जानेवारी २०२३

समुदाय मार्गदर्शक तत्त्वे

प्रस्तावना

ही समुदाय मार्गदर्शक तत्त्वे ("मार्गदर्शक तत्त्वे") VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड (“VerSe” किंवा "आमचे" किंवा "आपले" किंवा "Josh") द्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या आमच्या 'JOSH' वेबसाइट/मोबाइल प्लिकेशनचा (“प्लॅटफॉर्म”) “तुमचा” वापर नियंत्रित करतात. VerSe ही भारताच्या कायद्यांतर्गत स्थापन केलेली एक खाजगी कंपनी असून तिचे नोंदणीकृत कार्यालय हेलिओस बिझनेस पार्क, 11 वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क, आउटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी, बेंगळुरू-560103, कर्नाटक, भारत येथे आहे. "तुम्ही", "तुमचे", "वापरकर्ता" आणि "वापरकर्ते" या संज्ञा संदर्भानुसार वाचल्या जातील आणि त्यांचा अर्थ तुम्ही असा असेल.

हा दस्तऐवज 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार प्रकाशित केला असून या तरतुदी माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती आणि प्रक्रिया आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती) नियम, 2011 आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 यांच्यासह त्याच्या संबंधित नियमांसह वाचल्या आहेत.

A. तुमची स्वीकृती

या प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट पाहण्यापूर्वी किंवा पोस्ट करण्यापूर्वी कृपया ही मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा. या प्लॅटफॉर्मवर कोणताही कन्टेन्ट पाहून किंवा पोस्ट करून, तुम्ही या मार्गदर्शक तत्त्वांच्या अटी व शर्तींना बांधील राहण्यास सहमती देता.

ही मार्गदर्शक तत्त्वे सेवा अटींचा अविभाज्य भाग असतील. तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करता तेव्हा तुम्ही वापराच्या अटी, गोपनीयता धोरण आणि या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांशी बांधील आहात.

हा प्लॅटफॉर्म विविध स्रोतांकडून कन्टेन्टचे एकत्रीकरण करणे सुलभ करतो. VerSe केवळ मध्यस्थ म्हणून विविध प्रकारच्या कन्टेन्टचा क्सेस प्रदान करते. या धोरणाच्या उद्देशाने, VerSe च्या कोणत्याही संदर्भामध्ये तिच्या संलग्न कंपन्या, व्यावसायिक भागीदार, मूळ कंपनी, सहाय्यक कंपन्या आणि त्याच्याशी संबंधित इतर कंपन्यांचा समावेश असेल.

लोकांना शेअर करण्याचा अधिकार देणे आणि जगाला अधिक क्सेसिबल आणि कनेक्टेड बनवणे हे आमचे ध्येय आहे. दररोज, लोक त्यांच्या स्टोरीज शेअर करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर येतात, इतरांच्या नजरेतून जगाकडे पाहतात आणि मित्रांशी आणि कारणांशी जोडले जातात. प्लॅटफॉर्मवर होणारी संभाषणे एक अब्जाहून अधिक लोकांच्या समुदायाची विविधता प्रतिबिंबित करतात.

आमचा प्लॅटफॉर्म वापरताना लोकांना सुरक्षित वाटावे अशी आमची इच्छा आहे. त्या कारणास्तव, आम्ही काही समुदाय मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत, जी खाली नमूद केली आहेत. ही धोरणे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर कोणत्या प्रकारच्या कन्टेन्टला परवानगी आहे आणि कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट आमच्याकडे रिपोर्ट केला जाऊ शकतो आणि काढून टाकला जाऊ शकतो, हे समजून घेण्यात मदत करतील. आमच्या जागतिक समुदायाच्या विविधतेमुळे, कृपया लक्षात ठेवा की तुम्हाला असहमत असलेली किंवा तुम्हाला त्रासदायक वाटणारी एखादी गोष्ट कदाचित आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी असणार नाही.

हा प्लॅटफॉर्म VerSe आयटी कायद्यानुसार मध्यस्थ म्हणून ऑपरेट करते.

या धोरणाच्या/कराराच्या (“धोरण”) उद्देशाने, कन्टेन्टचा अर्थ या प्लॅटफॉर्मवर लोकांना प्रदर्शित, प्रसारित, प्रकाशित, होस्ट, संप्रेषित केलेला मजकूर, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ यांसह परंतु यापुरतेच मर्यादित नसलेले कोणतेही साहित्य (मटेरियल) असा असेल. कन्टेन्टमध्ये टिप्पण्या आणि हायपरलिंक्सदेखील समाविष्ट असतील, हे स्पष्ट करत आहोत.

जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म वापरता, तेव्हा तुम्ही हे धोरण, सेवेच्या अटी आणि गोपनीयता धोरण यांच्या सर्व अटींशी सहमत असता. तुम्ही यापैकी कोणत्याही अटींशी असहमत असल्यास, कृपया प्लॅटफॉर्म वापरणे थांबवा.

B. या प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट

VerSe ही केवळ एक मध्यस्थ आणि तंत्रज्ञान प्रदाता आहे जी 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या नियमांसह वाचलेल्या त्याच्या तरतुदींनुसार मान्यताप्राप्त आहे. प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला कन्टेन्ट हा कन्टेन्ट प्रदात्यांकडून घेतलेला असू शकतो किंवा वापरकर्त्यांद्वारे पोस्ट केला जाऊ शकतो. कन्टेन्टच्या संदर्भात VerSe चे कोणतेही नियंत्रण नाही आणि ती कन्टेन्टची अचूकता, वैधता किंवा कायदेशीरपणाची हमी देत नाही. VerSe स्पष्टपणे सर्व हमी नाकारते आणि नागरी किंवा फौजदारी कायद्यांतर्गत कोणत्याही उल्लंघनासाठी जबाबदार राहणार नाही.

प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट VerSe च्या मालकीचा नसल्यामुळे, प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही कन्टेन्टसाठी ती जबाबदार नाही.

तुम्ही केवळ कायदेशीर आणि बिगर-व्यावसायिक हेतूंसाठी सद्भावनेने कन्टेन्ट पोस्ट करण्यास सहमत आहात ज्यामध्ये शिक्षण, करमणूक, समीक्षा किंवा माहितीचा प्रसार करणे समाविष्ट आहे.

तुम्ही कोणत्याही अनधिकृत माध्यमांद्वारे कन्टेन्ट क्सेस करू नये किंवा पोस्ट करू नये, ज्यामध्ये स्वयंचलित डिव्हाईस, स्क्रिप्ट, बॉट, स्पायडर, क्रॉलर किंवा स्क्रॅपर यांचा समावेश आहे परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही.

वाईट हेतूने कोणताही कन्टेन्ट पोस्ट करू नका किंवा प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट पोस्ट करण्यासाठी अनधिकृत माध्यमांचा वापर करू नका.

तुम्ही याच्याशी सहमत आहात की तुमच्याद्वारे पोस्ट केलेला कन्टेन्ट कायदेशीर आहे आणि तो ज्या देशांमध्ये कन्टेन्ट प्रकाशित केला गेला आहे, लोकांपर्यंत पोहोचवला गेला आहे किंवा VerSe द्वारे वितरित केला गेला आहे अशा देशांमध्ये कन्टेन्टसाठी लागू असलेल्या कोणत्याही लागू कायद्यांचे, नियमांचे, नियमनांचे, धोरणांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे आणि/किंवा मानदंडांचे उल्लंघन करत नाही. तुम्ही पुष्टी करता की तुम्ही प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट पोस्ट करण्यासाठी अधिकृत आहात. VerSe प्लॅटफॉर्मवर कोणतीही माहिती किंवा कन्टेन्ट प्रकाशित करण्यास बांधील नाही आणि ती वापरकर्त्यांना सूचना देऊन किंवा त्याशिवाय कोणताही कन्टेन्ट तिच्या विवेकबुद्धीने काढून टाकू शकते.

कन्टेन्ट आणि वर्तन धोरणे आमच्या वापरकर्त्यांसाठी सकारात्मक अनुभव सुनिश्चित करण्यात मदत करतात. कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवर दिसण्यासाठी आणि राहण्यासाठी पात्र होण्यासाठी तुमच्या कन्टेन्टने आमच्या धोरणांनुसार सर्वोत्तम पद्धतींचे पालन केले पाहिजे आणि कन्टेन्ट या प्रकारचा असू नये:

1.  द्वेषपूर्ण वक्तव्य आणि भेदभाव

प्लॅटफॉर्मवरील इतरांशी सन्मानाने, आदराने आणि सहानुभूतीच्या भावनेने वागा. आम्‍ही प्‍लॅटफॉर्मवर वैधपणे आणि चांगल्या हेतूने निरोगी मतभेद व्यक्त करण्यास प्रोत्‍साहन देतो. आम्ही दुसऱ्या वापरकर्त्यास हानी पोहोचवण्याच्या किंवा त्यांना मानसिक तणाव अथवा त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले कोणत्याही प्रकारचे द्वेषपूर्ण, वैयक्तिक हल्ले, पूर्वग्रहदूषित भाषण किंवा असभ्य मतभेद यांना अनुमती देत नाही. द्वेषपूर्ण किंवा भेदभावपूर्ण भाषणाच्या उदाहरणांमध्ये हिंसेला चिथावणी देणाऱ्या, वंशविषयक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह असलेल्या, एखाद्याचा त्याचे राष्ट्रीय मूळ, लिंग, लैंगिक ओळख, लैंगिक कल, धार्मिक सदस्यता/संबंध, अपंगत्व किंवा आजारांच्या आधारे तिरस्कार करणाऱ्या टिप्पण्यांचा समावेश होतो. इतर वापरकर्त्यांना असा कन्टेन्ट शेअर करण्यास प्रोत्साहित करणारा कन्टेन्टदेखील आम्ही प्रतिबंधित करतो. तुम्हाला तुमच्या प्रोफाइल इमेज किंवा प्रोफाईल हेडरमध्ये द्वेषपूर्ण इमेजेस किंवा चिन्हे वापरण्याची परवानगी नाही. तुम्ही तुमचे युजरनेम, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाईल बायोमध्ये अशा प्रकारे बदल करू शकत नाही की ज्यामुळे तुम्ही अपमानास्पद वर्तन करत आहात असे वाटेल किंवा इतर वापरकर्त्यांना त्रास देणे किंवा द्वेष व्यक्त करणे असा त्याचा तार्किकदृष्ट्या अर्थ लावला जाऊ शकेल.

काही विशिष्ट कन्टेन्ट पोस्ट, अपलोड, स्ट्रीम किंवा शेअर केला जाऊ शकत नाही:

 • द्वेष आणि भेदभावाशी संबंधित नावे, चिन्हे, लोगो, नकाशे, ध्वज, घोषणा किंवा इतर वस्तूंचा समावेश असलेला कन्टेन्ट.
 • धार्मिक प्रथांशी संबंधित सुधारणात्मक उपचारांना प्रोत्साहन देणारा, त्यांचे समर्थन किंवा जाहिरात करणारा कन्टेन्ट.
 • हिंसा, द्वेष, विभक्त करणे किंवा भेदभाव यांना प्रोत्साहन देणारा कन्टेन्ट.
 • धर्म, जात, स्त्रियांचा द्वेष, एलजीबीटीक्यू किंवा इतरांविरुद्ध द्वेषपूर्ण विचारसरणीचे समर्थन करणारा कन्टेन्ट.

2.   धार्मिकदृष्ट्या आक्षेपार्ह कन्टेन्ट

इतरांच्या धार्मिक श्रद्धेचा आणि समजुतींचा तुम्ही नेहमीच आदर केला पाहिजे, जरी त्यांचे विचार किंवा श्रद्धा तुमच्यासारखेच असले किंवा नसले तरीही. इतरांच्या भावना दुखावणारी किंवा त्यांच्या धर्माचा अथवा चालीरीतींचा अपमान करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही प्रकाशित करू नये.

3.   दहशतवाद आणि कट्टरवाद

तुम्ही या प्लॅटफॉर्मवर कोणालाही धमकी देऊ नये किंवा धोकादायक कृत्यांना प्रोत्साहन देऊ नये. विशेषतः तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवादाला, फुटीरतेला, व्यक्ती किंवा मालमत्तेविरुद्धच्या हिंसाचाराला उत्तेजन देण्यासाठी किंवा भारताची एकता, अखंडता, संरक्षण, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व, परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा दुसऱ्या देशाचा अपमान करण्यासाठी करू नये. वापरकर्त्यांना दहशतवादी किंवा देशविरोधी संघटनेच्या वतीने कृत्ये करण्यास समर्थन किंवा प्रोत्साहन देईल असा किंवा अशा संघटनांसाठी भरती, माहितीचा प्रसार किंवा त्यांच्या उद्देशांना मदत करणारा असा कोणताही कन्टेन्ट तुम्ही पोस्ट करू नये. तुम्ही कायदेशीर निषेध आंदोलनादरम्यान हिंसक कृत्ये घडवून आणण्यासाठी पाठिंबा किंवा मंजुरीदेखील मिळवू नये किंवा प्लॅटफॉर्मवर हिंसाचाराला प्रवृत्त करणारे दहशतवादाचे आणि कटाचे नेटवर्क तयार करू नये.

4.  हिंसक आणि ग्राफिक कन्टेन्ट

➢        मानवी

तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर दुसर्‍या व्यक्तीला कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शारीरिक इजा करण्याच्या धमक्या देण्यासाठी करू नये. यामध्ये चोरी, तोडफोड, चुकीच्या पद्धतीने कैद करणे, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक इजा यांच्याशी संबंधित कोणतीही धमकी समाविष्ट आहे. प्लॅटफॉर्म त्याच्या वापरकर्त्यांना सामूहिक हत्या, हिंसक घटना किंवा हिंसेच्या विशिष्ट साधनांचा संदर्भ असलेला कन्टेन्ट पोस्ट करण्याची परवानगी देत नाही, विशेषतः असा ज्यात असुरक्षित समुदाय किंवा गट प्राथमिक लक्ष्य किंवा बळी असतील किंवा अशा कोणत्याही कृतींचे वर्णन किंवा गौरव केले असेल. प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारे हिंसेचा गौरव करण्यास परवानगी देत नाही ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीची किंवा गटाची शारीरिक हानी झाल्याच्या किंवा भावना दुखावल्याच्या घटना साजरे करण्याचा समावेश आहे परंतु एवढेच मर्यादित नाही. तुम्ही छळ, दुखापत, मानसिक त्रास, मृत्यू, शारीरिक इजा, अपहरण, अपहरणाचे वर्णन करणारा कन्टेन्ट किंवा इतर प्रकारचा हिंसक कन्टेन्ट पोस्ट करणे टाळले पाहिजे. लोकांमध्ये समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्ही अशा कन्टेन्टला काही मर्यादांसह परवानगी देतो.

तुम्ही पुढील गोष्टी पोस्ट, शेअर, अपलोड किंवा स्ट्रीम करू नये:

 • वैद्यकीय पार्श्वभूमी वगळता मृत व्यक्ती किंवा मृतदेहांशी संबंधित व्हिडिओ.
 • आपापसातील हिंसाचार दर्शवणारे व्हिडिओ आणि फोटो.
 • एखाद्या व्यक्तीचा हिंसक मृत्यू दाखवणारा कन्टेन्ट.

  ➢ प्राणी

तुम्ही धक्कादायक, वेदनादायक (वेदनेतून आनंद लुटणारे) किंवा अत्याधिक ग्राफिक किंवा वास्तविक प्राण्यांची कत्तल, प्राण्यांचे छिन्नविछिन्न, विकृत, जळालेले अवशेष दर्शवणारा किंवा प्राण्यांबाबत क्रूरता असलेला कोणताही कन्टेन्ट पोस्ट करू नये.

तुम्ही पुढील गोष्टी पोस्ट, शेअर, अपलोड किंवा स्ट्रीम करू नये:

उत्पादन, अन्न सेवन किंवा अन्न तयार करणे स्पष्टपणे दर्शवले नसल्यास मानवांद्वारे प्राण्यांची हत्या दर्शवणारे व्हिडिओ.

 • प्राण्या-प्राण्यांमधील मारामारी दर्शवणाऱ्या अशा इमेजेस किंवा व्हिडिओ ज्यामध्ये पुनरुत्पादन न होणाऱ्या शरीराचे छिन्नविच्छिन्न होणे हिंस्र पद्धतीने दाखवले आहे.
 • माणसांद्वारे जिवंत प्राण्यांचा छळ किंवा क्रूरता दर्शवणारे व्हिडिओ किंवा फोटो.
 • छिन्नविच्छिन्न झालेले, जळालेले, विकृत किंवा भस्म झालेले प्राण्यांचे अवशेष.

5.  अल्पवयीनांची सुरक्षा

अल्पवयीन मुलांची सुरक्षा, ज्यामध्ये 18 वर्षांखालील सर्व व्यक्तींचा समावेश आहे, हा Josh मध्ये एक प्रमुख चिंतेचा मुद्दा आहे आणि प्लॅटफॉर्म त्यांच्या सुरक्षेसाठी गंभीरपणे वचनबद्ध आहे. म्हणून, Josh अल्पवयीन किंवा अल्पवयीन असल्याचे भासणाऱ्यांचा समावेश असलेल्या कोणत्याही लैंगिक किंवा सूचक कन्टेन्टवर बंदी घालते. यामध्ये बाल लैंगिक शोषणाची दृश्ये, बाल पोर्नोग्राफी आणि अशा इतर कोणत्याही कन्टेन्टचा समावेश असून त्यात फॅन्टसी कन्टेन्ट (उदा. कथा, “लोली”/निमे  कार्टून्स) समाविष्ट आहे, जो पेडोफिलिया, बाल लैंगिक शोषण दर्शवतो, प्रोत्साहित करतो किंवा त्याचा प्रचार करतो किंवा अन्यथाही अल्पवयीनांना किंवा अल्पवयीन भासणाऱ्यांना लैंगिक स्वरूपात दर्शवतो. संदर्भानुसार, यामधील काही प्रकरणांमध्ये पूर्णपणे कपडे घातलेल्या आणि उघडपणे लैंगिक कृत्ये करत नसलेल्या मुलांचे चित्रण समाविष्ट असू शकते. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर लैंगिकदृष्ट्या उघड आणि मनोरंजक कन्टेन्टला परवानगी देत नाही, ज्यामध्ये या स्वरूपाच्या निमेटेड कन्टेन्टचाही समावेश आहे. लैंगिक स्वरूपाच्या कन्टेन्टमध्ये अनेक धोके असतात, जसे की काही अधिकारक्षेत्रांमध्ये कायदेशीर दंड लागू होणे आणि संमती नसलेल्या इमेजरी (उदाहरणार्थ, अश्लील सूड / रिव्हेंज पॉर्न) शेअर करून आमच्या वापरकर्त्यांना हानी पोहोचवणे. तसेच, विशिष्ट संस्कृतींमध्ये उघडपणे लैंगिक कन्टेन्ट आक्षेपार्ह असू शकतो. आम्ही शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूंसाठी नग्नता आणि लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कन्टेन्टच्या संदर्भात अपवादांना अनुमती देतो. एखाद्या अल्पवयीन किंवा अल्पवयीन भासणार्‍या व्यक्तीचा समावेश असलेल्या कन्टेन्टबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, तो पोस्ट करू नका.

काही विशिष्ट कन्टेन्ट पोस्ट, शेअर, अपलोड किंवा स्ट्रीम करू नका:

 • अल्पवयीन मुलांचा लैंगिक स्वरूपात समावेश असलेला किंवा अन्यथाही अल्पवयीनांचे लैंगिकीकरण करणारा कन्टेन्ट.
 • नग्नता किंवा अल्पवयीन मुलांसह लैंगिक कृत्यांसह बाल शोषणाच्या दृश्यांना प्रोत्साहन देणारा कन्टेन्ट.
 • अल्पवयीनांना कपडे काढताना दाखवणारा कन्टेन्ट.

6.  प्रौढ नग्नता आणि लैंगिक कन्टेन्ट

या प्लॅटफॉर्मवर नग्नता, पोर्नोग्राफीशी संबंधित कन्टेन्टला किंवा इतर कोणत्याही लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कन्टेन्टला Josh परवानगी देत नाही. प्लॅटफॉर्म अशा कन्टेन्टलादेखील परवानगी देत नाही जो एकतर कोणत्याही प्रकारच्या संमती नसलेल्या लैंगिक कृत्याचे समर्थन करतो किंवा कोणतेही सहमत नसलेले लैंगिक कृत्य, खाजगी लैंगिक दृश्ये किंवा प्रौढ लैंगिक सुखाची मागणी शेअर करतो. नग्नता आणि लैंगिक कन्टेन्टमध्ये स्तन, गुप्तांग, गुदद्वार किंवा नितंब उघडपणे दाखवणारा कोणताही कन्टेन्ट किंवा लैंगिक कृतीची नक्कल, प्रदर्शन किंवा सूचित करणारे कोणतेही वर्तन समाविष्ट आहे. शैक्षणिक, माहितीपट, जनजागृती किंवा कलात्मक हेतूंसाठी पोस्ट केलेल्या कन्टेन्टला आम्ही परवानगी देतो.

7.  सायबर बुलिंग आणि छळ

वापरकर्त्यांना लाज, अपमान, धमकी किंवा छळ होण्याची भीती न बाळगता स्वतःला व्यक्त करायला सुरक्षित वाटले पाहिजे. शिवीगाळयुक्त कन्टेन्टमुळे लोकांना होणारा मानसिक त्रास आम्हाला पूर्णपणे समजतो आणि आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर शिवीगाळयुक्त कन्टेन्ट किंवा वर्तन सहन करत नाही. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक कृत्यांची मानहानी करण्याचा किंवा लाज काढण्याचा उद्देश असलेला कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल. दुसर्‍या व्यक्तीला त्रास देण्याचा उद्देश असलेल्या किंवा कोणत्याही व्यक्तीला अपमानित किंवा लज्जित करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही कन्टेन्टबद्दल वापरकर्त्यांनी तक्रार करणे आवश्यक आहे.

8. आत्महत्या आणि स्वतःला इजा

प्लॅटफॉर्मवर आत्महत्या, स्वतःला इजा करण्याचा समावेश असलेल्या किंवा धोकादायक कृत्यांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देणाऱ्या कन्टेन्टला परवानगी नाही. स्वतःला इजा करताना दाखवणारा, स्वतःला दुखापत किंवा आत्महत्या करण्याचे गौरव करणारा कन्टेन्टवर तसेच कोणत्याही प्रकारे आत्महत्या किंवा स्वतःला इजा कशी करावी याच्या सूचना देणाऱ्या पोस्ट्स प्रतिबंधित आहेत. गंभीर समस्यांचा सामना करत असलेल्यांना मदत करण्याशी संबंधित कन्टेन्टला परवानगी आहे.

9.  गोपनीयतेचा भंग

वापरकर्त्यांनी इतरांच्या गोपनीयतेचा आदर बाळगावा अशी Josh ची अपेक्षा आहे. तुम्ही दुसर्‍या व्यक्तीची कोणतीही वैयक्तिक किंवा गोपनीयतेचा भंग करणारी माहिती प्रकाशित करणे, शेअर करणे किंवा प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देणे टाळणे आवश्यक आहे. संपर्क माहिती, पत्ता, आर्थिक माहिती, आधार क्रमांक, पासपोर्टची माहिती यासह एखाद्याचा वैयक्तिक डेटा किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करणाऱ्या कन्टेन्टला किंवा अशी माहिती उघड करण्याची किंवा वापरण्याची धमकी देणाऱ्या कन्टेन्टला सक्त मनाई आहे आणि त्याला परवानगी नाही.

10.  चुकीची माहिती आणि फेक न्यूज

सत्यता पडताळून पाहिली असता न घडलेल्या कृत्यांचे किंवा घटनांचे प्रतिनिधित्व हे फसवण्याच्या, लबाडीच्या किंवा दिशाभूल करण्याच्या उद्देशाने छेडछाड करून तयार केलेले ऑडिओ, व्हिडिओ किंवा इमेज असलेल्या कन्टेन्टला आम्ही परवानगी देत नाही. अशा कन्टेन्टमुळे जर एखाद्या सारासार विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात अशाप्रकारे पूर्णपणे भिन्न समज किंवा छाप निर्माण होईल की त्यामुळे काही गटांना किंवा व्यक्तींना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते किंवा निवडणुकीच्या किंवा नागरी प्रक्रियांमधील सहभागाला किंवा विश्वासाला लक्षणीयरीत्या धक्का पोहोचवू शकते, याचा यात समावेश होतो. वापरकर्त्यांनी ट्रॅफिक निर्माण करण्यासाठी किंवा त्यांचे फॉलोअर्स किंवा व्ह्यूज, कमेंट्स तसेच शेअर्स वाढवण्यासाठी कृत्रिम किंवा फसवणुकीचे मार्ग वापरणे टाळले पाहिजे.

11.  ओळख चोरी आणि तोतयागिरी

कन्टेन्टच्या उत्पत्तीबद्दल वापरकर्त्यांना फसवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी दुसरी व्यक्ती, ब्रँड किंवा संस्था म्हणून तोतयागिरी करू नका किंवा ढोंग करू नका. तुम्हाला स्वेच्छेने स्वतःची पडताळणी करण्यासाठी आणि तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रदान केलेले सर्व तपशील अचूक आहेत आणि कोणत्याही प्रकारे चुकीचे वर्णन केलेले नाही याची खात्री करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

12.  असभ्य भाषा आणि अपशब्द

आम्‍ही अत्‍यंत भयंकर किंवा धक्कादायक असलेल्या कन्टेन्टला, विशेषतः घृणास्पद हिंसेला किंवा वेदनेला उत्तेजन देणाऱ्या  किंवा गौरव करणाऱ्या कन्टेन्टला परवानगी देत नाही. आम्ही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अपवादांना अनुमती देतो, उदाहरणार्थ, बातमी देण्यायोग्य किंवा समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी असलेला कन्टेन्ट. जेव्हा आम्हाला हिंसेचा किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा खरा धोका लक्षात येतो, तेव्हा आम्‍ही त्या खात्‍यावर बंदी घालतो आणि आवश्‍यकतेनुसार आणि जेव्हा योग्य असेल तेव्हा संबंधित कायदेशीर अधिकार्‍यांना सहकार्य करतो.

13.  दुर्भावनापूर्ण कार्यक्रम

पडताळणी न केलेली किंवा खोटी किंवा दिशाभूल करणारी, परंतु खरी मानली जाऊ शकेल अशी माहिती जाणूनबुजून पोस्ट किंवा शेअर करू नका. फोटोशॉप केलेले फोटो किंवा छेडछाड केलेले व्हिडिओ यांसह मॉर्फ केलेल्या किंवा फेरफार केलेल्या मीडियाबाबत आमचे शून्य-सहनशीलता धोरण आहे. नागरिक-केंद्रित प्रक्रियांवर परिणाम करू शकणार्‍या कन्टेन्टला आम्ही सूट देत नाही. राजकीय निवडणुकांच्या निकालांमध्ये व्यत्यय आणू शकेल अशा कोणत्याही कन्टेन्टलादेखील आम्ही परवानगी देत नाही. तुम्ही प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असलेला कन्टेन्ट खरा आणि विश्वासार्ह आणि पडताळणीयोग्य स्रोताकडून आलेला असल्याची तुम्ही शक्य तितक्या प्रमाणात खात्री केली पाहिजे.

14.  बेकायदेशीर कृत्ये आणि नियमन केलेल्या वस्तू

आम्ही काही नियमन केलेल्या वस्तूंचा व्यापार, विक्री, जाहिरात आणि वापर तसेच गुन्हेगारी कारवायांचे चित्रण करण्यास किंवा प्रोत्साहन देण्यास प्रतिबंध करतो. काही कन्टेन्ट बहुसंख्य प्रदेश किंवा जगामध्ये बेकायदेशीर किंवा नियमन केलेल्या कृत्यांशी किंवा वस्तूंशी संबंधित असल्यास, जिथून तो कन्टेन्ट पोस्ट केला त्या अधिकारक्षेत्रात ती कृत्ये किंवा वस्तू कायदेशीर असल्या तरीही तो काढून टाकला जाऊ शकतो. शैक्षणिक, वैज्ञानिक, कलात्मक आणि बातमीयोग्य कन्टेन्ट यासारख्या लोकांना मूल्य प्रदान करणार्‍या कन्टेन्टसाठी आम्ही अपवादांना अनुमती देतो. प्लॅटफॉर्मवर शस्त्रे, बंदुका, स्फोटके, बेकायदेशीर वस्तू किंवा सेवा, नियमन केलेल्या वस्तू, अंमली पदार्थ, नियंत्रित पदार्थ यांचा प्रचार किंवा विक्री, लैंगिक सेवांची मागणी किंवा विक्री करणार्‍या कोणत्याही कन्टेन्टला प्लॅटफॉर्मवर परवानगी नाही आणि त्यावर सक्त मनाई आहे.

मनी लॉन्ड्रिंग किंवा जुगाराशी संबंधित असलेल्या किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कन्टेन्टला सक्त मनाई आहे.

प्लॅटफॉर्मवर कॉम्प्युटर व्हायरस, मालवेअर किंवा कॉम्प्युटर संसाधनाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आणण्याच्या उद्देशाने इतर कोणत्याही प्रकारचे कॉम्प्युटर कोड असलेला कन्टेन्ट अपलोड करण्याची परवानगी नाही. कृपया खात्री करा की तुम्ही पोस्ट केलेला कन्टेन्ट बेकायदेशीर, अनैतिक किंवा अवैध नाही.

15.  बौद्धिक संपदा (कॉपीराइट आणि ट्रेडमार्क उल्लंघन)

तुम्ही कबूल करता, पुष्टी करता आणि सहमत आहात की तुम्ही पोस्ट केलेल्या कन्टेन्टमधील सर्व बौद्धिक संपदा हक्क तुमच्याकडे आहेत किंवा तुमच्याकडे प्लॅटफॉर्मवर असा कन्टेन्ट पोस्ट करणे, प्रदर्शित करणे, पुनरुत्पादन करणे, कॉपी करणे, प्रसारित करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी वैध परवाना आहे.

तुम्ही कबूल करता, पुष्टी करता आणि सहमत आहात की प्लॅटफॉर्मचे सॉफ्टवेअर, इंटरफेस, वेबपेजेस, डेटाबेस, नाव आणि लोगो यांच्यासह परंतु यापुरतेच मर्यादित नाहीत असे त्याचे नोंदणीकृत असलेले किंवा नसलेले सर्व बौद्धिक संपदा हक्क VerSe कडे आहेत. बौद्धिक संपदेच्या वरीलपैकी कोणत्याही स्वरूपावर तुम्ही कोणताही हक्क सांगू शकणार नाही.

तुम्ही पोस्ट केलेला कन्टेन्ट तुमच्या मालकीचा आहे. प्लॅटफॉर्मचे सर्व अधिकार VerSe कडे आहेत.

तुम्ही प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट पोस्ट करता तेव्हा, तुम्ही VerSe ला अशा कन्टेन्टचा त्या कन्टेन्टमधील मूलभूत कार्यांसह वापर, व्यवसायिक वापर, कॅशे, संग्रह, प्रकाशन, प्रदर्शन, वितरण आणि संग्रह करण्यासाठी नॉन-एक्सक्लुझिव्ह, कायमस्वरूपी, जागतिक, हस्तांतरणीय, रद्द न करता येणारा, रॉयल्टी-मुक्त, अमर्यादित परवाना देता. तुम्हाला मान्य आहे, समजले आहे आणि तुम्ही पुष्टी करता की, तुम्ही पोस्ट केलेल्या कन्टेन्टवर लागू होणारे कोणतेही परवाना शुल्क, रॉयल्टी किंवा इतर कोणतेही शुल्क देण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल.

तुम्ही VerSe ला प्लॅटफॉर्मवर तुम्ही पोस्ट केलेला कन्टेन्ट वापरण्याचा अधिकार देता.

या धोरणामध्ये स्पष्टपणे नमूद केले असल्याखेरीज, तुम्ही कोणताही कन्टेन्ट, सॉफ्टवेअर, साहित्य किंवा सेवा पूर्णपणे किंवा अंशतः कॉपी, सुधारणा, प्रकाशन, प्रसारण, अपलोड, हस्तांतरण किंवा विक्रीमध्ये सहभाग, पुनरुत्पादन (या विभागात प्रदान केल्याप्रमाणे वगळता), त्यावर आधारित व्युत्पन्न कार्य निर्मिती, वितरण, सादरीकरण, प्रदर्शन किंवा कोणत्याही प्रकारे उपयोग करणार नाही.

प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला कोणताही कन्टेन्ट अनधिकृत कारणांसाठी वापरू नका.

तुम्ही प्लॅटफॉर्मवरून कोणताही कन्टेन्ट काढून टाकल्यास किंवा प्लॅटफॉर्मचा तुमचा वापर संपुष्टात आणल्यास, VerSe तुमचा कन्टेन्ट तिच्या विवेकबुद्धीनुसार आणि कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी ठेवू शकते आणि वापरू शकते. VerSe आणि त्याचे वापरकर्ते तुमचा वापर संपुष्टात आणण्याच्या तारखेनंतरही तुमचा कोणताही कन्टेन्ट राखून ठेवू शकतात आणि तो वापरणे, संग्रहित करणे सुरू ठेवू शकतात.

तुम्ही कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकल्यानंतरही तो वापरण्याचा अधिकार VerSe राखून ठेवते.

C. निवेदन आणि हमी

तुम्ही निवेदन करता, करारपूर्वक कथन करता आणि हमी देता की तुम्ही पोस्ट केलेला कन्टेन्ट या धोरणाच्या कोणत्याही अटीचे किंवा तुम्ही ज्या प्रदेशात कन्टेन्ट पोस्ट करत आहात त्या प्रदेशात लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे किंवा ज्या प्रदेशात कन्टेन्ट प्रदर्शित, प्रसारित, प्रकाशित, वापर, लोकांपर्यंत पोहोचवला, पुनरुत्पादन किंवा कॉपी केला जाऊ शकतो त्या प्रदेशात लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही.

तुम्ही पुढे निवेदन करता, करारपूर्वक कथन करता आणि हमी देता की कन्टेन्ट आणि कन्टेन्टमधील मूलभूत कार्ये तुमच्या मालकीची आहेत किंवा तो प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्याचा तुमच्याकडे वैध परवाना आहे आणि तुम्ही या धोरणांतर्गत तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडता.

तुम्ही पुष्टी करता की तुमची पोस्ट कायदेशीर आहे आणि ती पोस्ट करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

VerSe या धोरणांतर्गत कोणतीही हमी देत नाही. आणि VerSe व्यक्त किंवा अभिप्रेत असलेल्या सर्व हमी स्पष्टपणे नाकारते, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही:

 • व्यापारक्षमता, विशिष्ट हेतूसाठी तंदुरुस्ती आणि प्लॅटफॉर्म किंवा इतर कोणत्याही पैलूच्या संदर्भात उल्लंघन नसल्याची व्यक्त किंवा अभिप्रेत हमी;
 • कोणत्याही आणि सर्व कन्टेन्टच्या संदर्भात हमी
 • प्लॅटफॉर्म, सेवा, तंत्रज्ञानाची गुणवत्ता किंवा कामगिरीबाबत हमी, ज्यामध्ये कोणत्याही जाहिरातीच्या उपलब्धतेचा समावेश होतो परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही; आणि:
 • प्लॅटफॉर्म आणि/किंवा त्याद्वारे ऑफर केलेल्या सेवा अखंडित, वेळेवर किंवा त्रुटीमुक्त असतील याची हमी.
 • प्लॅटफॉर्मच्या संदर्भात VerSe कोणतीही हमी देत नाही.

D. नुकसानभरपाई

तुम्ही पोस्ट केलेला कन्टेन्ट किंवा तुम्ही या धोरणाचे केलेले कोणतेही उल्लंघन किंवा तुम्ही केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य, यामुळे किंवा त्याच्या संदर्भात उद्भवलेला एखाद्या तृतीय पक्षाने केलेला कोणताही दावा किंवा मागणी यासाठी तुम्‍ही VerSe आणि तिच्या संलग्न कंपन्या, व्‍यवसाय भागीदार आणि त्‍यांचे संचालक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई द्याल, ज्यात खर्च आणि वकिलांच्या फीचा समावेश आहे, आणि त्यांना जबाबदार धरणार नाही.

प्लॅटफॉर्मवर केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी VerSe वर खटला भरण्यात आल्यास तुम्हाला त्याचा खर्च द्यावा लागेल.

कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, VerSe आणि/किंवा तिच्या सहयोगी कंपन्या कोणत्याही अप्रत्यक्ष, आनुषंगिक, विशेष, परिणामी किंवा दंडात्मक नुकसानभरपाईसाठी, किंवा नफा अथवा महसूलाचे कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान, किंवा डेटा, वापर, गुडविल यांचे कोणतेही नुकसान किंवा इतर अमूर्त नुकसान यासाठी जबाबदार असणार नाहीत, जे या कारणांमुळे असू शकेल, (a) प्लॅटफॉर्मचा तुमचा क्सेस किंवा वापर किंवा प्लॅटफॉर्म क्सेस किंवा वापर करण्यास असमर्थता; (b) प्लॅटफॉर्मवरील कोणतेही वर्तन किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचा कन्टेन्ट ज्यामध्ये मर्यादा नसणेही समाविष्ट आहे, इतर वापरकर्त्यांचे किंवा तृतीय पक्षांचे कोणतेही बदनामीकारक, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर वर्तन; किंवा (c) तुमच्या प्रसारणाचा किंवा कन्टेन्टचा अनधिकृत क्सेस, वापर किंवा फेरफार. कोणत्याही परिस्थितीत प्लॅटफॉर्मशी संबंधित सर्व दाव्यांसाठी VerSe चे एकूण दायित्व  5000 (केवळ  पाच हजार) पेक्षा जास्त नसेल.

E. आमची जबाबदारी मर्यादित आहे

उत्तरदायित्वाची ही मर्यादा तुमच्या आणि VerSe यांच्यातील कराराचा एक भाग आहे आणि ती दायित्वाच्या सर्व दाव्यांना (उदा. हमी, अपकृत्य, निष्काळजीपणा, करार, कायदा) लागू होईल आणि जरी VerSe किंवा तिच्या संलग्न कंपन्यांना अशा कोणत्याही नुकसानभरपाईची शक्यता सांगितली गेली असेल आणि जरी हे उपाय त्यांचे आवश्यक उद्देश साध्य करण्यात अयशस्वी ठरले असले तरीही.

F. नोटीस आणि तक्रार निवारण यंत्रणा

प्लॅटफॉर्मद्वारे क्सेस करता येण्याजोग्या कन्टेन्ट किंवा जाहिरातींसाठी VerSe जबाबदार नाही याची विशेष नोटीस दिली आहे. VerSe त्याच्या विवेकबुद्धीनुसार तृतीय-पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा दावा केलेला कन्टेन्ट काढून टाकण्याचा आणि/किंवा त्याचा क्सेस बंद करण्याचा आणि/किंवा VerSe च्या आणि/किंवा इतर तृतीय पक्षांच्या बौद्धिक संपदेचे किंवा इतर अधिकारांचे उल्लंघन करू शकतील अशा प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची खाती संपुष्टात आणण्याचा अधिकार राखून ठेवते.

➢        तक्रार निवारण यंत्रणा

VerSe ने तक्रारींचे निराकरण करण्यासाठी खालील यंत्रणा राबवली आहे:

सेवा अटी, गोपनीयता धोरण आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाबाबत तक्रारी किंवा समस्या "निवासी तक्रार अधिकारी" यांना संबोधित केल्या पाहिजेत. निवासी तक्रार अधिकारी यांच्याशी grievance.officer@myjosh.in या ईमेलद्वारे किंवा खालील तक्त्यामध्ये दिलेल्या तपशीलानुसार पोस्टाद्वारे संपर्क साधला जाऊ शकतो. VerSe ला तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तक्रारीमध्ये असणे आवश्यक आहे.

तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता:

व्याप्ती

नाव/हुद्दा

Email-Id

तक्रार निवारणासाठी

तक्रार अधिकारी: श्री. नागराज

grievance.officer@myjosh.in

कायदा अंमलबजावणी समन्वयासाठी

नोडल अधिकारी: श्री. सुनील कुमार डी.

nodal.officer@myjosh.in

नियामक अनुपालनासाठी

अनुपालन अधिकारी

compliance.officer@myjosh.in

प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कन्टेन्ट किंवा जाहिरातीमुळे पीडित झालेली कोणतीही व्यक्ती/संस्था अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. पीडित व्यक्ती/संस्थेचे कायदेशीर वारस, एजंट किंवा वकीलदेखील अशा कन्टेन्ट किंवा लेखाविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. जर तक्रार गुन्ह्याच्या कक्षेत येत नसेल, तर कन्टेन्ट किंवा जाहिरातीमध्ये स्वारस्य नसलेली किंवा त्यामुळे पीडित नसलेली व्यक्ती/संस्था अशा कन्टेन्ट किंवा जाहिरातीविरुद्ध वैध तक्रार दाखल करू शकत नाही. तुम्ही पीडित पक्षाचे एजंट किंवा वकील असल्यास, तुम्हाला पीडित पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्याचा तुमचा अधिकार सिद्ध करणारा कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे. वैकल्पिकरित्या, आम्हाला येथे लिहून कळवू शकता:

VerSe इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड

११ वा मजला, विंग ई, हेलिओस बिझनेस पार्क,

आऊटर रिंग रोड, कडूबीसनहळ्ळी,

बेंगळुरू- 560103, कर्नाटक, भारत

आमच्या उत्पादनाच्या वापरकर्त्याला सामोरे जावी लागलेली तक्रार किंवा इतर समस्या खालील पत्त्यावर ईमेलद्वारे सबमिट केली जाऊ शकते. तक्रारीमध्ये या गोष्टी प्रदान केल्या पाहिजेत: (i) संबंधित खातेधारकाचे युजरनेम (ii) चिंतेचा विषय असलेला विशिष्ट कन्टेन्ट/व्हिडिओ आणि (iii) काढून टाकण्याच्या अशा विनंतीची कारणे.

JOSH ला तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तक्रारीमध्ये असणे आवश्यक आहे. JOSH ला यासंदर्भातील सर्व नोटिसा लिखित स्वरुपात असतील आणि त्या वैयक्तिकरित्या रीतसर दिल्या जाव्यात किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवल्या गेल्या असतील, रिटर्न पावतीची विनंती करावी किंवा वरील पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे पाठवल्या जाव्यात.

मी या वापरकर्ता कराराच्या अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि मी याद्वारे, माझ्या स्वेच्छेने, बिनशर्तपणे त्यास बांधील राहण्याचे स्वीकारतो.

या गोपनीयता धोरणाबाबत तुमच्या काही तक्रारी किंवा समस्या असल्यास, तुम्ही JOSH च्या तक्रार अधिकाऱ्याशी ईमेल किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधू शकता. तुम्ही तुमच्या तक्रारी grievance.officer@myjosh.in या ईमेल पत्त्यावर “गोपनीयता तक्रार” या विषयासह पाठवू शकता. तुम्ही वर नमूद केलेल्या पद्धतींवरील तक्रार अधिकाऱ्याशी ईमेल किंवा पत्राद्वारे देखील संपर्क साधू शकता.

tower
inter circlw intercircle intercircle intercircle

Ohh Nooo!

There is no internet connection, please check your connection

TRY AGAIN

Ohh Nooo!

Landscape mode not supported, Please try Portrait.