जानेवारी २०२३
Josh - गोपनीयता धोरण
कृपया हे गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा. हे गोपनीयता धोरण VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ताबडतोब अंमलात आणले गेले असून तिचे व्यवसायाचे ठिकाण हेलिओस बिझिनेस पार्क, 11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझिनेस पार्क, आउटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी, बेंगळुरू-560103, कर्नाटक, भारत येथे आहे (“Josh”, “VerSe” , “आम्ही”, “आपण” किंवा “आमचे”).
1. सामान्य
- Josh तुमची (“तुम्ही”, “तुमची” किंवा “वापरकर्ता”) गोपनीयता खूप गांभीर्याने घेते आणि तुमचा खाजगी डेटा/माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करते. Josh तिचा प्लॅटफॉर्म आणि सेवा वापरण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण प्रदान करण्याचा प्रयत्न करते. तुमच्याकडून Josh ने संकलित केलेली कोणतीही खाजगी माहिती केवळ या गोपनीयता धोरणानुसार आणि येथे प्रदान केलेल्या अटी आणि शर्तींनुसार वापरली जाईल.
- हे गोपनीयता धोरण Josh च्या Josh नावाच्या (“प्लॅटफॉर्म” किंवा “Josh”) मोबाइल किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाला आणि प्लॅटफॉर्मच्या संबंधात Josh ने ऑफर केलेल्या सेवांना (“सेवा”) लागू होते.
- हे गोपनीयता धोरण आम्ही मोबाइल किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स आणि/किंवा त्याच्याशी संबंधित सेवांच्या वापरकर्त्यांकडून गोळा केलेली माहिती कोणत्या पद्धतीने गोळा करतो, वापरतो, सांभाळतो आणि उघड करतो ते ठरवते.
- तुम्ही हे धोरण काळजीपूर्वक वाचावे आणि तुम्ही धोरणाच्या अटींशी सहमत असाल तरच तुमची संमती द्यावी असा सल्ला दिला जातो. प्लॅटफॉर्मवर तुमची प्रोफाईल वापरून किंवा ती रजिस्टर करून आणि/किंवा प्लॅटफॉर्मच्या संदर्भात ऑफर केलेल्या सेवांचा वापर करून, तुम्ही या गोपनीयता धोरणात नमूद केलेल्या पद्धतीने तुमच्या माहितीचा वापर, संकलन, हस्तांतरण, संग्रह, प्रकटीकरण आणि इतर वापरांना संमती देत आहात. या धोरणाच्या उद्देशाने, Josh च्या कोणत्याही संदर्भामध्ये त्याच्या संलग्न कंपन्या, उपकंपन्या आणि त्याच्याशी संबंधित संस्थांचा समावेश असेल.
- हा प्लॅटफॉर्म अपडेट, डाउनलोड, इंस्टॉल करून आणि/किंवा त्याचा ॲक्सेस/वापर करणे सुरू ठेवून, तुम्ही या गोपनीयता धोरणातील कोणतेही बदल, दुरुस्ती, वाढ किंवा सुधारणांना बांधील राहण्यास सहमती देता.
- हे गोपनीयता धोरण तृतीय पक्षांच्या पद्धतींना लागू होत नाही ज्यांच्यावर Josh ची मालकी, नियंत्रण किंवा व्यवस्थापन नाही, ज्यामध्ये कोणत्याही तृतीय-पक्ष वेबसाइट्स, सेवा, ॲप्लिकेशन्स किंवा व्यवसाय (तृतीय-पक्ष सेवा) यांचा समावेश होतो परंतु यापुरतेच मर्यादित नाही. Josh त्या तृतीय-पक्ष सेवांच्या कन्टेन्टची किंवा गोपनीयता धोरणांची जबाबदारी घेत नाही. तुम्ही प्लॅटफॉर्मद्वारे ॲक्सेस करत असलेल्या सर्व तृतीय-पक्ष सेवांची गोपनीयता धोरणे काळजीपूर्वक वाचण्यासाठी Josh तुम्हाला प्रोत्साहित करत आहे.
- हे गोपनीयता धोरण प्लॅटफॉर्मच्या सेवा अटींच्या अधीन आहे
- तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या कोणत्याही तरतुदींशी सहमत नसल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवा डाउनलोड, स्थापित आणि/किंवा वापरू शकत नाही. Josh हे पृष्ठ अपडेट करून कधीही या गोपनीयता धोरणामध्ये सुधारणा करू शकते, बदल करू शकते, भर घालू शकते, दुरुस्ती करू शकते किंवा सुधारू शकते.
2. Josh द्वारे कोणती माहिती गोळा केली जाऊ शकते
- तुम्ही खाते तयार करता आणि प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट अपलोड करता तेव्हा तुम्ही आम्हाला दिलेली माहिती आम्ही गोळा करतो आणि त्यावर प्रक्रिया करतो. यामध्ये तुमच्या प्लॅटफॉर्मच्या वापराविषयीची तांत्रिक आणि वर्तणूकविषयक माहिती समाविष्ट आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केल्यास आणि खाते तयार न करता प्लॅटफॉर्मशी संवाद साधल्यासदेखील आम्ही तुमच्याबद्दल माहिती गोळा करतो. Josh वापरकर्त्यांनी प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यापासून ते वापरकर्त्यांद्वारे कन्टेन्ट सबमिट करण्यापर्यंत किंवा वापरकर्ता सेवा ॲक्सेस करत/वापरत असताना विविध टप्प्यांवर वापरकर्त्यांकडून माहिती गोळा करू शकते.
- Josh तुमची ओळख पटवू शकेल अशी वैयक्तिक माहिती गोळा करू शकते. यामध्ये प्लॅटफॉर्म डाउनलोड, इन्स्टॉल आणि/किंवा वापर/ॲक्सेस करताना किंवा प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या सेवा किंवा वैशिष्ट्यांच्या ॲक्सेस/वापराच्या संबंधात किंवा प्लॅटफॉर्मच्या संबंधात सबमिट केलेल्या माहितीचा समावेश असू शकतो, परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही. संकलित केलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये तुमचे नाव, फोटो, पत्रव्यवहाराचा पत्ता, ईमेल पत्ता, फोन नंबर आणि लोकसंख्याविषयक माहिती उदाहरणार्थ लिंग, राष्ट्रीयत्व, पोस्टकोड आणि इतर वैयक्तिक माहिती समाविष्ट असू शकते ज्यामध्ये जन्माची तारीख, वेळ किंवा ठिकाण, स्थान, स्वारस्ये, प्राधान्ये, आवडीनिवडी आणि वापराची माहिती यांचा समावेश असू शकतो परंतु त्या पुरतेच मर्यादित नाही.
- जर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे सबमिट केली किंवा प्लॅटफॉर्म किंवा सेवांद्वारे सोशल नेटवर्किंग साइटशी कनेक्ट करून अशा माहितीचा ॲक्सेस आम्हाला प्रदान केला (उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मशी कनेक्ट केलेल्या सुविधा किंवा सेवा वापरता किंवा प्लॅटफॉर्मशी संबंधित काही कृत्यांमध्ये भाग घेता, ज्यामध्ये सदस्य बनणे किंवा खात्यासाठी साइन अप करणे किंवा फेसबुक, ट्विटर किंवा गुगल प्लस यांसारख्या परंतु यापुरतेच मर्यादित नसलेल्या सोशल नेटवर्कद्वारे खाते लिंक करणे यांचा समावेश होतो परंतु यापुरतेच मर्यादित नाही) तरच Josh वैयक्तिक माहिती संकलित करते.
- Josh आमच्याशी ईमेल किंवा फोनद्वारे संभाषण साधताना किंवा प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवांची इतर कोणतीही परस्परसंवादी/अ-परस्परसंवादी वैशिष्ट्ये ॲक्सेस करण्यासाठी/वापरण्यासाठी तुम्ही प्रदान केलेली वैयक्तिक माहितीदेखील संकलित करू शकते.
- तुम्ही वैयक्तिक माहिती पुरवण्यास कधीही नकार देऊ शकता; तथापि, तसे करणे तुम्हाला प्लॅटफॉर्म आणि/किंवा प्लॅटफॉर्म आणि सेवांची काही वैशिष्ट्ये वापरण्यापासून रोखू करू शकते.
- जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म वापरता, ॲक्सेस करता किंवा त्याच्याशी संवाद साधता आणि/किंवा त्याच्या सेवा वापरता, तेव्हा Josh इतर माहिती संकलित आणि संग्रहित करू शकते, जी वैयक्तिक माहिती असू शकते किंवा नसूही शकते. अशा माहितीमध्ये मोबाइलचे किंवा कॉम्प्युटरचे नाव, आवृत्ती, वापरलेल्या डिव्हाइसचा प्रकार, तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि आवृत्ती, मोबाइल डिव्हाइसचा युनिक आयडी, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर संदर्भित केलेली तृतीय पक्ष ॲप्स किंवा वेबसाइट्स किंवा सेवा, भाषा प्राधान्ये, स्थानाची माहिती, आयपी पत्ता, तांत्रिक माहिती, तृतीय-पक्षाच्या ॲप्सबद्दल माहिती ज्यात पॅकेज नावाचा (म्हणजे प्ले स्टोअरवरील पॅकेज आयडीसारखे) समावेश असू शकतो परंतु तेवढेच मर्यादित नाही, पॅकेज आवृत्ती, इंस्टॉलेशन आणि/किंवा अनइंस्टॉलेशनच्या घटनांची माहिती आणि वापरकर्त्याबद्दल इतर तत्सम माहिती यांचा समावेश असू शकतो.
- तुमच्या स्पष्ट विशिष्ट संमतीच्या आधारे, आम्ही अतिरिक्त माहितीदेखील संकलित करू शकतो ज्यामध्ये जीपीएस, फोन मेमरी इत्यादींचा समावेश आहे परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही. अशी माहिती प्लॅटफॉर्मवरील तुमचे प्रोफाइल किंवा त्यातील कन्टेन्ट अपडेट करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
- तुम्हाला वैयक्तिक आणि/किंवा इतर माहिती Josh ला पुरवायची किंवा शेअर करायची नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म डाउनलोड, इंस्टॉल आणि/किंवा वापरू शकत नाही. Josh ला वैयक्तिक आणि इतर माहिती प्रदान करून, तुम्ही Josh ला या गोपनीयता धोरणात दिल्यानुसार सदर माहितीचा वापर करण्याची परवानगी देण्यास सहमत आहात.
3. Josh गोळा केलेली माहिती कशी वापरते
a. Josh तुमची वैयक्तिक माहिती आणि इतर माहिती व्यवसाय आणि/किंवा बिगर-व्यावसायिक हेतूंसाठी संकलित करू शकते आणि वापरू शकते. Josh खालील हेतूंसाठी माहिती वापरू शकते:
- प्लॅटफॉर्मवर लॉग इन करताना तुमचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड तुम्हाला ओळखण्यासाठी वापरला जाऊ शकतो. Josh तुमची वैयक्तिक माहिती प्लॅटफॉर्मवरील तुमचा ॲक्सेस नियंत्रित करण्यासाठी तसेच प्लॅटफॉर्म आणि सेवांचा वापर नियंत्रित करण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, प्लॅटफॉर्म वापरण्याचा तुमचा अनुभव आणि/किंवा कोणत्याही ईमेल न्यूजलेटरचा किंवा Josh तुम्हाला वेळोवेळी पाठवू शकेल अशा इतर साहित्याचा कन्टेन्ट कस्टमाइज करण्यासाठी आणि कन्टेन्ट व वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीच्या आधारे उपयुक्त किंवा मनोरंजक माहिती प्रदान करण्यासाठी वापरू शकते. तुमचा ईमेल पत्ता वापरकर्ता माहिती, प्रशासकीय माहिती, खाते सेटिंग्जमधील बदल आणि प्लॅटफॉर्म/सेवांमध्ये कोणतेही बदल किंवा Josh च्या नवीन धोरणांबाबतचे अपडेट्स पाठवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, तुम्ही आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सामील होणे निवडल्यास, तुम्हाला कंपनीच्या बातम्या, संबंधित उत्पादन किंवा सेवा माहिती इत्यादींशी संबंधित असणारे ईमेल प्राप्त होतील. तुमचा ईमेल पत्ता कोणत्याही चौकशा, प्रश्न आणि/किंवा तुम्ही केलेल्या इतर कोणत्याही विनंत्या यांना प्रतिसाद देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. कोणत्याही वेळी तुम्हाला भविष्यात ईमेल प्राप्त करण्यापासून अनसबस्क्राईब करायचे असल्यास, Josh ने प्रत्येक ईमेलच्या तळाशी सदस्यत्व रद्द करण्याच्या तपशीलवार सूचना समाविष्ट केल्या आहेत किंवा तुम्ही प्लॅटफॉर्मद्वारे Josh शी संपर्क साधू शकता.
- Josh प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये सुधारण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवांच्या वापराचे आणि प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या आणि वापरणाऱ्या लोकांचे विश्लेषण करण्यासाठी गोळा केलेल्या माहितीचा आणखी वापर करू शकते. तुम्हाला कस्टमाइज केलेला कन्टेन्ट, जाहिराती आणि वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी Josh तुमच्या प्लॅटफॉर्मच्या वापराचे विश्लेषण करण्यासाठी तुमची माहिती वापरू शकते. तुम्ही दिलेली माहिती तुमच्या ग्राहक सेवा विनंत्यांना आणि सहाय्याच्या गरजांना अधिक कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास Josh ला मदत करते.
- वापरकर्ते, समूह स्वरूपात, प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवा कशा वापरत आहेत हे समजून घेण्यासाठी Josh एकत्रित माहिती वापरू शकते. Josh वापरकर्त्याने प्रदान केलेली वैयक्तिक माहिती Josh च्या कराराचे आणि कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी वापरू शकते.
- तुमच्या आवडीनिवडींच्या आधारे कन्टेन्ट्स आणि सेवा वैयक्तिकृत करण्यासाठी Josh तुमची वैयक्तिक नसलेली माहिती उदाहरणार्थ तृतीय-पक्षाच्या ॲप्सशी संबंधित माहिती वापररू शकते, ज्यामध्ये पॅकेज नाव (म्हणजे प्लेस्टोअरवरील पॅकेज आयडीसारखे), पॅकेज आवृत्ती, इंस्टॉलेशन आणि/किंवा अनइंस्टॉलेशनच्या घटनांची माहिती यांचा समावेश असू शकतो परंतु तेवढेच मर्यादित नाही. Josh तुमची बिगर-वैयक्तिक माहिती तुम्ही इंस्टॉल केलेल्या किंवा वापरलेल्या इतर ॲप्लिकेशन्सच्या संदर्भात किंवा त्यांच्याकडील कन्टेन्टचा प्रचार करण्यासाठी किंवा तुमच्यासाठी कस्टमाइज केलेले शेअरिंग पर्याय तयार करण्यासाठी वापरू शकते.
- प्लॅटफॉर्म आणि सेवांची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी Josh प्लॅटफॉर्म आणि सेवांचा तुमचा वापर आणि प्लॅटफॉर्म आणि सेवांना भेट देणारे आणि वापरणारे लोक यांचे विश्लेषण करण्यासाठी तुमची माहिती वापरू शकते. प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवा ॲक्सेस करताना, वापरताना किंवा इंस्टॉल करताना, तुमची माहिती अशा तृतीय पक्षांना देखील ॲक्सेसिबल असू शकते ज्यांचे एसडीके (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स) प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट केलेले असतात. अशा एसडीकेजमध्ये गुगल ॲड्स, गुगल प्लॅटफॉर्म इंडेक्सिंग, गुगल सपोर्ट लायब्ररी, गुगल डिझाइन लायब्ररी, लॉगिनसाठी गुगल ऑथेंटिकेशन, मोबविस्टा (जाहिराती), ॲपनेक्स्ट नेटिव्ह (जाहिराती), ॲपनेक्स्ट इंटरस्टिशियल (जाहिराती), फेसबुक ऑडियन्स नेटवर्क (जाहिराती), व्हीमॅक्स (जाहिराती), मस्तॲडव्ह्यू (एमरेड), ग्राफिक्ससाठी ग्लाईड, डीपलिंक सपोर्टसाठी ब्रँच आयओ, बायडू (जाहिराती), डीपलिंक सपोर्टसाठी फायरबेस, आयएमए (जाहिराती), ॲपनेक्स्टॲक्शन्स (जाहिराती), इमेज हाताळणीसाठी पिकासो, कोड कार्यक्षमतेसाठी आरएक्सजावा, रेट्रोफिट आणि डॅगर, नेटवर्क कार्यक्षमतेसाठी ओकेएचटीटीपी, ओट्टो इव्हेंट बस, मेमरी ऑप्टिमायझेशनसाठी Disklrucache, नेटवर्क गुणवत्ता मूल्यांकनासाठी फेसबुक कनेक्शन क्लास, लॉगिनसाठी फेसबुक एसडीके आणि परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशनसाठी sql lite ॲसेट हेल्पर, यांचा समावेश असू शकतो परंतु त्या पुरतेच मर्यादित नसेल. हे एसडीके तुमची माहिती सामान्य विश्लेषणात्मक आणि इतर हेतूंसाठी वापरू शकतात.
- Josh तुमची माहिती मार्केट रिसर्चच्या उद्देशांसाठीदेखील वापरू शकते आणि तुमची माहिती तिच्या संलग्न व्यवसायांसोबत शेअर करू शकते ज्यांच्यावर तिचे नियंत्रण आहे (Josh इनोव्हेशनसह). Josh तुमची माहिती लक्ष्यित जाहिराती, लक्ष्यित कन्टेन्ट डिलिव्हरी आणि इतर व्यावसायिक हेतूंसाठीदेखील वापरू शकते, जर तुम्ही स्पष्टपणे अशा वापरांसाठीची निवड रद्द केली नसेल तर.
- प्लॅटफॉर्म आणि सेवा ॲक्सेस करताना/वापरताना, अभिप्राय देताना, टिप्पण्या करताना/सबमिट करताना, इनपुट प्रदान करताना आणि/किंवा प्लॅटफॉर्मवर वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि सेवांवर संवाद साधताना आणि सेवांच्या संबंधात तुम्ही सबमिट करता अशी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखता येण्याजोगी तुमची माहिती आणि/किंवा इतर माहिती Josh लक्ष्यित कन्टेन्ट, जाहिराती आणि सेवा प्रदान करण्यासाठी आणि इतर व्यावसायिक आणि/किंवा बिगर-व्यावसायिक हेतूंसाठी वापरू शकते.
4. तुमची सोशल मीडिया खाती Josh शी जोडणे
- आमच्या सेवा तुम्हाला तुमच्या सूचनेनुसार, तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब खाते(ती) तुमच्या Josh खात्याशी लिंक करण्याची परवानगी देतात. यामुळे वापरकर्ते तुम्हाला Josh द्वारे इतर प्लॅटफॉर्म्सवर अधिक सहजपणे शोधू शकतात आणि त्यांना तुमच्या सोशल मीडिया खात्या(त्यां)वर पुनर्निर्देशित करू शकतात.
- आम्ही फक्त मर्यादित माहिती प्राप्त करतो आणि संग्रहित करतो जी इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबने हस्तांतरित करण्याची परवानगी दिली आहे (उदाहरणार्थ तुमचे नाव, युजरनेम किंवा चॅनेलचे नाव आणि सार्वजनिक प्रोफाइल) आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा अशा प्लॅटफॉर्मवरील तुमचे खाते तुमच्या Josh खात्याशी कनेक्ट करता तेव्हा तुम्ही सहमती दिलेली असते. ही माहिती केवळ आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमची लिंक केलेली सार्वजनिक प्रोफाइल प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने संग्रहित केली जाते आणि कोणत्याही तृतीय-पक्ष ॲप्स, वेबसाइट्स किंवा इतर सेवांसह शेअर केली जात नाही.
- तुम्हाला यापुढे तुमचे इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब खाते तुमच्या Josh खात्याशी लिंक करायचे नसल्यास, कृपया तुमच्या प्रोफाइल पृष्ठावरील इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब आयकॉनवर टॅप करा आणि Josh ॲपच्या ॲक्सेस परवानग्या काढून टाकण्यासाठी सूचनांचे पालन करा.
5. Josh वापरकर्ता माहितीचे संरक्षण कसे करते
तुमची माहिती सुरक्षितपणे आणि या धोरणानुसार हाताळली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही पावले उचलतो. आम्ही या धोरणांसाठी कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व स्वीकारत नाही. इंटरनेट हे 100% सुरक्षित नाही. तुमचा आमच्या वेबसाइट्स, ॲप्स किंवा सेवांचा वापर संपूर्णपणे सुरक्षित असेल असे आश्वासन आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आमच्या सेवांना तुमची माहिती प्रसारित करता. आम्ही तुम्हाला इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगण्यास प्रोत्साहित करतो. आम्ही वैयक्तिक माहिती जोपर्यंत या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेल्या पद्धतींसाठी आवश्यक किंवा सुसंगत आहे तोपर्यंत ठेवतो, उदाहरणार्थ, कायदेशीर अनुपालन, विवाद निराकरण, करार अंमलबजावणी, बॅकअप, संग्रहण आणि इतर अंतर्गत ऑपरेशन्सच्या उद्देशांसाठी. यामध्ये तुम्ही किंवा इतरांनी आम्हाला प्रदान केलेला डेटा आणि तुमच्या आमच्या सेवांच्या वापरातून निर्माण झालेला डेटा समाविष्ट आहे. कायद्यानुसार अन्यथा आवश्यक असलेली माहितीदेखील आम्ही ठेवतो.
- वरील उद्देशासाठी, Josh तुमची वैयक्तिक माहिती, यूजरनेम, पासवर्ड आणि ॲपवर स्टोअर केलेला डेटा यांचे अनधिकृत ॲक्सेस, बदल, प्रकटीकरण किंवा नष्ट करण्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य डेटा संकलन, स्टोरेज, नियंत्रण आणि प्रक्रिया पद्धती आणि सुरक्षा उपायांचा अवलंब करते. विशेषतः, पासवर्ड संरक्षण यासारख्या सुरक्षा उपायांचा अवलंब करून आणि नियमित कालांतराने सुरक्षेच्या भेद्यतेचे निरीक्षण करून आणि डेटाचे उल्लंघन आणि हानी टाळण्यासाठी उपायात्मक पावले उचलून Josh तुमच्या वैयक्तिक माहितीची काळजी घेते.
- प्लॅटफॉर्म/सेवा आणि वापरकर्ते यांच्यातील वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण Josh द्वारे एसएसएल (सिक्युअर सॉकेट लेयर) सुरक्षित कम्युनिकेशन चॅनेल वापरून संरक्षित केली जाते. मात्र, अनधिकृत प्रवेश किंवा वापर, हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अयशस्वी होणे आणि वापरकर्त्याच्या माहितीच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करू शकणार्या इतर घटकांद्वारे मिळवलेल्या कोणत्याही माहितीच्या सुरक्षिततेची हमी Josh देऊ शकत नाही. वापरकर्त्याने त्याच्या/तिच्या डिव्हाइसवर ॲक्सेस मर्यादित करून त्याच्या/तिच्या खात्यावर आणि वैयक्तिक माहितीमध्ये अनधिकृत ॲक्सेस प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे.[एसएस2]
6. वापरकर्त्याच्या माहितीवर नियंत्रण
वापराच्या अटींनुसार, तुमच्या वैयक्तिक माहितीवर तुमचे नियंत्रण असावे अशी आमची इच्छा आहे:
a. ॲक्सेस, सुधारणा आणि पोर्टेबिलिटी. तुम्ही थेट आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमची खाते माहिती ॲक्सेस आणि संपादित करू शकता. तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे आम्ही तुम्हाला तुमची ओळख सत्यापित करण्यास सांगू. आम्ही अनेक कारणांसाठी तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करण्याची तुमची विनंती नाकारू शकतो, उदाहरणार्थ, अशी विनंती इतर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करत असल्यास किंवा ती बेकायदेशीर असल्यास.
b. परवानग्या रद्द करणे. बर्याच प्रकरणांमध्ये, जर तुम्ही आम्हाला तुमची माहिती वापरू दिली, तर तुम्ही आमच्याद्वारे निर्धारित केलेल्या रद्द करण्याच्या रीतसर प्रक्रियेनुसार आम्हाला सूचित करून तुमची परवानगी रद्द करू शकता.
c. हटवणे. तुम्ही आजीवन Josh वापरकर्ता राहाल अशी आम्हाला आशा असली तरीही काही कारणास्तव तुम्हाला तुमचे खाते हटवायचे असल्यास, तुमच्या सोशल लॉगिनवर आधारित, हे कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी येथे दिलेल्या पायर्यांचे पालन करा. यामध्ये तुम्ही किंवा इतरांनी आम्हाला प्रदान केलेला डेटा आणि आमच्या सेवांच्या तुमच्या वापरातून निर्माण झालेला डेटा समाविष्ट आहे. कायद्यानुसार अन्यथा आवश्यक असलेली माहितीदेखील आम्ही ठेवतो. आम्ही काही माहिती मर्यादित कालावधीसाठी किंवा कायद्यानुसार असल्यानुसार बॅकअपमध्ये ठेवू शकतो.
● एफबी कनेक्टसाठी, वापरकर्त्याने आमच्याकडील तुमची एफबी कनेक्ट क्रेडेन्शियल्स अक्षम किंवा त्यामधून लॉग आउट केल्यावर, तुमचा सर्व प्रोफाइल कन्टेन्ट आणि इतर माहिती हटवली जाऊ शकते. हटवण्याची विनंती केल्यावर, Josh वापरकर्त्याला त्याच्या Josh वरील सर्व वापरकर्ता खात्यांमधून लॉग आउट करेल आणि सर्व वापरकर्ता डेटा रीसेट करेल. आम्ही तुमचे युजरनेम, तुमचा पासवर्ड आणि तुमच्या वापरकर्ता कन्टेन्टसह तुमच्या खात्याशी (किंवा त्याच्या कोणत्याही भागाशी) संबंधित सर्व संबंधित माहिती, फाइल्स आणि वापरकर्ता कन्टेन्टदेखील वेगळे करू. मात्र, काही तपशील आमच्याकडे संग्रहण आणि कायदेशीर हेतूंसाठी राखून ठेवले जातात. तुमचा वापरकर्ता कन्टेन्ट हटवण्यासह, कोणत्याही निलंबन किंवा बंद केले जाण्यासाठी Josh चे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दायित्व असणार नाही. Josh आवश्यक असेल आणि/किंवा स्थानिक कायद्यांनुसार परवानगी असेल तोपर्यंत कन्टेन्ट/डेटा ठेवेल आणि वापरेल. कराराच्या अशा सर्व तरतुदी ज्या त्यांच्या स्वरूपानुसार टिकल्या पाहिजेत त्या या कराराच्या समाप्तीपर्यंत टिकून राहतील, ज्यामध्ये हमी अस्वीकरण, नियामक कायदा आणि उत्तरदायित्वाच्या मर्यादांचा समावेश असून त्यापुरतेच मर्यादित नाही.
7. वापरकर्ता माहिती शेअर करणे
आम्ही आमचे कॉर्पोरेट ग्रुप आणि निवडक तृतीय-पक्ष भागीदार किंवा व्यावसायिक सहयोगी यांच्या सहकार्याने काम करतो जे आम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यात, ऑपरेट करण्यात आणि सुधारण्यात मदत करतात. आम्ही तुमची माहिती क्लाउड सेवा प्रदाते, सीडीएन, आयएसपी, तंत्रज्ञान भागीदार, कन्टेन्ट मॉडरेशन सेवा, मापन प्रदाते, जाहिरातदार आणि अनॅलेटीक्स (विश्लेषण) प्रदाते यांच्याशी देखील शेअर करतो. तसेच, कायद्याने जेव्हा आणि जिथे आवश्यक असेल, आम्ही तुमची माहिती कायदा अंमलबजावणी संस्था किंवा नियामकांसह आणि कायद्याने बंधनकारक अशा न्यायालयीन आदेशानुसार तृतीय पक्षांसह शेअर करू. व्यावसायिक भागीदारी, करारबद्ध प्रतिबद्धता, विलीनीकरण, संपादन किंवा Josh च्या मालमत्तेचा सर्व किंवा काही भाग दुसर्या पक्षाला विकल्याचा परिणाम म्हणून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती दुसर्या पक्षाकडे हस्तांतरित करण्याचा Josh ने अधिकार राखून ठेवला आहे आणि अशा परिस्थितीत, तुम्हाला अन्यथा सूचित केले जात नाही तोपर्यंत या गोपनीयता धोरणाच्या तरतुदी लागू राहतील.
- या धोरणात प्रदान केल्यानुसार वगळता Josh ने संकलित केलेली तुमची वैयक्तिक माहिती Josh तृतीय पक्षांना विकत नाही, तिचा व्यापार करत नाही किंवा भाड्याने देत नाही. Josh व्हिजिटर्सच्या आणि वापरकर्त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीशी लिंक नसलेली सामान्य एकत्रित केलेली लोकसंख्याविषयक माहिती Josh चे व्यावसायिक भागीदार, कंत्राटदार, सहयोगी (Josh इनोव्हेशनसह) आणि जाहिरातदारांसोबत शेअर करू शकते.
- वापरकर्त्यांबद्दल वैयक्तिक माहिती उघड करणे Josh ला कायद्याने किंवा एखाद्या खटल्यामुळे आवश्यक असू शकते. राष्ट्रीय सुरक्षा, कायदा अंमलबजावणी किंवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या इतर समस्यांसाठी माहिती उघड करणे आवश्यक आहे, असे Josh ने निर्धारित केल्यास, Josh वापरकर्त्यांबद्दल माहिती उघड करू शकते.
- प्लॅटफॉर्मच्या वापराच्या लागू असलेल्या अटींची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्यास आणि/किंवा आमचे अधिकार आणि मालमत्ता किंवा आमचे अधिकारी, संचालक, भागधारक, कर्मचारी किंवा एजंट्स यांचे संरक्षण करण्यासाठी वाजवीपणे आवश्यक असल्यास Josh माहिती उघड करू शकते.
- व्यावसायिक भागीदारी, करारबद्ध प्रतिबद्धता, विलीनीकरण, संपादन किंवा Josh च्या मालमत्तेचा सर्व किंवा काही भाग दुसर्या पक्षाला विकल्याचा परिणाम म्हणून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती दुसर्या पक्षाकडे हस्तांतरित करण्याचा Josh ने अधिकार राखून ठेवला आहे आणि अशा परिस्थितीत, तुम्हाला अन्यथा सूचित केले जात नाही तोपर्यंत या गोपनीयता धोरणाच्या तरतुदी लागू राहतील.
7. कुकीज
आम्ही कुकीज वापरू शकतो, उदाहरणार्थ, तुमची प्राधान्ये आणि खाते प्रोफाइल माहितीचा ट्रॅक ठेवण्यासाठी किंवा काही रि-टार्गेट करण्याची कार्ये करण्यासाठी, ज्यामुळे आमच्या मते तुमचा वापरकर्ता अनुभव आणि प्लॅटफॉर्मची आणि त्यावर ऑफर केलेल्या काही सेवा आणि कार्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता अधिक चांगल्या प्रकारे सुधारेल. कुकीजचा वापर सामान्य वापराची आणि व्हॉल्युमची सांख्यिकीय माहिती गोळा करण्यासाठीदेखील केला जातो, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती समाविष्ट नसते. प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांबद्दल आमच्यासाठी एकत्रित आकडेवारी गोळा करण्यासाठी वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली माहिती संकलित करण्यासाठी आम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर कुकीज ठेवण्यासाठी दुसऱ्या कंपनीची किंवा तृतीय पक्षाची सेवादेखील वापरू शकतो.
कुकीज हे माहितीचे छोटे तुकडे असतात जे तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हवर तुमच्या इंटरनेट ब्राउझरद्वारे टेक्स्ट फाइल्सच्या स्वरूपात साठवले जातात. बहुतेक इंटरनेट ब्राउझर सुरुवातीला कुकीज स्वीकारण्यासाठी सेट केलेले असतात. वेबसाइटवरील कुकीज नाकारण्यासाठी तुम्ही तुमचा ब्राउझर सेट करू शकता किंवा तुमच्या हार्ड ड्राइव्हवरून कुकीज काढून टाकू शकता, परंतु तुम्ही असे केल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्मचे काही भाग ॲक्सेस करू किंवा वापरू शकणार नाही, किंवा प्लॅटफॉर्मवरील काही ऑफर अपेक्षित किंवा योग्य कार्य करू शकणार नाहीत. तसेच, काही ब्राउझरमध्ये "ट्रॅक करू नका" वैशिष्ट्ये असतात ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वेबसाइटला तुम्हाला ट्रॅक करू नका असे सांगू शकता. ही सर्व वैशिष्ट्ये एकसमान नसतात. तुम्ही कुकीज ब्लॉक केल्यास, प्लॅटफॉर्मवरील काही वैशिष्ट्ये कार्य करणार नाहीत. तुम्ही कुकीज ब्लॉक केल्यास किंवा नाकारल्यास, येथे वर्णन केलेले सर्व ट्रॅकिंग थांबणार नाही. कृपया लक्षात घ्या की तुम्ही निवडलेले काही पर्याय ब्राउझर-विशिष्ट आणि डिव्हाइस-विशिष्ट आहेत.
- जेव्हाही तुम्ही प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवा ॲक्सेस करता तेव्हा तुमचा अनुभव वाढवण्यासाठी किंवा काहीवेळा तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी रेकॉर्ड-कीपिंगच्या उद्देशाने Josh तुमच्या हार्ड ड्राइव्हवर कुकीज ठेवू शकते. कुकीज या लहान टेक्स्ट फाइल्स असतात, ज्या तुम्ही भेट देत असलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हवर ठेवल्या जातात. कुकीज Josh ला तुमच्या कार्यांशी संबंधित माहिती ओळखण्यात आणि प्लॅटफॉर्मवरील तुमची प्राधान्ये आणि इतिहासाशी संबंधित माहिती राखून ठेवण्यास मदत करतात.
- तुम्ही अशा जाहिरातींची निवड रद्द करत नाही तोपर्यंत Josh आणि/किंवा त्याचे सेवा प्रदाते तुमच्याशी आणि तुमच्या आवडींशी अधिक संबंधित असलेल्या जाहिराती वितरीत करण्यासाठी जाहिरात कुकीज वापरू शकतात.
- वेब ब्राउझरवरील कुकी वैशिष्ट्य बंद करून तुम्ही कुकीज बंद करणे निवडू शकता. मात्र, हे वैशिष्ट्य बंद केल्याने, प्लॅटफॉर्मचे काही भाग कदाचित योग्यरित्या कार्य करू शकणार नाहीत. हे तुम्हाला प्लॅटफॉर्म आणि सेवांचा पूर्ण लाभ घेण्यापासून रोखू शकते.
8. माहिती एकत्र करणे
ऑफर, जाहिराती आणि तुमच्या आवडी, स्वारस्ये आणि/किंवा प्राधान्यांशी सर्वाधिक निगडीत असलेली माहिती प्रदान करण्यासाठी Josh तुमची वैयक्तिक माहिती आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म व सेवांवरील इतर माहिती एकत्र करू शकते. कन्टेन्ट, जाहिराती, प्रमोशन्स आणि ऑफर्स प्रदान करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म आणि सेवांवर वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी, प्लॅटफॉर्मवर आणि सेवांच्या संदर्भात तुम्ही Josh ला शेअर केलेल्या माहितीला Josh ज्या तृतीय पक्षांना तुम्ही आमच्यासोबत माहिती शेअर करण्याची परवानगी दिली आहे त्यांना तुम्ही प्रदान केलेल्या माहितीसह देखील एकत्र करू शकते. Josh तुमची माहिती अशा तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकते ज्यांच्याकडे तुमची माहिती आहे आणि ज्यांना माहिती एकत्र करण्याची परवानगी आहे.
9. Josh तुमचा डेटा किती काळ ठेवते
Josh तुम्हाला सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या कालावधीसाठी वैयक्तिक माहिती राखून ठेवेल. तुम्हाला सेवा प्रदान करण्यासाठी आम्हाला तुमच्या माहितीची आवश्यकता नसल्यास, आम्ही ती फक्त तेवढ्याच कालावधीसाठी ठेवू जोपर्यंत असा डेटा ठेवण्याचा आमचा कायदेशीर व्यावसायिक उद्देश आहे. कधीकधी, जिथे आम्हाला कायद्याने बंधनकारक आहे किंवा जिथे आस्थापनासाठी आवश्यक आहे, अशी कृती किंवा कायद्याने परवानगी आहे, तिथे आम्ही हा डेटा अधिक काळ ठेवण्याची शक्यता असते.
माहिती राखून ठेवण्याचे आमचे कालावधी निर्धारित करण्यासाठी वापरल्या जाणार्या निकषांमध्ये हे समाविष्ट आहे:
- आमचा तुमच्याशी संबंध चालू असलेला आणि आम्ही तुम्हाला सेवा प्रदान करत असलेला कालावधी (उदाहरणार्थ, जोपर्यंत तुम्ही सेवा वापरत आहात तोपर्यंत)
- आमच्यावर असे कायदेशीर बंधन असल्यास ज्याच्या आम्ही अधीन आहोत (उदाहरणार्थ, विशिष्ट कायद्यांनुसार रेकॉर्ड्स हटवण्यापूर्वी आम्ही ते विशिष्ट कालावधीसाठी ठेवणे आवश्यक आहे)
- आमच्या कायदेशीर स्थितीचा माहिती ठेवण्याचा सल्ला दिला असल्यास (उदाहरणार्थ मर्यादा, खटला किंवा नियामक तपासणीच्या कायद्यांसाठी)
Josh वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती ज्या उद्देशासाठी आणि कायद्यानुसार आवश्यक आहे त्या उद्देशासाठी आवश्यक असेल तोपर्यंतच ती ठेवेल. हा धारणा कालावधी संपल्यावर, Josh एकतर माहिती हटवू शकते किंवा तिचे निनावीकरण करू शकते किंवा टोपणनाव देऊ शकते.
10. तुम्ही Josh ला तुमचा डेटा वापरण्यापासून कसे थांबवू शकता
- Josh तुमच्या प्राधान्यांना महत्त्व देते आणि आमच्याकडून थेट मार्केटिंग संवाद थांबवण्यासाठी तुम्हाला पर्याय देते. तुम्ही खालीलपैकी कोणतीही गोष्ट करून थेट मार्केटिंग संवाद थांबवू शकता:
i. 'अनसबस्क्राईब' वर क्लिक करा किंवा 'विशिष्ट विभाग, सेवा किंवा टीमकडून येणाऱ्या ईमेल संवादांची निवड रद्द करा;
ii. तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि तुमची गोपनीयता प्राधान्ये बदला.
B. तुम्ही मार्केटिंग संवादांची निवड रद्द केल्यास, तुम्हाला तरीही Josh कडून प्रमोशनल नसलेले ईमेल/सूचना प्राप्त होऊ शकतात, उदाहरणार्थ तुमच्या खात्याबद्दलचे ईमेल, प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवांशी संबंधित अपडेट्स आणि/किंवा इतर कोणतेही व्यावसायिक संवाद.
c. तुम्ही गोपनीयता धोरणाशी असहमत असल्यास, किंवा या धोरणामध्ये प्रदान केलेल्या वापरांसाठी तुमची माहिती शेअर करू इच्छित नसल्यास, तुम्ही अनइंस्टॉल करू शकता आणि/किंवा तुमच्या डिव्हाइसवरून प्लॅटफॉर्म हटवून प्लॅटफॉर्म आणि सेवा वापरणे बंद करू शकता.
11. या गोपनीयता धोरणातील बदल आणि अपडेट्स
आम्ही हे गोपनीयता धोरण वेळोवेळी अपडेट करू शकतो. जेव्हा आम्ही गोपनीयता धोरण अपडेट करतो, तेव्हा आम्ही तुम्हाला या धोरणाच्या सर्वात वर "शेवटचे अपडेट" केल्याची तारीख अपडेट करून आणि नवीन गोपनीयता धोरण पोस्ट करून आणि लागू कायद्यानुसार आवश्यक असलेली कोणतीही सूचना प्रदान करून सूचित करू. धोरण अपडेट केल्याच्या तारखेनंतर तुम्ही प्लॅटफॉर्म ॲक्सेस करणे किंवा वापरणे चालू ठेवणे म्हणजे तुम्ही अपडेट केलेले धोरण स्वीकारल्याचे मानले जाईल. तुम्ही अपडेट केलेल्या धोरणाशी सहमत नसल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्म ॲक्सेस करणे किंवा वापरणे थांबवणे आवश्यक आहे.
Josh हे गोपनीयता धोरण वेळोवेळी अपडेट आणि सुधारित करू शकते. सुधारित गोपनीयता धोरण येथे पोस्ट केले जाईल. या गोपनीयता धोरणातील बदलांबद्दल माहिती ठेवण्यासाठी तुम्हाला हे पृष्ठ वेळोवेळी तपासण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तुम्ही याद्वारे कबूल करता आणि सहमत आहात की हे गोपनीयता धोरण वेळोवेळी वाचणे आणि सुधारणांबद्दल माहिती करून घेणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही गोपनीयता धोरणातील कोणत्याही बदलांशी सहमत नसल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्म आणि सेवा वापरणे किंवा त्या ॲक्सेस करणे टाळावे. सुधारित धोरण पोस्ट केल्यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवांचा सतत वापर करणे हे तुम्ही बदल स्वीकारल्याचे आणि कबूल असल्याचे दर्शवेल आणि तुम्ही बदललेल्या धोरणास बांधील असाल.
12. नोटीस आणि तक्रार निवारण यंत्रणा
ॲपद्वारे ॲक्सेस करता येण्याजोग्या कन्टेन्ट किंवा जाहिरातींसाठी Josh जबाबदार नाही याची विशेष नोटीस देण्यात येत आहे. Josh तिच्या विवेकबुद्धीनुसार तृतीय-पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा दावा केलेला कन्टेन्ट काढून टाकण्याचा आणि/किंवा त्याचा ॲक्सेस बंद करण्याचा आणि/किंवा Josh च्या आणि/किंवा इतर तृतीय पक्षांच्या बौद्धिक संपदेचे किंवा इतर अधिकारांचे उल्लंघन करू शकतील अशा प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची खाती संपुष्टात आणण्याचा अधिकार राखून ठेवते.
तक्रार निवारण यंत्रणा
Josh ने तक्रारींचे निराकरण करण्यासाठी खालील यंत्रणा राबवली आहे:
सेवा अटी, करार, गोपनीयता धोरण आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाबाबत तक्रारी किंवा समस्या येथे नमूद केलेल्या पद्धतीने “निवासी तक्रार अधिकारी” यांना संबोधित केल्या पाहिजेत.
(a) ॲपवर स्वतः रिपोर्ट करा: कोणत्याही आक्षेपार्ह कन्टेन्टबाबत तुम्ही ॲपमधील ‘कन्टेन्ट रिपोर्ट करा’ हे वैशिष्ट्य वापरूनदेखील कन्टेन्ट रिपोर्ट करू शकता.
(b) ईमेल: माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, तक्रार अधिकाऱ्याचा संपर्क तपशील खाली प्रदान केला आहे:
श्री. नागराज
ईमेल: grievance.officer@myJosh.in
(c) किंवा आम्हाला या पत्त्यावर लिहून
प्रति,
श्री. नागराज
तक्रार अधिकारी
VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड
11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क,
आऊटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी,
बेंगळुरू- 560103, कर्नाटक, भारत
तक्रार किंवा आमच्या उत्पादनाच्या वापरकर्त्याला सामोरे जावी लागलेली इतर समस्या खालील पत्त्यावर ईमेलद्वारे सबमिट केली जाऊ शकते. तक्रारीमध्ये या गोष्टी प्रदान केल्या पाहिजेत: (i) संबंधित खातेधारकाचे युजरनेम (ii) चिंतेचा विषय असलेला विशिष्ट कन्टेन्ट/व्हिडिओ आणि (iii) काढून टाकण्याच्या अशा विनंतीची कारणे.
Josh ला तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक असेल अशी माहिती तक्रारीमध्ये असणे आवश्यक आहे. Josh ला यासंदर्भातील सर्व नोटिसा लिखित स्वरुपात असतील आणि त्या वैयक्तिकरित्या असल्यास किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवल्या असल्यास रीतसर दिल्या जाव्यात, रिटर्न पावतीची विनंती करावी किंवा वरील पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे पाठवल्या जाव्यात.
हा दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 च्या तरतुदींनुसार प्रकाशित केला असून त्यानुसार नियम आणि कायदे, गोपनीयता धोरण, ॲप ॲक्सेस करण्यासाठीच्या किंवा वापरासाठीच्या अटी ह्या बाबी प्रकाशित करणे आवश्यक आहे.
मी या वापरकर्ता कराराच्या अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि मी याद्वारे, माझ्या स्वेच्छेने आणि बिनशर्तपणे त्यास बांधील राहण्याचे स्वीकारतो.
या गोपनीयता धोरणाबाबत तुमच्या काही तक्रारी किंवा समस्या असल्यास, तुम्ही Josh च्या तक्रार अधिकाऱ्याशी ईमेल किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधू शकता. तुम्ही तुमच्या तक्रारी (ईमेल पत्ता लिहा) या ईमेल पत्त्यावर “गोपनीयता तक्रार” या विषयासह पाठवू शकता. तुम्ही वर नमूद केलेल्या पद्धतींवरील तक्रार अधिकाऱ्याशी ईमेल किंवा पत्राद्वारेदेखील संपर्क साधू शकता: