विश्लेषण करते. कन्टेन्ट पाठवल्यावर, मिळाल्यावर, आणि जतन केल्यावर हे विश्लेषण होत असते.

9.10 JOSH चे लाइव्ह वैशिष्ट्य:

(a) वापरकर्त्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑडिओ आणि/किंवा ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्ट “रिअल टाइम” या तत्त्वावर लाइव्ह स्ट्रीम करणे शक्य होऊ शकते (“JOSH लाइव्ह कन्टेन्ट” किंवा “लाइव्ह कन्टेन्ट”). काही प्रकरणांमध्ये, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाइव्ह कन्टेन्ट फक्त “रिअल टाइम” कालावधीमध्ये जेव्हा लाईव्ह स्ट्रीम प्रत्यक्ष होत असते तेव्हा उपलब्ध करून दिले जाऊ शकते किंवा लाईव्ह सत्रानंतर मर्यादित काळासाठी ते  प्लॅटफॉर्मवर किंवा इतर वापरकर्त्यांना उपलब्ध असू शकते. उरलेल्या प्रकरणांमध्ये, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाइव्ह कन्टेन्ट “रिअल टाइम” कालावधीमध्ये जेव्हा लाईव्ह स्ट्रीम प्रत्यक्ष होत असते तेव्हा,तसेच सुरुवातीच्या “रिअल-टाइम” लाईव्ह स्ट्रीमनंतर (अशा प्रकारच्या लाईव्ह कन्टेन्टच्या जतन केलेल्या आणि रेकॉर्ड केलेल्या आवृत्तीच्या रूपात) लाईव्ह कन्टेन्टची निर्मिती करणारा संबंधित वापरकर्ता जोपर्यंत ते प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत नाही तोपर्यंत उपलब्ध करून दिले जाऊ शकते. “लाईव्ह-स्ट्रीम”/अपलोड होणारे कन्टेन्ट येथील अटींना अनुसरून पुरवण्याची तसेच अशा प्रकारच्या कन्टेन्टची कामगिरी आणि/किंवा त्याचा दर्जा याविषयी इतर वापरकर्त्यांबरोबर असलेल्या विवादांचे निराकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट “लाईव्ह-स्ट्रीम”/अपलोड करणार्‍या वापरकर्त्यांची असेल. काही शंका राहू नये यासाठी लाईव्ह कन्टेन्टला “वापरकर्ता कन्टेन्ट” आणि “UGC” मानले जाईल ज्याची येथे व्याख्या करण्यात आली आहे आणि प्रत्येक वापरकर्ता, जो प्लॅटफॉर्मवर लाईव्ह कन्टेन्ट स्ट्रीम, अपलोड करतो आणि अन्यथा इतर वापरकर्त्यांना उपलब्ध करून देतो, हे मान्य करतो की अशा प्रकारचे कन्टेन्ट हे मंजूर केलेला वापरकर्ता कन्टेन्ट परवाना आणि येथे वापरकर्ता कन्टेन्टला लागू असलेल्या इतर सर्व अटी आणि शर्तीच्या (समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर सर्व विधाने आणि हमीसह पण तेवढ्यापुरते मर्यादित नसलेले) अधीन असेल. शेवटी, तुम्ही हे कबूल आणि मान्य करता की, लाईव्ह कन्टेन्टमध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि फंक्शनॅलिटीज (उदा. शेअरिंग, कमेंटिंग, इंटरक्टिविटी वैशिष्ट्ये) असू शकतात, लाईव्ह कन्टेन्टची काही वैशिष्ट्ये आणि फंक्शनॅलिटीज, ज्या अन्यथा प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या इतर प्रकारच्या वापरकर्ता कन्टेन्टवर उपलब्ध आहेत, त्या वैशिष्ट्यांवर आणि फंक्शनॅलिटीजवर कंपनी निर्बंध घालू शकते.

(b) लाईव्ह कन्टेन्टशी संबंधित सर्व लागू कायदे, नियम आणि नियमनांचे पालन करण्यास तुम्ही सहमती देता. या अटींच्या तुमच्या स्वीकृतीस अनुसरून, लाईव्ह कन्टेन्ट आणि असल्यास, संग्रहित केलेले कन्टेन्ट, हे वापरकर्ता निर्मित कन्टेन्ट, जे लागू असेल ते, समजले जाईल. तसेच, सर्व मंजुऱ्या, परवाने, लायसन्स, नोंदणी किंवा सूचनेविषयक आवश्यकता यांसह, पण तेवढ्यापुरते मर्यादित नसलेल्या, लाईव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रातील सर्व नियमन आवश्यकतांची पूर्तता तुम्ही केली आहे, आणि लाईव्ह कन्टेन्टच्या कालावधीकरता तुम्ही असे सर्व परवाने (लागू असल्यास ब्रॉडकास्टिंग परवान्यांनसह), नोंदण्या, संमती, सूचना किंवा मंजुऱ्या ठेवाल याची तुम्ही हमी देता आणि तसे विधान करता.

(c) या अटी तुमचा खालील गोष्टींचा वापर नियंत्रित करतात: (i)Josh कॅमेरा वैशिष्ट्य किंवा प आणि सोबतच्या एखाद्या फाइलमध्ये चिन्हांकित केलेले कोणतेही इतर सॉफ्टवेअर आणि साधने जी या कराराच्या अधीन असतील (एकत्रितपणे, Josh कॅमेरा सॉफ्टवेअर); आणि (ii)Josh कॅमेरा सॉफ्टवेअरशी संबंधित काही कागदपत्रे ज्यामध्ये प्लॅटफॉर्म, प्स, किंवा इतर मार्गाने वापरकर्त्याला उपलब्ध करून दिलेली व्हिडिओ ट्यूटोरिअल्स आणि माहिती यांचा समावेश आहे (एकत्रितपणे, कागदपत्रे), अटी किंवा VerSe ने अन्यथा लेखी स्वरूपात नमूद केल्यानुसार. VerSe आपल्या विवेकबुद्धीनुसार Josh कॅमेरा सॉफ्टवेअर आणि कागदपत्रे (एकत्रितपणे, Josh कॅमेरा) डाउनलोडद्वारे किंवा इतर मार्गाने उपलब्ध करून देऊ शकतात. तुम्ही Josh कॅमेरा ज्या तारखेला डाउनलोड, इन्स्टॉल, क्सेस करता, किंवा वापरता त्या तारखेपासून या अटी लागू होतात (“लागू तारीख”).

10. बौद्धिक संपदा अधिकार आणि परवाना 

10.1. तुमचा या प्लॅटफॉर्मचा वापर प्रताधिकार, ट्रेडमार्क, पेटंट आणि ट्रेड सिक्रेट आणि बौद्धिक संपदेच्या वापरासंबंधी कायद्यांनी शासित केलेला आणि त्यांच्या अधीन आहे आणि नेहमीच असेल. तुम्ही प्रताधिकार, ट्रेडमार्क, पेटंट आणि ट्रेड सिक्रेटची मालकी आणि बौद्धिक संपदेच्या वापरासंबंधीच्या कायद्यांचे पालन कराल. तसेच तुमचं डिव्हाईसद्वारे तुम्ही केलेल्या प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे होणारा कोणत्याही कायद्याचा भंग आणि कोणत्याही बौद्धिक संपदा अधिकारांचे कोणतेही उल्लंघन यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असाल. पूर्वसूचना देऊन किंवा न देता, कोणत्याही वेळी आणि संपूर्णपणे आमच्या विवेकबुद्धीनुसार, कोणत्याही प्रताधिकाराचे किंवा इतर बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही वापरकर्त्याच्या खात्यांना प्रवेश प्रतिबंधित करण्याचा आणि/किंवा खाती बंद करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. कोणत्याही तृतीय पक्षाच्या बौद्धिक संपदेच्या वापरासाठी, तुम्हाला या बौद्धिक संपदेच्या मालकाकडून थेट परवानगी घेणे आवश्यक असू शकते.  

10.2 आमची बौद्धिक संपदा: प्लॅटफॉर्मवरील सर्व ट्रेडमार्क्स, ब्रँड्स आणि सर्व्हिस मार्क्स हे VerSe ची मालमत्ता आहेत किंवा त्यांचा परवाना VerSe कडे आहे. प्लॅटफॉर्मशी संबंधित सर्व प्रताधिकार आणि डेटाबेसेसची मालकी VerSe कडे आहे. या वेबसाईटवर असलेला कन्टेन्ट ज्यामध्ये VerSe रिपोर्ट्स, मजकूर, ग्राफिक्स, लोगोज, आयकॉन्स आणि इमेजेसचा समावेश आहे पण हे त्यापुरतेच मर्यादित नाही ही संपूर्णपणे VerSe ची मालमत्ता आहे आणि इतर सबंधित मालकांनी VerSe ला अशी मालमत्ता वापरण्याचा अधिकार आणि परवाना दिलेला आहे आणि त्याला भारतीय प्रताधिकार कायद्याचे संरक्षण आहे. सर्व ट्रेडमार्क्स, सर्व्हिसमार्क्स आणि ट्रेड नेम्स VerSe च्या किंवा इतर संबंधित मालकांच्या मालकीची आहेत ज्यांनी VerSe ला असे मार्क्स वापरण्याचा अधिकार आणि परवाना दिला आहे. प्लॅटफॉर्म आणि त्याच्यात अंतर्भूत असलेले कोणतेही तंत्रज्ञान किंवा प्लॅटफॉर्मच्या संदर्भात वापरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये VerSe चे किंवा तिच्या व्यावसायिक भागीदारांचे, सहयोग्यांचे किंवा इतर तृतीय पक्षांचे अधिकार असू शकतात. तुमच्या डिव्हायसेसवर इन्स्टॉलेशन केल्यावरसुद्धा या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला परवाना देण्यात येतो, विक्री केली जात नाही. VerSe हा परवाना करार किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही बंधनांशिवाय असाईन करू शकते. तुम्हाला या परवान्याच्या अंतर्गत असलेले तुमचे अधिकार कोणत्याही तृतीय पक्षाला असाईन, हस्तांतरीत करण्याची किंवा उप-परवाना देण्याची परवानगी नाही.      

10.3 कोणतीही बौद्धिक संपदा जी VerSe च्या मालकीची असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही, ती संबंधित मालकांच्या मालकीची असेल आणि कोणताही भंग, उल्लंघन किंवा दुसऱ्याची मालमत्ता आपली असल्याची दर्शवणे  यासाठी तुमच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार त्या मालकांना असेल. बौद्धिक संपदेच्या मालकाची लेखी पूर्ण संमती घेतल्याशिवाय / खास परवाना मिळवल्याशिवाय तुम्ही प्रताधिकार असलेले काम. ट्रेडमार्क्स किंवा मालकीची असलेली इतर माहिती डाऊनलोड करणार नाही किंवा इतरांना डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही.

10.4 तुम्ही तुमच्या कन्टेन्टची मालकी स्वत:कडे असणे सुरू ठेवता आणि तुम्ही अपलोड केलेल्या, पोस्ट केलेल्या किंवा ट्रान्समिट केलेल्या (उदा. स्ट्रीमद्वारे) किंवा इतरप्रकारे सेवेद्वारे उपलब्ध केलेल्या, ज्यात कोणताही मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओज, ध्वनीमुद्रणे यांचा समावेश आहे पण त्यापुरतेच मर्यादित नाही, अशा कन्टेन्टचा परवाना आम्हाला देता. आम्हाला पाठवलेल्या वापरकर्ता कन्टेन्टच्या प्रताधिकाराची मालकी अजूनही तुमच्याकडे किंवा तुमच्या वापरकर्ता कन्टेन्टच्या मालकाकडेच असते, पण सेवेद्वारे वापरकर्ता कन्टेन्ट सबमिट करून तुम्ही याद्वारे आम्हाला तुमचे वापरकर्ता कन्टेन्ट कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरण्यासाठी, फेरफार करण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी आणि/किंवा ट्रान्समिट करण्यासाठी, आणि/किंवा वितरीत करण्यासाठी सेवेच्या इतर वापरकर्त्यांना आणि इतर तृतीय पक्षांना पाहण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी, वापरण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी, फेरफार करण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी आणि/किंवा ट्रान्समिट करण्यासाठी अधिकृतता देणारा, कोणत्याही अटीशिवाय, परत घेता न येणारा, अन्योन्य नसलेला, रॉयल्टी-मुक्त, पूर्णत: हस्तांतरीत करता येणारा, कायमस्वरूपी, जगभरात चालणारा परवाना देता.  

10.5 तुम्ही याद्वारे VerSe ला तुमचा कन्टेन्ट उपलब्ध करण्यासाठी आणि तुम्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलेल्या कन्टेन्टला प्रवेश करण्यासाठी, कन्टेन्टचा वैयक्तिक वापर करण्यासाठी आणि प्रती बनवण्यासाठी, पुनर्निर्माण करण्यासाठी, फेरफार करण्यासाठी, त्यापासून इतर गोष्टी निर्माण करण्यासाठी, व्यावसायिकदृष्ट्या वापर करण्यासाठी, सार्वजनिकरीत्या प्रकाशित, प्रसारित करण्यासाठी जगभरात चालणारा, रॉयल्टी-मुक्त, कायमस्वरूपी, अन्योन्य नसलेला, परत घेता न येणारा, हस्तांतरीत करता न येणारा, असाईन करता येणारा, उप-परवाना देता येणारा अधिकार आणि अमर्यादित परवाना देता. तुम्हाला हे समजते आणि तुम्ही हे मान्य करता की प्लॅटफॉर्मवरील किंवा इतर प्लॅटफॉर्म्स, ॲप्लिकेशन्स, सोशल मिडीया पेजेस किंवा इतर कोणतेही डिव्हाईस किंवा तिच्या नियंत्रणात असलेले डिस्प्लेचे/कम्युनिकेशनचे माध्यम यावरील कन्टेन्टसाठी VerSe या अधिकारांचा वापर करू शकते. तुम्ही पुढे हेसुद्धा मान्य करता आणि स्वीकारता की तुमचा कन्टेन्ट, इतर कोणत्याही तृतीय पक्षी प्लॅटफॉर्मवर यात स्पष्टपणे परवानगी न दिलेल्या कोणत्याही प्रकारे तुमचा कन्टेन्ट आणि इतर सामग्री वापरू शकतो, आणि तो  विविध तृतीय-पक्षी प्लॅटफॉर्म्सवर ज्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, ट्विटर, मिडिया चॅनेल्ससारखे इतर तृतीय पक्षी प्लॅटफॉर्म्स यासारखे सोशल मिडिया चॅनेल्स आणि इतर तृतीय पक्षी साईट्स आणि सेवा यासह पण यापुरतेच मर्यादित नसलेल्या ठिकाणी शेअर करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी, वापरण्यासाठी आम्हाला तुमची उघड परवानगी किंवा संमती आवश्यक नाही. तुम्ही असे विधान करता की या करारानुसार आणि या प्लॅटफॉर्मच्या धोरणानुसार आणि लागू असलेले सर्व कायदे आणि नियमांनुसार  तुम्हाला VerSe  ला या अधिकारांची परवानगी देण्याची अधिकृतता आहे. तुम्ही याची पोच देता, पुष्टी करता आणि मान्य करता की तुम्ही पोस्ट करत असलेल्या कन्टेन्टमधील सर्व बौद्धिक संपदा अधिकार तुमच्याकडे आहेत किंवा तुमच्याकडे असा कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवर पोस्ट, प्रदर्शित, पुनर्निर्मित करण्यासाठी, प्रती बनवण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी, सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यासाठीचा वैध परवाना आहे.  

10.6 कन्टेन्ट वितरण: तुम्हाला हे समजते आणि तुम्ही हे मान्य करता की तुमचे कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यासाठी आणि तुम्ही प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्मबाहेर (तृतीय पक्षी प्लॅटफॉर्म/मिडीयाद्वारे) व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक दोन्ही हेतूंनी उपलब्ध करून दिलेल्या कन्टेन्टच्या प्रती बनवण्यासाठी, सार्वजनिकरीत्या प्रकाशित करण्यासाठी, पुनर्निर्माण करण्यासाठी, फेरफार करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी VerSe कडे खास, जगभरात चालणारा, रॉयल्टी-मुक्त, कायमस्वरूपी, अमर्यादित आणि प्रतिबंध नसलेला परवाना आहे. तुम्हाल हे समजते आणि तुम्ही हे मान्य करता की VerSe ला दिलेल्या परवान्याच्या अधिकारांमध्ये तुम्ही प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या कन्टेन्ट मध्ये अस्तित्वात असलेल्या बौद्धिक संपदा अधिकारांचा समावेश होतो (त्यात प्रताधिकार, ट्रेडमार्क, डिझाईन्स आणि पेटंट यांचा समावेश आहे पण त्यापुरतेच मर्यादित नाही)  

10.7 तुमचे कन्टेन्ट तुमचेच राहते, याचाच अर्थ असा की तुमच्या कन्टेन्टमध्ये असलेले तुमचे सर्व बौद्धिक संपदा अधिकार तुम्ही कायम राखता.

10.8 तुम्हाला हे समजते आणि तुम्ही हे मान्य करता की वापरकर्ता कन्टेन्ट आपल्या व्यावसायिक भागीदारांना, सहयोग्याना, तृतीय पक्षांना आणि इतर कोणत्याही एंटीटीला (एंटीटीजना) आपल्या विवेक बुद्धीनुसार आवश्यक वाटेल त्याप्रमाणे वितरीत करण्याचा अधिकार VerSe ने राखून ठेवला आहे.    

10.9 प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट पोस्ट करून, तुम्ही याची पुष्टी करता की तुम्ही सर्व कन्टेन्ट आणि त्यात अंतर्भूत असलेले काम याचे मालक आहात किंवा तुम्हाला हा कन्टेन्ट या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करण्यासाठी मालकाने अधिकृतता दिलेली आहे.

11. गोपनीयता

11.1 तुम्ही याद्वारे सहमत आहात की तुम्ही प्लॅटफॉर्म किंवा VerSe बद्दलची कोणतीही अशी गोपनीय माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला उघड करणार नाही जी प्लॅटफॉर्म डाउनलोड करणे, इन्स्टॉल करणे, क्सेस करणे किंवा प्लॅटफॉर्म वापरणे किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने तुमच्या ताब्यात आलेली असू शकते. तुम्ही हेदेखील मान्य करता की कोणत्याही परिस्थितीत, या कराराचे उल्लंघन करून अशी गोपनीय माहिती तुमच्याद्वारे उघड झाल्यास, VerSe, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, तुमचे खाते(ती) हटवून, तुम्हाला कोणतीही सूचना न देता, किंवा इतर कोणतीही खाती काढून हा करार रद्द करू शकते. कायदेशीर उपाय जे वाजवी आणि कायदेशीर मानले जाते.

11.2 गोपनीय माहिती एखाद्या तृतीय पक्षाला दिली गेल्याचे तुम्हाला माहीत झाल्यास, तुम्ही त्याबाबत ताबडतोब VerSe ला कळवाल.

12. वापरकर्त्याचे दायित्व/नियम आणि कायदे

प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट आणि दुसऱ्या वापरकर्त्याशी संबंधित कोणताही वापरकर्ता कन्टेन्ट यांचा, प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिलेली साधने, उत्पादने, सेवा, फंक्शनॅलिटी आणि/किंवा वैशिष्ट्यांच्या वापराद्वारे वगळता किंवा VerSe, संबंधित वापरकर्ता आणि/किंवा संबंधित तृतीय-पक्षीय मालक यांच्या प्रत्येक वेळी स्पष्ट लेखी पूर्वसंमतीशिवाय तुम्हाला कोणत्याही हेतूने वापर, सुधारणा, पुनरुत्पादन, डुप्लिकेट, कॉपी, प्रकाशन, वितरण, डाउनलोड, विक्री, पुनर्विक्री, रूपांतरण, पुनर्रचना, रिकॉन्फिगर, पुनर्प्रसारण किंवा अन्यथाही इतर उपयोग करता येणार नाही.

12.1 वापराची अट म्हणून, तुम्ही या कराराद्वारे प्रतिबंधित असलेल्या कोणत्याही हेतूसाठी प्लॅटफॉर्म न वापरण्याचे वचन देता. प्लॅटफॉर्मशी संबंधित तुमच्या सर्व कृत्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात.

12.2 तुम्ही सहमत आहात, स्वीकारता आणि पुष्टी करता की तुम्हाला केवळ कन्टेन्ट क्सेस करण्यासाठी आणि तुम्ही तयार केलेला कन्टेन्ट किंवा तुम्हाला प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्याची परवानगी असलेला कन्टेन्ट शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी आहे.

12.3 तुम्ही याद्वारे कबूल करता आणि स्वीकारता की प्लॅटफॉर्मचा वापर, क्सेस आणि सुविधांचा लाभ घेणे हे VerSe च्या सेवा अटी, गोपनीयता धोरण आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नियंत्रित केले जाईल आणि तुम्ही या दस्तऐवजांच्या अनुसार कृती कराल.

12.4 याव्यतिरिक्त, तुम्ही सर्व लागू कायदे आणि नियमांचे आणि तुम्ही एखाद्या व्यवसायाचे प्रतिनिधित्व करत असल्यास, जाहिराती, मार्केटिंग, गोपनीयता किंवा तुमच्या उद्योगाला लागू होणारे इतर स्व-नियामक कोड(ड्स)चे पालन कराल.

12.5 तुम्ही असा कोणताही कन्टेन्ट होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, संग्रहित, अपडेट आणि शेअर करणार नाही जो पुढीलप्रमाणे असेल:

 1. दुसर्‍या व्यक्तीचा आहे आणि ज्यावर वापरकर्त्याचा कोणताही अधिकार नाही;
 2. बदनामीकारक, अश्लील, पोर्नोग्राफिक, पेडोफिलिक, शारीरिक खाजगीपणासह दुसर्‍याच्या गोपनीयतेचा भंग करणारा, लिंगाच्या आधारावर अपमानास्पद किंवा छळ करणारा, बदनामीकारक, वंश किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, मनी लाँड्रिंगला किंवा जुगाराला प्रोत्साहन देणारा किंवा अन्यथाही लागू असलेल्या कायद्यांशी विसंगत किंवा विरुद्ध असणारा आहे;
 3. लहान मुलांसाठी धोकादायक आहे;
 4. कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करतो;
 5. तत्कालीन लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करतो;
 6. मेसेजच्या उत्पत्तीबद्दल प्रेक्षकाची फसवणूक किंवा दिशाभूल करतो किंवा जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर अशी कोणतीही माहिती संप्रेषित करतो जी स्पष्टपणे खोटी किंवा दिशाभूल करणारी आहे परंतु ती वाजवीपणे वस्तुस्थिती म्हणून मानली जाऊ शकते;
 7. दुसरी एखादी व्यक्ती असल्याचे भासवतो;
 8. भारताची एकता, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परकीय राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा आहे किंवा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्यास चिथावणी देतो किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या चौकशीत अडथळा आणतो किंवा इतर राष्ट्राचा अपमान करतो;
 9. कोणत्याही कॉम्प्युटर संसाधनाच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा मर्यादा आणण्यासाठी डिझाइन केलेला सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणताही कॉम्प्युटर कोड, फाईल किंवा प्रोग्रॅम आहे;
 10. स्पष्टपणे खोटा आणि असत्य आहे आणि आर्थिक फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीची, संस्थेची किंवा एजन्सीची दिशाभूल करण्याच्या किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याच्या हेतूने कोणत्याही स्वरूपात लिहिला किंवा प्रकाशित केला आहे;
 11. कोणत्याही प्रकारे, VerSe च्या व्यावसायिक हितसंबंधांवर विपरित परिणाम करण्याची शक्यता आहे;
 12. कोणत्याही प्रकारे प्लॅटफॉर्मचे नुकसान किंवा अवनती करतो किंवा प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता, उपलब्धता किंवा क्सेसिबिलिटी बिघडवतो;
 13. जाहिराती, प्रमोशन्स किंवा व्यवसायाच्या आवाहनाचे चित्रण करतो किंवा वापरकर्त्यांना आवाहन करतो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आवाहन;
 14. इतर कोणत्याही वापरकर्त्याकडून पासवर्ड, खाते, संवेदनशील वैयक्तिक माहिती किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती प्राप्त करण्यासाठी डिझाइन केलेले किंवा हेतू असलेले कोणतेही संप्रेषण किंवा आवाहन पोस्ट किंवा प्रसारित करतो;
 15. प्लॅटफॉर्म, त्याचे सर्व्हर किंवा कोणतेही कनेक्ट केलेले नेटवर्क हॅक करतो किंवा त्यात ढवळाढवळ करतो
 16. नको असलेल्या किंवा अनधिकृत जाहिराती, प्रचारात्मक साहित्य, किंवा माहिती देणाऱ्या घोषणांसह, परंतु त्यापुरते मर्यादित नसलेले स्पॅम पोस्ट किंवा प्रसारित करतो; आणि
 17. बातम्या / चालू घडामोडींचा कन्टेन्ट प्रदर्शित करतो.

12.6  तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रतिबंधित कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये –

 1. तुम्ही प्लॅटफॉर्मद्वारे क्सेस केलेला कन्टेन्ट कधीही बेकायदेशीरपणे डाउनलोड/सेव्ह करू नये किंवा कन्टेन्ट किंवा प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग अनधिकृतपणे प्रवेश किंवा कॉपी करणे प्रतिबंधित करण्यासाठी VerSe द्वारे नियुक्त केलेल्या कोणत्याही तांत्रिक उपायांवर मात करू नये.
 2. तुम्ही प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग बदलू किंवा सुधारित करू नये आणि/किंवा प्लॅटफॉर्म कोणत्याही बेकायदेशीर हेतूसाठी वापरू नये.
 3. तुम्ही प्लॅटफॉर्मचा भाग असलेल्या कोणत्याही वेब पेजचा कोणताही भाग रिफॉरमॅट किंवा फ्रेम करू नये.
 4. तुम्ही इतर वापरकर्त्यांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा, वैयक्तिक माहिती किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती, स्पायडरींग किंवा कोणत्याही प्रकारचे स्क्रॅपिंग यासह परंतु यापुरतेच मर्यादित नसलेल्या पद्धतीने संकलित किंवा हार्वेस्ट करू नये किंवा संकलित करण्याचा प्रयत्न करू नये.
 5. तुम्ही जाणूनबुजून दुसर्‍या एखाद्या वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीची तोतयागिरी करू नये किंवा अन्यथाही एखाद्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी तुमच्या संलग्नतेचा विपर्यास करू नये, उदाहरणार्थ, दुसर्‍या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या नावावर खाते रजिस्टर करून किंवा मेसेज पाठवून किंवा दुसर्‍या व्यक्तीचे नाव वापरून टिप्पण्या करून किंवा इतर वापरकर्त्यांची तोतयागिरी करून किंवा अन्यथाही तुमची खोटी ओळख सांगून.
 6. तुम्ही प्लॅटफॉर्म आणि/किंवा कोणतेही VerSe खाते भाड्याने, विक्री किंवा हस्तांतरित करू नये किंवा लीजवर देऊ नये किंवा विक्री अथवा हस्तांतरित करण्याची ऑफर देऊ नये किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला तुमचे नाव आणि पासवर्ड किंवा प्लॅटफॉर्मवरील कोणताही कन्टेन्ट वापरण्याची परवानगी देऊ नये.
 7. तुमच्या स्वतःच्या किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म किंवा त्याच्या कोणत्याही कन्टेन्टची पुनर्विक्री किंवा व्यावसायिकरित्या वापर करू नये किंवा खाते माहिती डाउनलोड किंवा कॉपी करू नये. प्लॅटफॉर्म केवळ वैयक्तिक वापरासाठी आहे आणि कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी पुनर्निर्माण, डुप्लिकेट, कॉपी, विक्री, पुनर्विक्री, भेट किंवा अन्यथा वापर करता येणार नाही.
 8. तुम्ही तुमचे खाते वापरण्यासाठी कोणत्याही तृतीय पक्षाला अधिकृत करू नये.
 9. दंडनीय गुन्हा मानले जाईल, दाव्याचा खटला भरला जाऊ शकेल किंवा अन्यथा कोणत्याही कायद्याचे किंवा नियमांचे उल्लंघन होईल अशा प्रकारचे कोणतेही वर्तन तुम्ही करू नये किंवा त्यात भाग घेऊ नये, किंवा प्रोत्साहित करू नये, प्रवृत्त करू नये, आवाहन करु नये किंवा प्रचार करू नये; किंवा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनधिकृत कारणासाठी प्लॅटफॉर्म वापरू नये; तुम्ही प्लॅटफॉर्म वापरून अपलोड, स्टोअर, शेअर किंवा ट्रान्समिट करत असलेल्या हायपरलिंक्ससह तुमच्या वर्तणुकीला आणि कन्टेन्टला आणि माहितीला लागू होणाऱ्या सर्व स्थानिक कायद्यांचे पालन करण्यास तुम्ही सहमत आहात.
 10. तुम्ही प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट असलेल्या किंवा प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या किंवा प्लॅटफॉर्मवरच्या कोणत्याही कन्टेन्टमध्ये दिसणाऱ्या कोणत्याही ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर प्रोप्रायटरी किंवा कायदेशीर नोटीशीमध्ये बदल करू नये किंवा काही काढून टाकू नये, बदल करण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करू नये. VerSe आणि आमच्या सहयोगी कंपन्यांचा किंवा इतर वापरकर्त्यांचा कोणताही ट्रेडमार्क, लोगो किंवा इतर प्रोप्रायटरी माहिती (इमेजेस, कन्टेन्ट, संगीत, मजकूर, पेज लेआउट किंवा स्वरूप यांच्यासह) बंदिस्त (एन्क्लोज) करण्यासाठी तुम्ही ती फ्रेम करू नये किंवा फ्रेमिंग तंत्र वापरू नये. VerSe च्या स्पष्ट लिखित संमतीशिवाय VerSe चे नाव किंवा ट्रेडमार्क वापरून तुम्ही कोणतेही मेटा-टॅग किंवा इतर कोणताही "लपवलेला मजकूर" वापरू शकत नाही. VerSe च्या स्पष्ट आगाऊ लिखित संमतीशिवाय लिंकचा भाग म्हणून तुम्ही कोणताही VerSe लोगो किंवा इतर प्रोप्रायटरी ग्राफिक किंवा ट्रेडमार्क वापरू शकत नाही. असा कोणताही अनधिकृत वापर VerSe ने दिलेली परवानगी किंवा परवाना रद्द करतो.
 11. प्लॅटफॉर्मवर दिलेल्या वैशिष्ट्यांमार्फत वगळता, कन्टेन्ट एकत्रित करणे, पुनर्प्रयोजन करणे, अडॅप्ट करणे, कॉपी करणे, पुनर्प्रकाशित करणे, उपलब्ध करणे किंवा अन्यथा लोकांपर्यंत पोहचवणे, प्रदर्शित करणे, कार्य करणे, हस्तांतरित करणे, शेअर करणे, वितरित करणे किंवा अन्यथा वापर किंवा उपयोग करणे यांसाठी तुम्ही स्क्रॅपिंग किंवा तत्सम तंत्रांचा अवलंब करू नये.
 12. तुम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला प्लॅटफॉर्मचा ऑब्जेक्ट कोड कॉपी किंवा अडॅप्ट करण्यास किंवा प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही भागाचा सोर्स किंवा ऑब्जेक्ट कोड कॉपी, रिव्हर्स इंजिनियर, रिव्हर्स असेंबल, डिकंपाइल, सुधारित किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी देऊ नये, किंवा कोणत्याही कॉपी संरक्षण यंत्रणेला बगल देऊ नये किंवा बगल देण्याचा प्रयत्न करू नये किंवा ती कॉपी करू नये किंवा कन्टेन्ट किंवा प्लॅटफॉर्मशी संबंधित कोणत्याही अधिकार व्यवस्थापन माहिती क्सेस करू नये.
 13. तुम्ही कोणतेही व्हायरस, वर्म्स, दोष, ट्रोजन हॉर्स, कॅन्सलबॉट्स, स्पायवेअर, बिघडवणाऱ्या किंवा विध्वंसक स्वरूपाच्या इतर गोष्टी, डवेअर, पॅकेट किंवा आयपी स्पूफिंग, बनावट राउटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मेल ड्रेस माहिती किंवा तत्सम पद्धती किंवा तंत्रज्ञान, हानिकारक कोड, फ्लड पिंग्ज, मालवेअर, बॉट, टाईम बॉम्ब, वर्म किंवा इतर हानीकारक किंवा दुर्भावनापूर्ण घटक प्रसारित करू नये, जे प्लॅटफॉर्म किंवा प्लॅटफॉर्मचा भाग असलेली किंवा त्याच्याशी कनेक्ट केलेली नेटवर्क्स यांवर जास्त भार टाकू शकतात, बिघडवू शकतात किंवा विस्कळीत करू शकतात किंवा जे कोणत्याही वापरकर्त्याचा प्लॅटफॉर्मचा वापर किंवा उपभोग यावर प्रतिबंध किंवा मर्यादा आणतात किंवा आणू शकतात.
 14. तुम्ही दुसर्‍या वापरकर्त्याचा, किंवा VerSe च्या कर्मचार्‍यांचा आणि/किंवा सहयोगींचा पाठलाग (स्टॉकिंग), शोषण, धमकावणे, गैरवर्तन किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे छळ करू नये.
 15. तुम्ही VerSe द्वारे नियुक्त कोणत्याही डेटा सुरक्षा उपायांचे उल्लंघन करू नये, बगल देऊ नये किंवा त्यांचे उल्लंघन करण्याचा किंवा बगल देण्याचा प्रयत्न करू नये; तुमच्या वापरासाठी नसलेला डेटा किंवा कन्टेन्ट क्सेस करू नये किंवा क्सेस करण्याचा प्रयत्न करू नये; तुम्हाला क्सेस करण्याची अधिकृतता नसलेल्या खात्यात लॉग इन करू नये किंवा करण्याचा प्रयत्न करू नये; VerSe चा सर्व्हर, सिस्टम किंवा नेटवर्क स्कॅन करण्याचा किंवा त्यांची भेद्यता (असुरक्षा) तपासण्याचा प्रयत्न करू नये किंवा VerSe च्या डेटा सुरक्षा किंवा प्रमाणीकरण प्रक्रियेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नये आणि;
 16. सार्वजनिक सर्च इंजिन्सचा अपवाद वगळता प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग रिट्रीव्ह (पुनर्प्राप्त) किंवा इंडेक्स करण्यासाठी तुम्ही कोणताही रोबोट, स्पायडर, ऑफलाइन रिडर्स, साइट सर्च आणि/किंवा रिट्रीव्हल प्लिकेशन किंवा इतर डिव्हाइस वापरू नये; प्लॅटफॉर्म आणि/किंवा माहिती (आमची माहिती असो किंवा इतर वापरकर्त्याची माहिती) क्सेस करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठी किंवा कॉपी करण्यासाठी कोणतेही रोबोट, स्पायडर, स्क्रॅपर किंवा इतर ऑटोमेटेड माध्यम वापरू नये.

12.7 तुम्ही समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि गोपनीयता धोरणाचे काटेकोरपणे पालन कराल.

13. निवेदन आणि हमी

13.1 या अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या किंवा कायद्याने आवश्यक असलेल्या व्यतिरिक्त, ही सेवा “आहे तशी” पुरवली जाते आणि VERSE या सेवेबद्दल कोणत्याही विशिष्ट टिप्पण्या करत नाही किंवा हमी देत नाही. उदा. आम्ही या गोष्टींची कोणतीही हमी देत नाही: (A) सेवेद्वारे पुरवण्यात आलेला कन्टेन्ट; (B) सेवेची विशिष्ट वैशिष्ट्ये किंवा तिची अचूकता, विश्वासार्हता, उपलब्धता किंवा तुमच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता; किंवा (C) तुम्ही सबमिट केलेला सर्व कन्टेन्ट सेवेवर ॲक्सेसिबल असणे.

13.2 या प्लॅटफॉर्मच्या तुमच्या वापराद्वारे तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर प्रवेश असलेल्या सामग्रीमध्ये तृतीय पक्षांच्या मालकीच्या सामग्रीचा समावेश आहे. तुम्ही याची पोच देता की अशा कन्टेन्टची कोणतीही जबाबदारी VerSe घेत नाही, तुम्हाला हे समजते की प्लॅटफॉर्म वापरताना अवमानकारक, असभ्य किंवा इतर आक्षेपार्ह कन्टेन्ट तुमच्यासमोर येऊ शकते आणि अनिच्छेने अशी अवमानकारक आणि आक्षेपार्ह सामग्री तुमच्यासमोर उघड होऊ शकते. असेही शक्य आहे की या प्लॅटफॉर्मच्या तुमच्या वापराद्वारे इतरांना तुमची वैयक्तिक माहिती मिळवणे शक्य आहे आणि प्राप्तकर्ता अशा माहितीचा वोर तुम्हाला छळण्यासाठी किंवा इजा करण्यासाठी करू शकतो. VerSe अशा अनधिकृत वापरला मान्यता देत नाही, पण हा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही याची पोच देता आणि हे मान्य करता की अशाप्रकारे इतरांनी मिळवलेल्या कोणत्याही वैयक्तिक माहितीच्या अशा बेकायदेशीर वापराला VerSe जबाबदार नाही.

13.3 VerSe कोणतेही विधान करत नाही किंवा हमी देत नाही की हा प्लॅटफॉर्म नुकसान, हानी, धोका, VerSe च्या सुरक्षित सर्व्हर्सना आणि/किंवा कोणतीही आणि सर्व वैयक्तिक माहितीला आणि/किंवा त्यात साठवलेल्या आर्थिक माहितीला कोणताही अनधिकृत प्रवेश, करप्शन, हल्ला, प्लॅटफॉर्मकडे किंवा प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या ट्रान्समिशनमध्ये कोणताही अडथळा किंवा ते थांबणे, कोणतेही बग्ज, व्हायरसेस, ट्रोजन हॉर्सेस, किंवा त्या प्रकारच्या कोणत्याही तृतीय पक्षाकडून प्लॅटफॉर्मकडे किंवा प्लॅटफॉर्मवरून ट्रान्समिट करता येणाऱ्या गोष्टी आणि/किंवा कोणत्याही कन्टेन्टमधील त्रुटी किंवा वगळलेल्या गोष्टी किंवा प्लॅटफॉर्मवरून प्रवेश मिळणाऱ्या कोणत्याही कन्टेन्टच्या वापराचा परिणाम म्हणून होणारी कोणतीही हानी किंवा नुकसान  यापासून मुक्त असेल.      

13.4 VerSe असे आश्वासन देत नाही, विधान करत नाही किंवा हमी देत नाही की वापरकर्त्याला प्रवेश असलेला  प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट आणि तृतीय पक्षांनी पुरवलेल्या लिनक्स व्हायरसेस किंवा त्याप्रकारच्या दूषित गोष्टींपासून किंवा हानिकारक वैशिष्ट्यांपासून मुक्त असतील. तुम्ही हे मान्य करता की प्लॅटफॉर्मचा दर्जा आणि कामगिरी आणि कन्टेन्टची अचूकता आणि पूर्णत्व या संदर्भातील सर्व जोखीम तुमची आहे.

13.5 VerSe प्लॅटफॉर्मच्या वापराद्वारे किंवा कोणत्याही हायपरलिंक केलेल्या सेवेद्वारे किंवा कोणत्याही बॅनरवर किंवा इतर जाहिरातींमध्ये असलेल्या तृतीय पक्षाद्वारे देऊ करण्यात आलेल्या किंवा जाहिरात करण्यात आलेल्या कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची हमी देत नाही, पाठिंबा देत नाही, हमी देत नाही किंवा जबाबदारी घेत नाही. तसेच तुम्ही आणि उत्पादनांचे किंवा सेवांचे तृतीय पक्षी पुरवठादार यांच्यामध्ये घडणाऱ्या कोणत्याही व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी VerSe एक पक्ष म्हणून सहभागी नसेल किंवा कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा कोणत्याही वातावरणात, एखाद्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या खरेदीसह, तुम्ही तुमची सर्वोत्तम सुज्ञता वापरावी आणि प्लॅटफॉर्मला प्रवेश किंवा त्याचा वापर, हॅकिंग किंवा तुम्ही केलेले इतर सुरक्षा घुसखोरी यातून होणारा कोणत्याही प्रकारचा अडथळा, वैयक्तिक दुखापत किंवा मालमत्तेची हानी याबद्दल खबरदारी बाळगावी.  आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही दायित्वाचा VerSe स्वीकार करत नाही.

सावधगिरी बाळगावी.

13.6 प्लॅटफॉर्मला प्रवेश किंवा त्याचा परिणाम अचूक, वेळेवर, विश्वासार्ह, सुरळीत किंवा चुकांशिवाय असेल याची कोणतीही हमी VerSe देत नाही, तसे विधान करत नाही किंवा खात्री देत नाही. पूर्वसूचनेशिवाय VerSe प्लॅटफॉर्मचा कोणताही अथवा सर्व भाग अथवा तुमचा प्लॅटफॉर्मचा वापर बदलू शकते, स्थगित करू शकते किंवा थांबवू शकते. अशावेळी VerSe तुम्हाला किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला उत्तरदायी असणार नाही.  

14. जाहिराती आणि तृतीय-पक्षी कन्टेन्ट

14.1  प्लॅटफॉर्म VerSe च्या मालकीच्या नसलेला किंवा नियंत्रणात नसलेला तृतीय पक्षी कन्टेन्ट आणि/किंवा वेबसाईट्स यांना प्रवेश देऊ शकतो.

14.2. तुम्ही याद्वारे प्लॅटफॉर्मच्या तुमच्या वापरातून जाहिराती प्राप्त करण्याचे मान्य करता, वचन देता आणि पुष्टी करता.

14.3. प्लॅटफॉर्म तृतीय पक्षी गेम्स, प्रश्नमंजुषा आणि कौशल्याची गरज असलेल्या इतर उपक्रमांना प्रवेश देऊ शकतो. त्यासाठी कदाचित संबंधित तृतीय पक्ष बक्षिसे देईल. VerSe कडे तृतीय पक्षी गेम्स किंवा इतर उपक्रमांची मालकी किंवा नियंत्रण नाही, आणि निकाल जाहीर करण्यासाठी किंवा बक्षिसे देण्यासाठी नियंत्रण करत नाही किंवा कोणतेही दायित्व स्वीकारत नाही.

14.4 VerSe कोणत्याही तृतीय-पक्षी कन्टेन्टसाठी जबाबदार नाही, यामध्ये प्लॅटफॉर्मवर असलेला मजकूर, ग्राफिक्स, युजर इंटरफेसेस, व्हिज्युअल इंटरफेसेस, छायाचित्रे, ट्रेडमार्क्स, लोगोज, ध्वनी, संगीत आणि कलाकृती किंवा ॲप्लिकेशन्स, सेवा, जाहिराती, आणि/किंवा लिंक्स समाविष्ट आहेत, पण केवळ त्यापुरतेच मर्यादित नाही.          

14.5 प्लॅटफॉर्मवर आलेल्या तृतीय-पक्षी कन्टेन्ट किंवा तृतीय-पक्षी कृतींबद्दल तुम्हाला काही तक्रारी किंवा चिंता असल्यास, तुम्ही तुमच्या ‘तक्रारी नोंदवण्यासाठीची प्रणाली’ (लिंक द्या) मध्ये नमूद केलेल्या तक्रार निवारण प्रक्रियेद्वारे नोंदवण्याचे मान्य करता. तुम्ही पुढे हेसुद्धा मान्य करता आणि याची पोच देता की VerSe तुमच्या तक्रारी त्यांच्या तक्रार निवारण प्रणालीनुसार आणि लागू असलेल्या कायद्यानुसार हाताळेल.

14.6 तुम्ही प्लॅटफॉर्मची किंवा कोणत्याही कन्टेन्टची कोणत्याही इतर संगणकावर, सर्व्हरवर, वेबसाईटवर किंवा प्रकाशनाच्या किंवा वितरणाच्या इतर कोणत्याही माध्यमावर किंवा कोणत्याही व्यावसायिक संस्थेसाठी नक्कल करणार नाही, पुनर्निर्माण करणार नाही, पुनर्प्रकाशित करणार नाही, अपलोड, पोस्ट, सार्वजनिकरित्या प्रकाशित, एनकोड, भाषांतरीत, ट्रान्समिट, डाऊनलोड किंवा कोणत्याही प्रकारे वितरीत (“मिररींग”सह) करणार नाही. कोणतेही उल्लंघन केल्यास, आवश्यक कारवाई करण्याचे आणि नुकसानभरपाईचा दावा करण्याचे सर्व अधिकार VerSe कडे असतील. अशा कारवाईमध्ये तुमचे खाते हटवून तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या वापराची परवानगी न देण्याचासुद्धा समावेश असू शकतो.    

14.7 तुम्ही प्लॅटफॉर्मची स्पष्टपणे परवानगी देण्यात आलेली सामान्य माहिती वापरू शकता, त्यास्तही तुम्ही हे करणे आवश्यक आहे: (1) अशा कागदपत्रांच्या सर्व प्रतींमधून कोणतीही मालकीची सूचना काढून टाकू नका, (2) कराराद्वारे इतर मान्यता दिली नसेल तर असे कन्टेन्ट फक्त तुमच्या वैयक्तिक, अव्यावसायिक माहितीच्या हेतूनेच वापरा आणि असे कन्टेन्ट कोणत्याही नेटवर्कमधील संगणकावर कॉपी किंवा पोस्ट करू नका किंवा कोणत्याही माध्यमावर प्रसारित करू नका, (3) अशा कन्टेन्टमध्ये कोणतेही बदल करू नका, आणि (4) अशा कागदपत्रांसंबंधी इतर अतिरिक्त विधाने करू नका किंवा हमी देऊ नका.

15. प्लॅटफॉर्मचा वापर

15.1 तुम्ही सहमत आहात आणि कबूल करता की Josh आणि प्लॅटफॉर्म हे केवळ एक सुविधा पुरवणारे आहेत आणि ते प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही व्यवहारांमधील पक्षकार नाहीत किंवा असू शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे नियंत्रण करू शकत नाहीत. त्यानुसार, प्लॅटफॉर्मवर उत्पादनांच्या विक्रीचा करार थेट तुम्ही आणि प्लॅटफॉर्मवरील विक्रेते/व्यापारी यांच्यामध्येच असेल.

तुम्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली कोणतीही उत्पादने कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनधिकृत हेतूसाठी वापरू शकत नाही;

प्लॅटफॉर्मवरून उत्पादने खरेदी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा किंवा लागू पेमेंट पद्धतीचा कोणताही फसव्या पद्धतीने वापर, ज्यामुळे तुमच्या कृती व अकृतीमुळे Josh चे कोणतेही आर्थिक नुकसान होते, ते तुमच्याकडून वसूल केले जाईल. वरील गोष्टींचा पूर्वग्रह न ठेवता, या प्लॅटफॉर्मचा आणि/किंवा प्लॅटफॉर्मचा फसवा वापर केल्याबद्दल किंवा या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृती व अकृतीसाठी तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा अधिकार Josh राखून ठेवते;

प्लॅटफॉर्मवरील फोटो आणि चित्रे जाहिरातींच्या उद्देशाने मोठे केले जाऊ शकतात;

कन्टेन्ट, उत्पादनाचे वर्णन आणि इतर संबंधित माहिती तपासण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल; आणि

तुमचा करार हा प्लॅटफॉर्मवरील विक्रेते/व्यापारी यांच्याशी आहे आणि तुम्ही पुष्टी करता की तुम्ही ऑर्डर केलेली उत्पादने तुमच्या अंतर्गत/वैयक्तिक हेतूसाठी खरेदी केली आहेत आणि पुनर्विक्री किंवा व्यावसायिक हेतूंसाठी नाही. वेबसाइटवर तुम्ही ऑर्डर केलेल्या उत्पादनांचा वरील उद्देश सांगून तुमच्यावतीने त्याबाबत कोणत्याही सरकारी प्राधिकरणाला जाहीर करण्यासाठी आणि घोषणापत्र देण्यासाठी तुम्ही Josh ला अधिकृत करता.

  15.2 प्रतिबंधित वापर:

Josh ने अशा सिस्टीम्स तयार केल्या आहेत ज्याद्वारे आम्ही व्यापार्‍यांना प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंची विक्री करण्यास प्रतिबंधित करतो. मात्र, तुम्हाला हे समजते आणि कबूल करता की खरेदीदार म्हणून ही तुमचीदेखील जबाबदारी आहे की तुम्ही प्लॅटफॉर्मवर खालील उत्पादने व्यापार्‍याद्वारे सूचीबद्ध केली जाण्याची शक्यता नसली तरीही तसे घडल्यास तुम्ही ती खरेदी करणार नाही:

प्रौढ उत्पादने आणि पोर्नोग्राफीक साहित्य (बाल पोर्नोग्राफीसह) कोणत्याही स्वरूपात (प्रिंट, ऑडिओ/व्हिडिओ, मल्टीमीडिया मेसेज, चित्रे, फोटो इ.);

 1. मद्य;
 2. प्राणी आणि वन्यजीव उत्पादने - उदाहरणांमध्ये जिवंत प्राणी, माऊंट केलेले नमुने आणि हस्तिदंत यांचा समावेश होतो;
 3. आयपीचे उल्लंघन करणाऱ्या कृत्रिम वस्तू, बनावट वस्तू आणि सेवा (खाली परिभाषित केल्याप्रमाणे);
 4. क्रूड तेल;
 5. कायद्याने प्रतिबंधित असलेली पाळत ठेवण्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे;
 6. प्रतिबंधित देशांमधून निर्बंध लादलेल्या वस्तू;
 7. प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्त होत चाललेल्या प्रजाती, जिवंत किंवा मृत;
 8. कायद्याने पुनर्विक्रीतून सूट दिलेली इव्हेंट तिकिटे;
 9. बंदुका, शस्त्रे आणि चाकू - उदाहरणांमध्ये पेपर स्प्रे, प्रतिकृती आणि स्टन गन यांचा समावेश होतो;
 10. कोणत्याही आर्थिक सेवा;
 11. आवश्यक परवानग्या न ठेवता अन्न आणि आरोग्यसेवेच्या वस्तू;
 12. काळ्या बाजारातील उत्पादने;
 13. सरकारशी संबंधित वस्तू/उपकरणे (उदा. पोलिस वापरत असलेल्या फ्रिक्वेन्सीची वायरलेस उपकरणे, सरकारी अधिकार्‍यांचे गणवेश ज्यात पोलिस/भारतीय सैन्य इत्यादींचा समावेश होतो परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही)
 14. सरकारद्वारे जारी केली जाणारी कागदपत्रे उदाहरणार्थ पासपोर्ट इ.;
 15. घातक, प्रतिबंधित किंवा नियमन केलेले साहित्य – उदाहरणांमध्ये बॅटरी, फटाके आणि रेफ्रिजरंट्स यांचा समावेश होतो;
 16. मानवी अवशेष आणि शरीराचे अवयव;
 17. कोणत्याही स्वरूपातील आयपी (संगीत, चित्रपट, पुस्तके, डिझाईन्स यांसह परंतु एवढेच मर्यादित नाही) ज्यासाठी व्यापाऱ्याकडे वितरणाचा अधिकार नाही;
 18. चलने आणि पावत्या (रिक्त आणि आधीच भरलेली यांसह);
 19. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस सिलेंडर;
 20. लॉटरीची तिकिटे;
 21. मेलिंग लिस्ट्स आणि वैयक्तिक माहिती;
 22. असे आयमॅप्स (iMaps) आणि साहित्य ज्यात भारताच्या बाह्य सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत;
 23. 15.3 औषधे, ड्रग्ज आणि औषध साहित्य ज्यांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे;
 24. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत परिभाषित केल्यानुसार अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ;
 25. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान, वंश, वांशिकता किंवा संस्कृती यांच्या आधारे लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता असलेला आक्षेपार्ह कन्टेन्ट;
 26. किरणोत्सर्गी साहित्य;
 27. सरपटणाऱ्या प्राण्यांची कातडी;
 28. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानोपयोगी तंत्र अधिनियम, 1994 अंतर्गत गर्भलिंग निर्धारण किट;
 29. स्टॉक्स आणि सिक्युरिटीज;
 30. रिअल इस्टेट;
 31. किरणोत्सर्गी साहित्य;
 32. चोरीच्या वस्तू;
 33. तंबाखू;
 34. लागू कायद्यानुसार इतर कोणत्याही निर्बंध घातलेल्या किंवा प्रतिबंधित वस्तू किंवा सेवा; आणि
 35. Josh द्वारे अयोग्य मानली गेलेली इतर कोणतीही वस्तू.

16.  उत्पादने

16.1. हा प्लॅटफॉर्म एक बाजारपेठ म्हणून काम करतो आणि विविध विक्रेत्यांना विविध उत्पादनांची (उत्पादने आणि सेवांशी संबंधित पूरक सेवांसह), व्हाऊचर्सची आणि सेवांची प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांमध्ये जाहिरात करण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी, ती उपलब्ध करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पुरवतो (“उत्पादने”). प्लॅटफॉर्म केवळ वापरकर्ते आणि विविध विक्रेते यांच्या सहभागासाठी सुविधा देतो आणि इतर आनुषंगिक आणि पूरक सेवा पुरवतो. त्याशिवाय, कोणतीही पूर्वसूचना न देता, वापरकर्त्यांना देऊ केल्या जात असलेल्या सेवा थांबवण्याचा अधिकार प्लॅटफॉर्म राखून ठेवतो.  

16.2. प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेली सर्व उत्पादने “जशी आहेत तशी” आणि “उपलब्धतेनुसार” या आधारे आहेत. उत्पादनांची चित्रे केवळ संदर्भासाठी आहेत आणि दर्शवलेल्या संबंधित चित्रापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन वेगळे असू शकते. या संबंधी कोणतीही विसंगती निर्माण झाल्यास त्यातून येणाऱ्या कोणत्याही दायित्वाचा स्वीकार हा प्लॅटफॉर्म करत नाही. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी केलेल्या किंवा मिळवलेल्या कोणत्याही उत्पादनाचा, माहितीचा  किंवा इतर सामग्रीचा दर्जा तुमच्या अपेक्षेनुसार असेल किंवा सेवेतील कोणत्याही त्रुटी दुरुस्त केल्या जातील याची हमी Josh घेत नाही. त्यासाठी व्यापारीच पूर्णत: जबाबदार असतील.  

16.3. याद्वारे प्लॅटफॉर्म वापरकर्त्याने ऑर्डर केलेल्या अंतिम उत्पादनाचे फिनिश आणि तंतोतंतपणा याबद्दल कोणतीही हमी देत नाही. प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी केलेल्या किंवा मिळवलेल्या कोणत्याही उत्पादनाचा, सेवांचा, माहितीचा  किंवा इतर सामग्रीचा दर्जा याची हमी किंवा समर्थन Josh देत नाही आणि ते दायित्व संपूर्णपणे संबंधित विक्रेत्याचे आहे. तुमच्या ऑर्डरच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये उदा. मर्चंडाईझचा ब्रँड, आकार, रंग इ. बदल उत्पादनाची उपलब्धता, संबंधित ब्रँडच्या आकाराच्या तक्त्यातील फरकामुळे होऊ शकतात.          

16.4. प्लॅटफॉर्मच्या उपलब्धतेवर मर्यादा आणणे आणि/किंवा प्लॅटफॉर्म कोणत्याही व्यक्तीला, भौगोलिक प्रदेशाला किंवा न्यायक्षेत्राला मर्यादित ठेवण्याचा अधिकार Josh राखून ठेवते, पण तसे बंधन नाही. आम्ही हा अधिकार प्रत्येक परिस्थितीनुसार वापरू शकतो. उत्पादनांची सर्व वर्णने किंवा उत्पादनांची किंमत कोणत्याही सूचनेशिवाय कोणत्याही वेळी बदलण्याच्या अधीन आहेत. कोणत्याही वेळी कोणतेही उत्पादन थांबवण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. या प्लॅटफॉर्मवरून देऊ करण्यात आलेल्या कोणत्याही उत्पादनाला जिथे प्रतिबंध असेल तिथे ती ऑफर उपलब्ध नसेल.

16.5. अन्यथा नमूद केले नसेल तर सर्व किमती ‘वस्तू आणि सेवा कर (“GST”), लागू असलेले कर आणि उपकर यासहीत आहेत. आमच्याकडून खरेदी केलेल्या उत्पादनांच्या संदर्भात सर्व फीज/खर्च/शुल्क यांच्या पेमेंटसाठी तुम्ही जबाबदार असाल आणि GST, कर आणि उपकर यासह पण त्यापुरतेच मर्यादित नसलेले आणि लागू असलेले सर्व कर भरण्याचे तुम्ही मान्य करता.    

16.6. Josh पूर्वसूचना न देता, कोणत्याही वेळी सेवा, प्लॅटफॉर्म आणि/किंवा कन्टेन्टचा कोणताही भाग यामध्ये बदल करण्याचा किंवा त्या थांबवण्याचा अधिकार राखून ठेवते. कोणतेही बदल, किमतीतील बदल, सेवा आणि प्लॅटफॉर्मची स्थगिती किंवा समाप्ती यासाठी Josh तुम्हाला किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाला उत्तरदायी असणार नाही.

17. पेमेंट, परत देणे, अदलाबदल, डिलिव्हरी  

17.1 उत्पादनांच्या किमती आमच्या प्लॅटफॉर्मवर नमूद केल्या आहेत आणि या अटींमध्ये संदर्भाने समाविष्ट केल्या आहेत. सर्व किमती भारतीय रुपयांमध्ये आहेत. किमती. उत्पादने आणि सेवा संबंधित विक्रेत्याने देऊ केलेल्या आहेत आणि त्या ब्रँडची मार्गदर्शक तत्त्वे किंवा प्रत्येक विक्रेत्याला लागू असलेल्या इतर अटी आणि शर्तींनुसार बदलू शकतात. वापरकर्ते याशिवाय याचे वचन देतात की व्यवहाराला प्रारंभ करून, वापरकर्ता लागू असणाऱ्या कायद्यांनी परवानगी असलेल्या आणि प्लॅटफॉर्मकडून स्वीकारल्या जाणाऱ्या पेमेंट सुविधांचा वापर करून उत्पादने विकत घेण्यासाठी विक्रेत्यासह एका कायदेशीररित्या बंधनकारक आणि लागू करता येणाऱ्या करारात प्रवेश करत आहे.      

17.2 पेमेंट आणि डिलिव्हरीशी संबंधित सर्व अटी उत्पादनांचा विक्रेता आणि ती विकत घेणारा वापरकर्ता यांच्यामध्ये निहित असलेल्या करारांतर्गत नात्यानुसार आहेत. प्लॅटफॉर्मने पुरवलेली सुविधा उत्पादनाचा वापरकर्ता आणि विक्रेता यांच्याकडून केवळ वापरकर्त्याने केलेली खरेदी पूर्ण करण्यासाठी वापरली जाते.

17.3 उत्पादने परत करणे आणि उत्पादनांची अदलाबदल ही बाब तुम्ही आणि विक्रेता यांच्यामधील आहे. विक्रेत्याचे परत करणे आणि अदलाबदलीसंबंधीचे धोरण सदोष आणि विक्रेत्याने डिलिव्हर केलेल्या चुकीच्या उत्पादनांना लागू होईल. कोणत्याही सदोष आणि डिलिव्हर केलेल्या चुकीच्या उत्पादनासाठी Josh तुम्हाला किंवा इतर तृतीय पक्षाला उत्तरदायी नसेल.

17.4 प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेली सर्व उत्पादने वापरकर्त्याला विक्रेत्याकडून स्टँडर्ड कुरीयर सेवेमार्फत लॉजिस्टिक्स भागीदार किंवा स्वत: विक्रेत्याकडून पाठवली जातील. सर्व डिलिव्हरीज जिथे लागू असेल तिथे सर्वोत्तम प्रयत्न करून दिल्या जातील आणि कळवलेल्या तारखेला उत्पादने डिलिव्हर करण्यासाठी विक्रेता आटोकाट प्रयत्न करणार असला तरीही या संदर्भात कोणताही विलंब झाला तर त्यातून उद्भवणारे दावे किंवा दायित्वे याची जबाबदारी प्लॅटफॉर्मवर नाही.

17.5 उत्पादनांच्या डिलिव्हरीमधील कोणत्याही विलंबासाठी प्लॅटफॉर्म/ Josh जबाबदार असणार नाही. लॉजिस्टिक्स भागीदाराने व्यवस्थित हाताळणी न केल्यामुळे वाहतूक करताना उत्पादनाचे नुकसान झाल्यास त्यासाठी प्लॅटफॉर्म उत्तरदायी नाही.

18. गोपनीयता  

तुम्ही प्लॅटफॉर्मचा लाभ घेत असताना आणि/किंवा वापर करत असताना VerSe तुमची काही वैयक्तिक माहिती आणि डेटा गोळा करू शकते. अशी माहिती फक्त प्लॅटफॉर्मच्या फंक्शनॅलिटीसाठीच गोळा केली जाते. तुम्हाला हे समजते आणि मान्य आहे की VerSe ने गोळा केलेली सर्व माहिती VerSe चे व्यावसायिक सहयोगी (भागीदार, जाहिरातदार, कंत्राटदार इ. सह पण त्यापुरतेच मर्यादित नाही) आणि सहकारी यांच्याबरोबर शेअर किंवा वितरीत केली जाऊ शकते. तुम्ही खालील लिंकला भेट देऊन VerSe चे गोपनीयता धोरण वाचू शकता: गोपनीयता धोरण (गोपनीयता धोरण पृष्ठाची लिंक)    

आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण खूप गांभीर्याने घेतो आणि तुमच्या खात्याशी संबंधित सर्व माहितीसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, 2020 आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार, डेटा संरक्षणाची उच्च मानके आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना लागू करतो. आमचे सध्याचे गोपनीयता धोरण येथे उपलब्ध आहे.

19. नुकसानभरपाई 

तुम्ही केलेल्या प्लॅटफॉर्मच्या वापरातून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवणारे, आनुषंगिक सर्व नुकसान, उत्तरदायित्वे, किमती आणि खर्च, ज्यात वकिलांच्या फीचा आणि खर्चाचा समावेश आहे, यासाठी तुम्ही VerSe आणि तिच्या संलग्न कंपन्या, त्यांचे अधिकारी, संचालक आणि कर्मचारी यांना नुकसानभरपाई द्याल, त्यांचे संरक्षण कराल आणि त्यांना जबाबदार धरणार नाही.

20. कोणतेही उत्तरदायित्व नाही 

प्लॅटफॉर्मच्या वापरातून किंवा प्लॅटफॉर्म न वापरता आल्यामुळे किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या किंवा दैवी आपत्तीशी संबंधित अथवा VerSe च्या किंवा तिच्या सहयोग्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या तृतीय पक्षाच्या कृत्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आनुषंगिक, दंडात्मक, खास किंवा परिणामी होणाऱ्या हानीसाठी, नफा किंवा गोपनीय किंवा इतर माहितीच्या नुकसानासाठी, व्यवसायातील अडथळयासाठी, वैयक्तिक दुखापतीसाठी, गोपनीयता भंगासाठी, सद्भावनेने केल्या जाणाऱ्या किंवा रास्त काळजीचे कोणतेही कर्तव्य पूर्ण करण्यातील अपयशासाठी, निष्काळजीपणासाठी आणि इतर कोणतेही आर्थिक किंवा इतर प्रकारचे नुकसान किंवा हानीसाठी लागू असलेल्या कायद्यानुसार, कमाल मर्यादेपर्यंत, कोणत्याही परिस्थितीत VerSe किंवा तिचे सहयोगी उत्तरदायी नसतील.  

वापरकर्त्याने पुरवलेल्या कोणत्याही डेटाच्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानासाठी अथवा प्लॅटफॉर्मच्या वापरातून किंवा प्लॅटफॉर्म न वापरता आल्यामुळे उद्भवणाऱ्या किंवा तृतीय पक्षाच्या कोणत्याही प्रकारच्या हक्कांच्या कोणत्याही उल्लंघनासाठी VerSe किंवा तिचे सहयोगी उत्तरदायी नसतील.

कोणत्याही परिस्थितीत, प्लॅटफॉर्मशी संबंधित सर्व दाव्यांसाठी VerSe चे एकत्रित उत्तरदायित्व 5000/-(रुपये पाच हजार फक्त) पेक्षा जास्त नसेल. ही उत्तरदायित्वाची मर्यादा तुम्ही आणि VerSe यांच्यामधील नात्याचा आधार आहे आणि ती उत्तरदायित्वाचा सर्व दाव्यांना लागू होईल (उदा. हमी, नुकसानभरपाई लागू असलेला गुन्हा, निष्काळजीपण, करार, कायदा) आणि जरी VerSe किंवा तिचे सहयोगी यांना अशा कोणत्याही नुकसानाच्या शक्यतेबद्दल सांगितले गेले असेल तरीही आणि जरी या उपाययोजना त्यांच्या आवश्यक हेतूसाठी अपुऱ्या असल्या तरीही.    

21. विभक्तता 

जर या करारातील कोणतीही तरतूद अवैध किंवा बेकायदेशीर किंवा अंमलबजावणी न करता येण्याजोगी आहे असे निश्चित झाले तर ती तरतूद या करारातून विभक्त करण्यात आली आहे असे मानले जाईल आणि या कराराच्या उर्वरीत तरतुदी जितक्या शक्य आहेत तितक्या या अविभक्ततेमुळे प्रभावित झाल्या आहेत, असे मानले जाणार नाही.

22. माफी

कोणत्याही वेळी या करारातील कोणत्याही तरतुदी लागू करण्यात VerSe ला आलेले अपयश म्हणजे तिचे अधिकार, ताकद, विशेषाधिकार किंवा उपाय यांना माफी किंवा तुमच्याकडून झालेला या कराराचा कोणताही पूर्वीचा किंवा नंतरचा भंग यांना माफी असे मानले जाणार नाही. किंवा या कराराच्या यापूर्वीच्या किंवा नंतरच्या तुमच्या कोणत्याही उल्लंघनाची माफी असे मानले जाणार नाही किंवा कोणत्याही हक्काचा, अधिकाराचा, विशेषाधिकाराचा किंवा उपायाचा कोणताही एकदा किंवा आंशिक वापर हा या करारात प्रदान केलेले असे किंवा इतर कोणतेही हक्क, अधिकार, विशेषाधिकार किंवा उपाय, जे सर्व अनेक आणि एकत्रित आहेत आणि एकमेकांपासून वेगळे नाहीत, त्यांच्या इतर कोणत्याही किंवा यापुढील वापरास किंवा VerSe ला कायद्याने किंवा समन्यायाने (इक्विटी) उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही अधिकारांना किंवा उपायांना प्रतिबंधित करणार नाही.

23. दैवी आपत्ती आणि तृतीय पक्षांचे कृत्य

या अटी आणि शर्तींची किंवा इतर धोरणांची VerSe ने आणि त्यांच्या सहयोग्यांनी करण्याच्या अंमलबजावणीला दैवी आपत्तींच्या (यामध्ये दैवी आपत्ती, सार्वजनिक शत्रू, साथ, महामारी, बंद, संप, दंगल, दहशतवादी हल्ला, आग, पूर, युद्ध,  वादळ आणि सरकारचा कोणताही नियम किंवा कोणत्याही सक्षम वैधानिक किंवा न्यायालयीन प्राधिकरणाचा किंवा कोणत्याही शासनाचा आदेश यांचा समावेश होतो, पण ते त्यापुरतेच मर्यादित नाही) घटनेत किंवा VerSe च्या रास्त नियंत्रणाबाहेरील कोणत्याही इतर कारणासाठी किंवा VerSe च्या नियंत्रणाबाहेरील तृतीय पक्षाची कृती ज्यामध्ये हकिंग, डेटा चोरी, वापरकर्त्याच्या खात्याला अनधिकृत प्रवेश, दुसरी व्यक्ती असल्याची बतावणी, घोटाळा, दिशाभूल इ. सह पण यापुरतेच मर्यादित नसलेल्या गोष्टींसाठी सूट दिली जाईल.    

24. या करारात सुधारणा

तुम्ही याद्वारे हे मान्य करता, वचन देता आणि पुष्टी करता की या कराराचा आणि/किंवा गोपनीयता धोरणाचा कोणताही भाग वेळोवेळी अपडेट करण्याचा, सुधारण्याचा किंवा निलंबित  करण्याचा अधिकार VerSe ने राखून ठेवला आहे. असा सुधारीत करार आणि/किंवा गोपनीयता धोरण अशा अपडेटच्या किंवा सुधारणेच्या किंवा निलंबनाच्या दिनांकापासून प्रभावी असेल. जर या करारातील कोणत्याही बदलांशी तुम्ही असहमत असाल तर तुम्ही प्लॅटफॉर्म अनइन्स्टॉल करून प्लॅटफॉर्मला प्रवेश करणे किंवा त्याचा वापर करणे थांबवू शकता. करार आणि/किंवा धोरणातील बदलानंतर (गोपनीयता धोरण, समुदाय मार्गदर्शक तत्त्वांसह) तुम्ही प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करणे किंवा वापर सुरू ठेवणे किंवा लाभ घेणे असे दर्शवेल की तुम्ही हे बदल मान्य केले असून त्यची पोच देता आणि याची पुष्टी करता की तुम्ही या सुधारीत कराराला आणि/किंवा धोरणाला बांधील असाल.      

25. नियामक कायदा

25.1 या कराराचे नियमन सध्या भारताच्या भूप्रदेशात लागू असलेल्या कायद्यांनुसार केले जाईल आणि केवळ बेंगलोरमधील न्यायालये हे या कराराशी संबंधित बाबींमध्ये विशेष अधिकार क्षेत्र असेल.

25.2 या कराराच्या अंतर्गत किंवा या कराराशी संबंधित सर्व वाद एकमेव लवादाकडे लवाद कार्यवाहीसाठी पाठवले जातील. जर भारतीय लवाद आणि सामंजस्य अधिनियम, 1996 (“अधिनियम”)च्या अंतर्गत  निश्चित केलेल्या कालावधीत  एकमेव लवादाच्या नेमणुकीबाबत संबंधित पक्षांचे एकमत झाले नाही, तर हे पक्ष या कायद्याच्या अंतर्गत, एकमेव लवादाच्या नेमणुकीसाठी सक्षम न्यायालयाकडे जातील. लवादाची कार्यवाही कायद्यानुसार आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार केली जाईल आणि लवादाचे स्थान/जागा बेंगलोर येथे असेल. लवादाची कार्यवाही इंग्रजीमध्ये केली जाईल.

26. सूचना 

अशी विशिष्ट नोटीस देण्यात येते की प्लॅटफॉर्मद्वारे प्रवेश करता येणाऱ्या कन्टेन्टसाठी किंवा जाहिरातींसाठी VerSe जबाबदार नाही. तृतीय पक्षांच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेला कन्टेन्ट काढून टाकण्याचा आणि/किंवा त्याचा प्रवेश अक्षम करण्याचा आणि VerSe आणि/किंवा इतर तृतीय पक्षांची बौद्धिक संपदा किंवा इतर अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची खाती बंद करण्याचा अधिकार VerSe राखून ठेवते.  

27. तक्रार निवारण यंत्रणा

तक्रारी हाताळण्यासाठी VerSe ने खालील यंत्रणा अमलात आणली आहे:

सेवेच्या अटी, गोपनीयता धोरण आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे यांच्या उल्लंघनांशी संबंधित तक्रारी किंवा चिंता “निवासी तक्रार निवारण अधिकारी” यांच्या नावे पाठवाव्यात.तक्रार निवारण अधिकार्‍यांना ईमेलद्वारे grievance.officer@myjosh.in वर किंवा खाली 28 क्रमांकामध्ये दिलेल्या पत्त्यावर पत्राने संपर्क करता येईल. VerSe ला तक्रारीचे निवारण करण्याकरता आवश्यक असलेली सर्व माहिती तक्रारीमध्ये समाविष्ट असावी.

डेटाच्या सुरक्षेशी, गोपनीयतेशी संबंधित तुमच्या चिंता आणि प्लॅटफॉर्म वापराविषयीच्या इतर चिंता हाताळण्यासाठी VerSe कडे एक तक्रार निवारण अधिकारी आहे.

तुम्ही येथे संपर्क साधू शकता

व्याप्ती

नाव / पद

ईमेल-आयडी

तक्रार निवारणासाठी

तक्रार निवारण अधिकारी श्री. नागराज

grievance.officer@myjosh.inझ

कायदा अंमलबजावणी समन्वयाकरता

नोडल अधिकारी श्री. सुनील कुमार डी

nodal.officer@myjosh.in

नियामक अनुपालनाकरता

अनुपालन अधिकारी

compliance.officer@myjosh.in

प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कन्टेन्ट किंवा जाहिरातीमुळे दुखावलेली कोणतीही व्यक्ती/ कोणताही घटक अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुध्द तक्रार नोंदवू शकते/शकतो. दुखावलेल्या व्यक्ती/घटकाचे कायदेशीर वारस, एजंट किंवा वकीलदेखील अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुध्द तक्रार नोंदवू शकतात. तक्रार गुन्ह्याच्या कक्षेत बसत नसल्यास, कन्टेन्ट किंवा जाहिरातीमध्ये हितसंबंध नसलेली किंवा त्याने न दुखावलेली, असंबंधित व्यक्ती/घटक अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुध्द तक्रार नोंदवू शकत नाही. तुम्ही दुखावलेल्या पक्षाचे एजंट किंवा वकील असल्यास, तुम्ही दुखावलेल्या पक्षाच्यावतीने तक्रार नोंदवण्याचा तुमचा अधिकार प्रस्थापित करणारा कागदोपत्री पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

28. तक्रार आणि काढून टाकण्याची प्रक्रिया

28.1 तुम्ही एखाद्या कन्टेन्टविरुद्ध तक्रार नोंदवत असल्यास, तुम्ही खालील माहिती पुरवणे आवश्यक आहे:

 • तक्रार दाखल करण्यातील तुमचे स्वारस्य
 • तक्रारीचे स्वरूप
 • ज्या कन्टेन्ट/जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्याचा तपशील (शीर्षक/प्रकाशनाची तारीख/कन्टेन्टची लिंक)
 • कन्टेन्ट/जाहिरातीशी पीडित पक्षाचा संबंध
 • कशामुळे पीडित झालात याबद्दल अचूक तथ्ये
 • तुम्ही मागणी करत असलेले उपाय
 • तक्रारीचा तपशील (तक्रारीचे स्पष्टीकरण)
 • तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे तपशील (तुम्ही)
 • पीडित पक्षाचे तपशील
 • संपर्काचे तपशील
 • कागदोपत्री पुरावा, लागू असल्यास

VerSe ला यासंदर्भातील सर्व नोटिसा लिखित स्वरुपात असतील आणि त्या वैयक्तिकरित्या रीतसर दिल्या जाव्यात किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवल्या गेल्या असल्यास, रिटर्न पावतीची विनंती करावी किंवा खालील पत्त्यावर फॅक्सद्वारे किंवा खालील ईमेल आयडीवर ईमेलद्वारे पाठवल्या जाव्यात: grievance.officer@myjosh.in

VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड

11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क,

आऊटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी,

बेंगळुरू- 560103, कर्नाटक, भारत

grievance.officer@myjosh.in

26.2 काढून टाकण्याची प्रक्रिया

हा प्लॅटफॉर्म VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड (“VerSe”) द्वारे ऑपरेट केला जातो आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित सर्व अधिकार VerSe कडे आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे वापरकर्त्याने निर्माण केलेला कन्टेन्ट किंवा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित किंवा प्रसारित केलेल्या इतर कोणत्याही कन्टेन्टच्या विरोधात तक्रार, तपासणी आणि निराकरणाशी संबंधित आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे तक्रार दाखल करण्याच्या सूचना देखील देतात. ही मार्गदर्शक तत्त्वे तक्रार दाखल करणार्‍या व्यक्तीला (“तुम्ही”) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेल्या कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध तक्रार कशी नोंदवायची, VerSe द्वारे तुमची तक्रार कशी हाताळली जाईल आणि प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेल्या कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीशी संबंधित कायदेशीर आवश्यकता समजून घेण्यात मदत करते. या मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देशाने, VerSe च्या कोणत्याही संदर्भामध्ये तिच्या उपकंपन्या, पालक कंपनी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांचा समावेश होतो.

तुम्ही सर्व आवश्यक माहितीसह grievance.officer@myjosh.in वर “काढून टाकण्याची विनंती” या विषयासह ईमेल पाठवू शकता. तुम्ही खालील पत्त्यावरदेखील सर्व आवश्यक माहितीसह तक्रारी/सूचना पोस्टाने पाठवू शकता:

श्री. नागराज

तक्रार अधिकारी

VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड

11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क,

आऊटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी,

बेंगळुरू- 560103, कर्नाटक, भारत

तक्रार यंत्रणा :

तक्रारीसाठी किंवा वापरकर्त्याच्या इतर कोणत्याही समस्येसाठी खालील पत्त्यावर ईमेलद्वारे सबमिट केले जाऊ शकते. तक्रारीमध्ये खालील गोष्टी असल्या पाहिजेत: (i) संबंधित खातेधारकाचे आमच्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्तानाव (ii) चिंतेचा विषय असलेल्या विशिष्ट कन्टेन्ट/व्हिडिओचा क्रमांक किंवा युआरएल किंवा लिंक आणि (iii) अशा काढून टाकण्याच्या विनंतीची कारणे

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 आणि त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार, तक्रार यंत्रणेचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:

श्री. नागराज

ईमेल: grievance.officer@myjosh.in

तुम्ही तक्रार फॉर्म, ईमेल किंवा पोस्टद्वारे दाखल केलेल्या कोणत्याही आणि सर्व तक्रारी या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासल्या आणि हाताळल्या जातात. VerSe विरुद्ध किंवा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित/प्रसारित केलेल्या कोणत्याही कन्टेन्टविरुद्ध दाखल केलेली कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा कायदेशीर कारवाई या मार्गदर्शक तत्त्वांच्या कोणत्याही अटींच्या अधीन नाही.

या मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देशाने, "कन्टेन्ट"चा अर्थ कोणत्याही आणि सर्व बातम्या, व्हिडिओ, इमेजेस, वापरकर्त्याने निर्माण केलेला कन्टेन्ट, प्रायोजित कन्टेन्ट किंवा प्लॅटफॉर्मवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर प्रदर्शित, प्रसारित किंवा लोकांपर्यंत पोहोचवलेला इतर कोणताही कन्टेन्ट असा आहे.

या मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देशाने, ‘जाहिरात’ म्हणजे प्लॅटफॉर्मवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर प्रदर्शित किंवा प्रसारित केलेले कोणतेही समर्थन, जाहिरात किंवा प्रमोशनल साहित्य.

VerSe स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही वेळी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते आणि म्हणून, तुम्हाला विनंती केली जाते की VerSe कडे कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यापूर्वी/पाठवण्यापूर्वी प्रत्येक वेळी ही मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.

तक्रार कोण दाखल करू शकतो?

प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कन्टेन्ट किंवा जाहिरातीमुळे पीडित कोणतीही व्यक्ती/संस्था अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. पीडित व्यक्ती/संस्थेचे कायदेशीर वारस, एजंट किंवा वकील देखील अशा कन्टेन्टविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. जर तक्रार गुन्ह्याच्या कक्षेत येत नसेल, तर कन्टेन्ट किंवा जाहिरातीमध्ये स्वारस्य नसलेली किंवा त्यामुळे पीडित नसलेली व्यक्ती कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध वैध तक्रार दाखल करू शकत नाही.

तुम्ही पीडित पक्षाचे एजंट किंवा वकील असल्यास, तुम्हाला पीडित पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्याचा तुमचा अधिकार सिद्ध करणारा कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

तक्रारीमध्ये कोणती माहिती पुरवणे आवश्यक आहे?

तुम्ही कन्टेन्टविरुद्ध तक्रार दाखल करत असल्यास, तुम्ही खालील माहिती पुरवणे आवश्यक आहे?

 • तक्रार दाखल करण्यात तुमचे स्वारस्य
 • तक्रारीचे स्वरूप
 • ज्या कन्टेन्ट/जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्याचा तपशील (कन्टेन्टची शीर्षक लिंक)
 • कन्टेन्ट/जाहिरातीशी पीडित पक्षाचा संबंध
 • कशामुळे पीडित झालात याबद्दल अचूक तथ्ये
 • तुम्ही मागणी करत असलेले उपाय
 • तक्रारीचा तपशील (तक्रारीचे स्पष्टीकरण)
 • तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे तपशील (तुम्ही)
 • पीडित पक्षाचा तपशील
 • संपर्क तपशील
 • कागदोपत्री पुरावा, लागू असल्यास (खाली चर्चा केली आहे)

तुम्ही तक्रार फॉर्मद्वारे किंवा ईमेलद्वारे तक्रार दाखल केली असली तरीही, तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती तक्रारीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तक्रारीत आवश्यक माहिती नसल्यास, तक्रार अपूर्ण मानली जाईल आणि VerSe ती विचारात घेऊ शकणार नाही किंवा तक्रारीच्या आधारावर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

'तक्रारीचे स्वरूप' म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

'तक्रारीचे स्वरूप' याच्याशी संबंधित माहिती VerSe ला तक्रारीच्या विषयावर आधारित कायदेशीर तरतुदींच्या आधारे तक्रारीचे वर्गीकरण करण्यात मदत करते. प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध तुमच्या तक्रारीच्या आधारावर, VerSe ने विविध पर्याय दिले आहेत जे तक्रारीचे स्वरूप निर्दिष्ट करू शकतात. फॉर्ममध्ये प्रदान केलेल्या प्रत्येक श्रेणीचे संक्षिप्त वर्णन खालीलप्रमाणे आहे:

कॉपीराइट उल्लंघन: कॉपीराइट, कलाकारांचे अधिकार किंवा पीडित पक्षाच्या प्रसिद्धी अधिकारांचे उल्लंघन करणारा कोणताही कन्टेन्ट/जाहिरात. यात पीडित पक्षाद्वारे निर्मित/मालकीच्या कन्टेन्टचे त्याच्या परवानगीशिवाय प्रदर्शन करणे समाविष्ट आहे.

ट्रेडमार्क उल्लंघन: कोणताही कन्टेन्ट/जाहिरात पीडित पक्षाच्या ट्रेडमार्क अधिकारांचे उल्लंघन करते किंवा बेकायदेशीरपणे कोणताही शब्द, लोगो किंवा ट्रेडमार्क कायद्यांतर्गत संरक्षित असलेले कोणतेही प्रतिनिधित्व वापरते/प्रदर्शन करते.

गोपनीयतेचे उल्लंघन: कोणत्याही कन्टेन्टमध्ये/जाहिरातीत कोणतीही माहिती, इमेज, मजकूर किंवा इतर कोणताही कन्टेन्ट आहे जी खाजगी आहे किंवा अन्यथा कोणत्याही तृतीय पक्षाच्या गोपनीयता अधिकारांचे उल्लंघन करते.

बदनामी: कोणत्याही कन्टेन्टमध्ये/जाहिरातीत अशी कोणतीही माहिती आहे जी खोटी आहे आणि 1) पीडित पक्षाच्या प्रतिष्ठेला किंवा सार्वजनिक प्रतिमेला हानी पोहोचवते किंवा 2) अन्यथाही पीडित पक्षाला सामान्य लोक कसे समजतात यावर विपरीत परिणाम करते.

खोटी/दिशाभूल करणारी: कोणताही कन्टेन्ट/जाहिरात खोटी किंवा अपूर्ण आहे आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी लोकांची दिशाभूल करते, किंवा एखादी संस्था, घटना किंवा वस्तूबद्दल लोकांचा दृष्टीकोन चुकीच्या पद्धतीने बदलते.

अश्लील/लज्जास्पद कन्टेन्ट: कोणत्याही कन्टेन्टमध्ये/जाहिरातीत कोणतीही इमेज, मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ किंवा इतर कोणतेही विधान जे तिरस्करणीय, विनयभंग करणारे, असभ्य, अश्लील किंवा अनैतिक आहे आणि दर्शकांची मती भ्रष्ट करण्याची किंवा बिघडवण्याची शक्यता आहे.

कन्टेन्ट धार्मिक भावना दुखावतो किंवा हिंसा भडकवतो: कोणत्याही कन्टेन्ट/जाहिरातीमध्ये कोणतीही इमेज, मजकूर किंवा इतर कोणताही कन्टेन्ट पीडित पक्षाच्या धार्मिक श्रद्धा किंवा भावना दुखावतो किंवा लोकांमध्ये थेट हिंसक वर्तनाला चिथावणी देतो किंवा प्रवृत्त करतो. द्वेषयुक्त भाषण असलेला कन्टेन्ट/जाहिरात, सरकार किंवा कोणत्याही धर्म किंवा धार्मिक संघटनेविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारा कन्टेन्टसुद्धा या श्रेणी अंतर्गत नोंदवला जाऊ शकतो.

या सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, तक्रार फॉर्ममध्ये “अन्यथा बेकायदेशीर” या शीर्षकाने एक खुला वर्ग दिला आहे. जर तक्रारीत मांडलेली समस्या वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये बसत नसेल तर तुम्ही तक्रारीचे स्वरूप म्हणून हे निवडू शकता आणि उपस्थित केलेली समस्या थोडक्यात नमूद करू शकता.

तुम्ही या श्रेण्यांपैकी फक्त एक श्रेणी निवडू शकता. तक्रार वरीलपैकी एकापेक्षा जास्त श्रेणींमध्ये येत असल्यास, तुम्ही तक्रारीच्या प्रत्येक श्रेणीसाठी स्वतंत्र तक्रार करू शकता आणि तक्रार सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह तथ्ये आणि तक्रारींचे विशिष्ट वर्णन देऊ शकता. तुम्ही एकाच कन्टेन्ट/जाहिरातीविरुद्ध एकापेक्षा जास्त तक्रारी दाखल केल्यास, तक्रार प्रभावीपणे हाताळता यावी यासाठी समान कन्टेन्टशी संबंधित सर्व पुढील तक्रारींमध्ये तुम्हाला तुमच्या मागील सर्व तक्रारींचा तक्रार आयडी नमूद करणे आवश्यक आहे.

तक्रारीसोबत कोणता कागदोपत्री पुरावा आवश्यक आहे?

तक्रारीचे स्वरूप आणि तक्रारीनुसार, कागदोपत्री पुरावे वेगवेगळे असू शकतात. विविध तक्रारीच्या स्वरूपाशी संबंधित असू शकतील अशी कागदोपत्री पुराव्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

कॉपीराइट उल्लंघन: पीडित पक्षाच्या अधिकारांचा पुरावा आणि उल्लंघनाचा पुरावा.

ट्रेडमार्क उल्लंघन: ट्रेडमार्क नोंदणी प्रमाणपत्र, उल्लंघनाचा पुरावा.

गोपनीयतेचे उल्लंघन: कन्टेन्ट किंवा जाहिरात खाजगी आहे किंवा अन्यथा गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करते याचा पुरावा.

जर तुम्ही पीडित पक्षाचे एजंट किंवा वकील असाल, तर तुम्ही तक्रारीसह, पीडित पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्याचा तुमचा अधिकार सिद्ध करणारी पॉवर ऑफ टर्नी किंवा अधिकृतता पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

तक्रारीत दिलेली माहिती अपूर्ण किंवा असत्य असल्यास काय होते?

कायद्याचे पालन करणारी एक संस्था असल्याने, प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध दाखल केलेल्या प्रत्येक तक्रारीचा VerSe विचार करते आणि तपास करते. आवश्यक असल्यास VerSe अंतर्गत तपासदेखील करत असली तरीही, परंतु कोणतीही तक्रार हाताळताना माहितीचा प्राथमिक स्त्रोत तक्रारीमध्ये प्रदान केलेली माहिती हाच असतो. तक्रारीमध्ये पुरवलेल्या माहितीच्या आधारे, VerSe तक्रारीचे स्वरूप, संबंधित कन्टेन्ट/जाहिरातीद्वारे उल्लंघन केलेले अधिकार/कायदे, प्रकरणात सहभागी पक्ष आणि तक्रारीमध्ये उपस्थित केलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेली इतर संबंधित माहिती निर्धारित करते.

तक्रारीचे निराकरण करण्यात VerSe कशी मदत करू शकते?

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत केवळ तंत्रज्ञान प्रदाता आणि मध्यस्थ असल्याने, VerSe प्लॅटफॉर्मवरून पुढील परिस्थितीत कन्टेन्ट किंवा जाहिरात काढून टाकण्यास बांधील आहे, जर 1) तिला सर्व आवश्यक कागदपत्रांसह, प्रथमदर्शनी आणि स्पष्टपणे सिद्ध केले गेले की प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट किंवा जाहिरात कोणत्याही तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे किंवा 2) कायद्यानुसार योग्य प्राधिकरणाकडून काढून टाकण्याचे निर्देश देणारा आदेश प्राप्त झाला तर.

कायद्यानुसार, VerSe तुम्हाला कन्टेन्टचे तपशीलदेखील देऊ शकते ज्यामुळे तुम्हाला थेट संपर्क साधण्यात आणि तुमच्या तक्रारीचे निराकरण करण्यात मदत होऊ शकते.

VerSe ची कोणत्याही कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्धच्या तक्रारींची तपासणी आणि निराकरण करण्याची प्रक्रिया ही माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000, माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) नियम, 2011 आणि भारतात लागू असलेल्या इतर सर्व कायद्यांनुसार आहे. कोणत्याही कायद्यानुसार VerSe वर तक्रारीत प्रदान केलेल्या बाबींच्या पलीकडे चौकशी करण्याचे बंधन नाही आणि VerSe ने केलेली कोणतीही तपासणी किंवा कारवाई ही स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आहे आणि VerSe ला त्याबाबत तुम्हाला किंवा इतर कोणत्याही पक्षाला कळवण्याची आवश्यकता नाही.

VerSe तिच्या प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्टच्या प्रकाशनासाठी जबाबदार आहे का?

नाही, VerSe हा केवळ मध्यस्थ आहे, जो विविध तृतीय-पक्ष कन्टेन्ट प्रदात्यांना त्यांची कन्टेन्ट तुमच्यासह अंतिम वापरकर्त्यांसाठी प्रकाशित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रदान करतो. प्लॅटफॉर्मवर कोणताही कन्टेन्ट किंवा जाहिरातीचे लेखन किंवा प्रकाशन करण्यात VerSe अजिबात सहभागी नाही.

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 79 नुसार, प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेल्या कोणत्याही कन्टेन्टसाठी किंवा त्याच्या कोणत्याही भागासाठी VerSe जबाबदार नाही. प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केलेल्या कोणत्याही कन्टेन्टसाठी VerSe चे दायित्व प्लॅटफॉर्मवरून कन्टेन्ट काढून टाकण्यापुरते मर्यादित आहे जर 1) त्याला सर्व आवश्यक पुराव्यांसह, प्रथमदर्शनी तक्रार प्राप्त झाली आणि कन्टेन्ट तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्टपणे स्थापित केले. किंवा 2) त्याला कायद्यानुसार योग्य प्राधिकरणाकडून काढून टाकण्याचा आदेश प्राप्त झाला.

प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही कन्टेन्टचे लेखन किंवा प्रकाशन करण्यात VerSe चा सहभाग नसल्यामुळे, कोणत्याही कन्टेन्टने किंवा त्याच्या भागाने कोणत्याही त्यांना कोणतीही नुकसानभरपाई किंवा खर्च देण्यास ती बांधील नाही. मध्यस्थ असल्याने, VerSe कोणत्याही कन्टेन्टने किंवा त्याच्या भागाने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या कोणत्याही दिवाणी खटल्याच्या अधीन नाही.

VerSe प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट आणि जाहिरातींची कायदेशीरता कशी सुनिश्चित करते?

वर स्पष्ट केल्याप्रमाणे, VerSe हा केवळ एक मध्यस्थ आहे जो विविध तृतीय पक्षांना त्यांचा कन्टेन्ट प्रदर्शित करण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रदान करतो. VerSe चे या तृतीय-पक्ष कन्टेन्ट प्रदात्यांशी करार आहेत जे प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेला कन्टेन्ट अपलोड करतात. VerSe सोबतच्या त्यांच्या करारांमध्ये, या कन्टेन्ट प्रदात्यांनी असे विधान केले आहे की प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला त्यांचा कन्टेन्ट किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही कायद्याचे किंवा कोणत्याही तृतीय-पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही. अधिक विशिष्‍टपणे, कन्टेन्ट प्रदात्‍यांनी खालील निवेदन केले आहे:

 • प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट अपलोड करण्याचा त्यांना अधिकार आहे,
 • कन्टेन्ट कॉपीराइट, ट्रेडमार्क अधिकार, गोपनीयता अधिकार, प्रसिद्धी हक्क किंवा इतर कायदेशीर अधिकारांसह कोणत्याही तृतीय-पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही,
 • कन्टेन्ट बदनामीकारक, अश्लील, अब्रुनुकसानीकारक, असभ्य, अनैतिक किंवा अन्यथा बेकायदेशीर नाही,
 • कन्टेन्ट कोणत्याही प्रकारे हिंसा, सरकारविरुद्ध बंड किंवा द्वेषाला प्रोत्साहन किंवा चिथावणी देत नाही; किंवा कोणत्याही धार्मिक भावना दुखावत नाही किंवा कोणत्याही प्रतिबंधित पदार्थ, उत्पादन किंवा सेवांच्या वापराचे किंवा वितरणाचे समर्थन करत नाही.

VerSe ची स्वतःची धोरणे आणि करार देखील आहेत जे त्याच्या प्लॅटफॉर्मचा वापर नियंत्रित करतात. हे करार आणि धोरणे वापरकर्त्यांसाठी बंधनकारक आहेत आणि प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तयार केले गेले आहेत. प्लॅटफॉर्म वापरून, वापरकर्ते कोणत्याही कायद्याचे किंवा VerSe च्या वापराच्या अटींचे उल्लंघन करणारा कोणताही कन्टेन्ट (मजकूर, इमेजेस, व्हिडिओ, टिप्पण्या इ.) अपलोड न करण्याचे मान्य करतात.

मध्यस्थ असल्याने, VerSe ला तिच्या प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्टचे निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही. VerSe ला केवळ तेव्हाच कोणत्याही कन्टेन्टविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे जेव्हा तिला योग्य प्राधिकरणाकडून आदेश प्राप्त होतो किंवा प्रथमदर्शनी केस सिद्ध करणारी संपूर्ण तक्रार प्राप्त होते. तथापि, VerSe ने एखादा कन्टेन्ट कोणत्याही कायद्याचे किंवा तिच्या प्लॅटफॉर्मच्या अटींचे उल्लंघन करत असल्याचा स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेतल्यास, असा कन्टेन्ट काढून टाकण्याचा अधिकार ती राखून ठेवते.

VerSe कोणत्याही कन्टेन्टविरुद्ध दाखल केलेली तक्रार कशी हाताळते?

VerSe कडे सक्षम कायदेशीर टीम्स आहेत, ज्या प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही कन्टेन्टविरुद्ध दाखल केलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करते. ह्या टीम्स त्यांच्या अंतर्गत संशोधन आणि तुम्ही प्रदान केलेल्या कन्टेन्ट आणि पुराव्याच्या आधारे प्रकरणाचा तथ्यात्मक आणि कायदेशीर दोन्ही आधारांवर तपास करतात. तक्रारीतील कन्टेन्ट, दिलेले पुरावे, अंतर्गत संशोधन, कायदेशीर तरतुदी आणि कडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित, या टीम्स तक्रार आणि समस्येचे मूल्यांकन करतात आणि तुम्हाला किंवा पीडित पक्षाला कोणते उपाय प्रदान केले जाऊ शकतात हे ठरवतात.

VerSe तक्रार हाताळताना उचललेल्या पावलांचा तपशील देते का?

तक्रार काटेकोरपणे गोपनीय स्वरूपाच्या एका क्लिष्ट छाननी प्रक्रियेतून जाते. कायद्याने किंवा योग्य न्यायिक/अर्ध-न्यायिक प्राधिकरणाद्वारे आवश्यक असल्याशिवाय, VerSe एखादी विशिष्ट तक्रार हाताळताना VerSe ने उचललेल्या पावलांचे तपशील उघड करू शकणार नाही.

दाखल केलेल्या सर्व तक्रारींना प्रतिसाद देणे VerSe ला बंधनकारक आहे का?

VerSe प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही/सर्व कन्टेन्टविरुद्ध दाखल केलेल्या सर्व तक्रारींचा विविध तथ्यांच्या आधारे विचार करते, ज्यामध्ये तक्रारीत दिलेली माहिती, तक्रारीचे स्वरूप, प्रदान केलेले कागदोपत्री पुरावे, तक्रारीची आणि तक्रारीतील समस्येची कायदेशीर वैधता यांचा समावेश आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही. या तथ्यांच्या आधारे, VerSe तुम्हाला प्रतिसाद पाठवेल किंवा पाठवणार नाही किंवा तक्रारीच्या आधारावर कोणतीही कारवाई करेल किंवा करणार नाही. प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्टच्या विरोधात दाखल केलेल्या प्रत्येक तक्रारीच्या आधारे प्रतिसाद देण्यास किंवा कारवाई करण्यास VerSe बांधील नाही.

तुम्ही खोटी किंवा खोडसाळ तक्रार दाखल केल्यास काय होते?

तुम्ही तक्रारीत खोटी माहिती दिल्यास, VerSe आवश्यक ती सर्व माहिती गोळा करू शकणार नाही किंवा तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकणार नाही. तक्रारीमध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन तुम्ही VerSe ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास, VerSe तिच्या कायदेशीर हक्कांचे आणि प्लॅटफॉर्मच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी तुमच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करू शकते. कृपया लक्षात ठेवा की तुम्ही खोट्या आणि खोडसाळ तक्रारी दाखल केल्यास तुम्ही नुकसानभरपाई (खर्च आणि वकिलाच्या फीसह) देण्यासाठी तुम्ही जबाबदार असू शकता, कारण VerSe तक्रारींचा आढावा घेण्यासाठी पुनरावलोकन करण्यासाठी भरपूर संसाधने खर्च करते.

ही मार्गदर्शक तत्त्वे तुमच्यावर बंधनकारक आहेत का?

प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही कन्टेन्टविरुद्ध VerSe कडे तक्रार दाखल करण्यात मदत करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे दाखल केलेली तक्रार हाताळण्याशी संबंधित किंवा आवश्यक कायदेशीर तरतुदींचे तपशीलवार वर्णन करतात. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेली कोणतीही गोष्ट कायद्याच्या कक्षेबाहेर नाही आणि म्हणूनच, ही मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक आहेत की नाही याची पर्वा न करता तुम्ही संबंधित कायदेशीर तरतुदींना बांधील असाल.

ज्या कन्टेन्टबाबत तुम्ही तक्रार दाखल केली आहे त्या कन्टेन्टवर VerSe काय कारवाई करू शकते?

मध्यस्थ म्हणून, VerSe कन्टेन्ट किंवा त्यातील कोणताही भाग स्वतः किंवा तिला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संपादित करू किंवा बदलू शकत नाही. तथापि, VerSe ला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कन्टेन्ट पूर्णपणे काढून टाकण्याची परवानगी आहे.

पुढील प्रकरणांमध्ये कन्टेन्ट काढून टाकणे VerSe ला आवश्यक आहे:

 • VerSe ला योग्य न्यायिक किंवा अर्ध-न्यायिक प्राधिकरणाकडून याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे,
 • VerSe ने काही कन्टेन्ट काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर तरतूद आहे,
 • विचाराधीन कन्टेन्टचा मालक/क्रिएटर त्याच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःहून किंवा तक्रार प्राप्त झाल्यावर कन्टेन्ट काढून टाकतो आणि त्याबाबत VerSe ला कळवतो.

पुढील प्रकरणांमध्ये VerSe कन्टेन्ट काढून टाकू शकते:

 • तिला प्रथमदर्शनी केस असलेली संपूर्ण आणि योग्यरित्या सिद्ध केलेली तक्रार प्राप्त झाल्यावर,
 • VerSe, तिच्या विवेकबुद्धीनुसार, कन्टेन्ट कोणत्याही कायद्याचे किंवा तिच्या प्लॅटफॉर्मच्या अटींचे उल्लंघन करतो हे निर्धारित करते.

29.समाप्ती 

29.1. तुमचे खाते डिलीट करून आणि प्लॅटफॉर्मचा सर्व वापर थांबवून तुम्ही या अटी कोणत्याही वेळी समाप्त करू शकता. कृपया याची नोंद घ्या की तुमच्या संगणकावरून किंवा मोबाईल डिव्हाईसवरून प्लॅटफॉर्म डिलीट केल्यावर  तुमचे खाते डिलीट होणार नाही आणि तुम्ही आधी प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला कोणताही वापरकर्ता कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवरच राहील. तुम्हाला तुमचे खाते डिलीट करायचे असल्यास कृपया साईटवर खात्याला लॉगीन करा किंवा ॲपमध्ये खाते प्रोफाईल चिन्हावर क्लिक करा. तुमच्या खाते प्रोफाईलमध्ये गेलात की “खाते डिलीट करा” वर क्लिक करा. कृपया याची नोंद घ्या की तुम्ही तुमचे खाते डिलीट केलेत तर, सर्व वापरकर्ता कन्टेन्ट आपोआप डिलीट केला जाईल. त्याशिवाय, तुम्ही प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला वापरकर्ता कन्टेन्टचा एखादा विशिष्ट आयटम तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तुमचा वापरकर्ता कन्टेन्ट डिलीट केल्यावर तुमचे खाते डिलीट होणार नसेल किंवा या कराराच्या अटी समाप्त होणार नसतील तर; प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ता कन्टेन्ट डिलीशनची फंक्शनॅलिटी वापरून तुम्ही ते करू शकता. या अटी आणि पोस्ट केलेली कोणतीही सुधारणा तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करताना असताना लागू आणि प्रभावी असतील आणि विशिष्ट तरतुदी समाप्ती नंतरसुद्धा लागू असणे सुरू राहील.

29.2 कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणासाठी प्लॅटफॉर्म अनइन्स्टॉल करून किंवा डिलीट करून तुम्ही हा करार  कोणत्याही वेळी समाप्त करू शकता. जर तुम्हाला आमच्या सेवा पुन्हा कधीही वापरायच्या नसतील आणि तुमचे खाते डीलीट करायचे असल्यास आम्हाला grievance.officer@myjosh.in येथे संपर्क करा. आम्ही तुम्हाला पुढील मदत देऊ आणि तुम्हाला प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करू. तुम्ही तुमचे खाते डीलीट करायची निवड केल्यावर तुम्ही तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकणार नाही किंवा तुम्ही जोडलेला कोणताही कन्टेन्ट पुन्हा मिळवू शकणार नाही.

29.3 तुमचे वापरकर्ता खाते कोणत्याही वेळी निष्क्रिय करण्याचा किंवा समाप्त करण्याचा, तुम्ही अपलोड केलेला किंवा शेअर केलेला कोणताही कन्टेन्ट काढून टाकण्याचा किंवा निष्क्रिय करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. यामध्ये तुम्ही या अटींच्या कोणत्याही तरतुदींचे अनुपालन करण्यास अयशस्वी ठरणे, आमच्या विवेकबुद्धीनुसार, तुमच्या खात्यावर घडणाऱ्या कोणत्याही कृतींमुळे आमच्या सेवांची हानी होणे किंवा अडथळा येणे अथवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन होणे किंवा लागू असलेले कोणतेही कायदे किंवा नियम यांचे उल्लंघन होणे, यांचा समावेश आहे. अशी समाप्ती किंवा निलंबन झाल्यास तुम्ही या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाही किंवा तो वापरू शकत नाही आणि हे मान्य करता की तुम्ही प्लॅटफॉर्मवर पुन्हा नोंदणी करणार नाही अथवा दुसऱ्या सदस्याचे नाव वापरून किंवा अन्यप्रकारे त्यावर प्रवेश करणार नाही.

29.4 समाप्तीचा परिणाम. हा करार, तुमचे खाते किंवा प्लॅटफॉर्मला तुमचा प्रवेश किंवा वापराच्या समाप्तीमध्ये प्लॅटफॉर्मला प्रवेश काढून टाकणे आणि प्लॅटफॉर्मच्या भविष्यातील वापरास प्रतिबंध याचा समावेश असू शकतो. या कराराच्या किंवा तुमच्या खात्याच्या समाप्तीमध्ये तुमचे वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि सर्व संबंधित माहिती, फाईल्स आणि तुमच्याशी संबंधित किंवा तुमच्या खात्यात असलेला वापरकर्ता कन्टेन्ट (किंवा त्याचा कोणताही भाग), तुमच्या वापरकर्ता कन्टेन्टसह यांचा संबंध काढून टाकला जाईल. या कराराच्या समाप्तीनंतर, तुमचे सर्व प्रोफाईल कन्टेन्ट आणि इतर माहिती डीलीट केली जाऊ शकते. मात्र, विशिष्ट तपशील संग्रहणाच्या आणि कायदेशीर हेतूंसाठी आम्ही ठेवून देऊ शकतो. तुमच्या कराराची/खात्याची समाप्ती झाली असली तरीही, कन्टेन्टचे दायित्व सर्व काळ वापरकर्त्याकडेच असणे सुरू राहील. या कराराच्या समाप्तीनंतर, मोबाईल सॉफ्टवेअरसह प्लॅटफॉर्म वापरण्याचा तुमचा अधिकार आपोआप समाप्त होईल. तुमच्या वापरकर्ता कन्टेन्टच्या डीलीशनसह कोणतीही स्थगिती किंवा समाप्ती यासाठी VerSe तुम्हाला कोणत्याही प्रकारे उत्तरदायी असणार नाही.आवश्यकता असेल तोपर्यंत आणि/किंवा स्थानिक कायद्यांतर्गत परवानगी असेपर्यंत VerSe कन्टेन्ट/डेटा ठेवेल आणि वापरेल. या कराराच्या सर्व तरतुदी त्यांच्या स्वरूपामुळे या कराराच्या समाप्तीनंतरसुद्धा चालू राहतील, त्यामध्ये त्यात कोणत्याही मर्यादेशिवाय, हमीचा अस्वीकार, नियामक कायदे आणि दायित्वाची मर्यादा यांचा समावेश आहे.                  

29.5. वेळोवेळी या अटी बदलण्याचा अधिकार VerSe ला आहे. अशा कोणत्याही बदलांना तुमची मान्यता नसेल तर प्लॅटफॉर्मला प्रवेश करणे, लाभ घेणे किंवा वापरणे थांबवण्याची विवेकबुद्धी तुम्हाला आहे. अशा कोणत्याही बदलांच्या सूचनेनंतर प्लॅटफॉर्मला प्रवेश करणे किंवा तो वापरणे सुरू ठेवल्यास तुम्ही या बदलांची पोच देता, असे दर्शवले जाईल आणि तुम्ही अशा सुधारित अटींना बांधील असाल.

29.6. या कराराच्या सर्व तरतुदी त्यांच्या स्वरूपामुळे करार समाप्तीनंतरसुद्धा लागू असतील त्यात कोणत्याही मर्यादेशिवाय मालकीच्या तरतुदी, हमीचा अस्वीकार, नुकसानभरपाई आणि दायित्वाची मर्यादा यांचा समावेश आहे.

28. मध्यस्थ, VerSe यांच्याद्वारे माहितीच्या मासिक प्रकटीकरणात  माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मिडीया इथिक्स कोड) नियम, 2021 अंतर्गत आवश्यक असलेल्या माहितीचे प्रकटीकरण केले जाते. या प्रकटीकरणासाठी, कृपया भेट द्या:    

तक्रारीचे प्रकटीकरण:  तक्रारीचा डेटा

कोड ऑफ इथिक्सनुसार, VerSe अशा अस्तित्वात असलेल्या नियमांच्या अनुपालनासाठीची बांधिलकी दर्शवते.